तुझे उत्तर मिळाले वागण्यातुन !

Submitted by सुप्रिया जाधव. on 24 February, 2016 - 02:27

कशाला पाहिजे ते बोलण्यातुन
तुझे उत्तर मिळाले वागण्यातुन !

तळाला गाळ साचू दे हवा तर
उरावे पात्र निर्मळ वाहण्यातुन

पटावर चालणारा ऊंट तिरका
स्वतःला सिध्द करतो चालण्यातुन

विचारांची दिशा बदलून पाहू
खरी क्रांती घडावी वाचण्यातुन

जिण्याचा वाघ पाठी लागलेला
कशी होणार सुटका धावण्यातुन

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पटावर चालणारा ऊंट तिरका
स्वतःला सिध्द करतो चालण्यातुन .....
>> ।मस्त !