कायदा हातात नाही घ्यायचा

Submitted by जयदीप. on 22 February, 2016 - 10:45

चांगला झाला नसावा एकही
का बदल नजरेस यावा एकही

कायदा हातात नाही घ्यायचा
मग कसा रस्ता निघावा एकही

खूप होते टोल इथवर यायला
लागला नाही भरावा एकही

मी निघालेलो तसा घाईत, पण
ठेवला नव्हता पुरावा एकही

पकडले गेलेत सगळे चोरटे
आपल्यामधला नसावा एकही

घेतले होतेस का निर्णय विकत
का तुझ्या पक्षात द्यावा एकही

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>पकडले गेलेत सगळे चोरटे
आपल्यामधला नसावा एकही<<< व्वा

गझल आवडली