भडंग

Submitted by mrsbarve on 24 February, 2016 - 03:09

भडंग :
साहित्य:
चुरमुरे ,तेल ,कडीपत्ता (भरपूर),मुठभर शेंगदाणे ,फोडणीचे साहित्य ,लाल तिखट पुड,मीठ,मेतकुट,दळलेली साखर . लसुण .
कृती:
मोठ्या कढैइ किंवा जाड बुडाच्या पातेल्यात डावभर तेलाची फोडणी करा ,फोडणीत अर्थातच मोहरी,जिरे,हिंग,हळद ,कडिपत्ता आणि शेंगदाणे टाका ,लसूण (४ पाकळ्या) ठेचून टाका . शेंगदाणे छान तळले जावेत ,लसूण लालसर झाला की सर्व परतून त्यात अर्धा शेर चुरमुरे टाका , फ्लेम बारिक करा ,वरून मीठ,लाल तिखट पूड ,मेतकूट ,लिसा साखर टाका . तीन चार मिनिटे सगळे परतून घ्या, बन्द करा -फ्लेम!

गार झाल्यावर भडंग खा .

तिखट ,साखर,मीठ चवीनुसार हवे तसे !मेतकुट दोन चमचे बास .

मी कोलेजात असताना डबाभर एका आठवड्यात खलास होई .

विकतचे भडंग नुसतेच तिखट लागते ,हे भडंग मला तरी खूप सरस वाटते. धन्या जिर्याची पूड नका घालू ,उगीच Happy

मी चहा पीत नाही ,पण लोक दुपारच्या चहा च्या बरोबर भडंग हादडतात.

फोटो :करून बघा ,आणि फोटो काढा ,मग इथे पोस्टा ,

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे ललित मधे का आल Happy पाककृत्यांचा धागा होता ना हे लिहायला Happy

भडंग बाहेरही छान मिळत खास करुन गणेश ह्यांच. बहुतेक ते सांगली वगैरे भागाकडून येत. पण त्यांच भडंग छान कुरकुरीत लागत. दिसायलाही रंग अगदी लाल असतो.