पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेरीच्या पातेल्यात बेरी नाहीच असे समजून>>> ऑ? बेरी म्हणजे कशाला म्हणताय तुम्ही सगळे. आम्ही तर बेरी ब्राउन कलरचा जो पदार्थ उरतो, त्यात गरम असताना साखर घालुन खातो किंवा पराठे करतो.

पूनम, तिकडे दही आहे, इकडे लोणी-तूप आहे. Wink

शिवाय वेगळ्या धाग्यावर लिहा असं सांगितलं तरी चर्चा व्हायची तिकडेच होते, ज्यांच्याखातर सांगतो त्यांना ह्याची काहीच किंमत नसते, आणि ह्या सगळ्यात मुन्नी मात्र बदनाम होते.

सस्मित, हो आम्ही पण तीच बेरी म्हणत आहोत. 'बेरीच्या पातेल्यात बेरी नाही असे समजून' लिहिले ते फक्त ह्यासाठी की बेरीचा चहा करायची वेगळी अशी काहीच पद्धत नाही. ज्यात तुप केले तेच पातेले. गाळणीत जर बेरी निघाली असेल तुप गाळल्यानंतर ती गाळणीतली बेरी परत तुप कढवलेल्या पातेल्यात उलटायची. म्हणजे पातेले वही, बेरी वही, गाळणी भी वही.. की चाय बहुत मिठा लागे नया नया Happy

बेरी मिक्सरमधून काढून त्याचे लाडू, केक इ. चांगले होते. केक मीही केलाय, इतर माबोकरणी लाडू करतात बहुतेक असे अंधुक आठवतय.

बेरी उरली की त्या पातेल्यात पाणी टाकुन उकळायचं....आणि त्या पाण्यात भात /मुगाची खिचडी करायची
अप्रतिम चव येते...

जून्या मायबोलीत इथे सुरनोळीच्या कृतीची लोकसत्ता मधली लिंक आहे.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/120273.html?1193640828

काँपुटरवर तो फॉटं नाही आता. काही वाचता येत नाही आहे.
कुणाकडे ही लिंक् नीट उघडते आहे का?
उघडल्यास स्क्रीन शॉट टाकाल का?

.

अदिती, माझ्याकडे लिंक व्यवस्थित उघडतेय पण स्क्रिन शॉट माबोवर टाकता येत नाहिये. माझ्याकडे वर्ड डॉक मधे टाकता येतोय पण इथे नाही टाकता येत. तुझ्या विपूत देते.

स्वाती२, खूप खूपच् धन्यवाद.
खाली माझ्या विपू मधली कृती. नशीबाने कॉपी झाली. Happy

लोकसत्तातील सुरनोळ्या-
दोन वाट्या जाडसर तांदूळ, १ वाटी ओल्या खोबर्‍याचा किस, १ वाटी जाड पोहे, १ वाटी गूळ, १ चमचा मेथी, अर्धी वाटी ताक, थोडी हळद, लहान वाटी लोणी किंवा तेल, चवीपुरते मीठ
कृती-आदल्या दिवशी तांदूळ स्वच्छ धुवून मेथीसह भिजवावेत. पोहे धुवून ताकात भिजवावेत. चार तासांनी बिजलेल्या तांदळात, पोहे आणि इतर सर्व साहित्य घालून मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यावे. हे मिश्रण झाकून ठेवावे. दुसर्‍या दिवशी मिश्रण आंबून छान फुगलेले पीठ तयार होइल.
डोशाचा तवा तापवून त्याला तेल किंवा लोणी लावा आणि भिजलेले पीठ डोशाप्रमाणे गोलाकार पसरा. थोडा वेळ झाकण ठेवा. मंद आचेवर एका बाजूने भाजा. मिश्रणातला गूळ असल्याने मोठ्या आचेवर भाजल्यास करपू शकतो . मिश्रण पसरवता देखील विशेष काळजी घ्यावी लागते. थोडा वेळ गेला की पिवळसर मिश्रणाचा रंग किंचीत बदलतो. झाली सुरनोळी तयार. खोबर्‍याची चटणी किंवा साजूक तुपासोबत वाढा.

इंपस्लिव्ह शॉपिंग मोझारेला चीज ( ८ औस) आणलंय. आता पाहिलं तर २३ ला एक्सपायर होतंय. आधी घरी आणून काही केलं नाहीये. टॉमेटो चालत नाहीये त्यामुळे मला माहित असलेलं एकमेव इतालियन सलाद करता येणार नाही. गोड/तळलेला पर्याय नको आहे. मग काय करता येईल? नेटवर पण शोधते पण कुणी ट्राइड ट्रस्टेड पर्याय असल्यास द्याल का?

आभार्स Happy

वेका, उगीच आपल्याला ड्युआय चिडवत नव्हते हे लोक. मी मागच्या आठवड्यात असंच इंपल्सिव शॉपिंग केला. आणि गेस व्हॉट - सेम. अ बिग पॅकेट ऑफ मोझारेला. पिझ्झा करुन झाला. आता मोठा प्रश्न आहे कि उरलेल्याचं काय करु? आता (माझ्या) सकाळी सकाळी नेटवर आले ते सर्च करायलाच. रविवारी काही तरी स्पेशन डीश होइल, शिवाय चीझ पण सत्कारणी लागेल.

अनु, झाला ना पिझा करुन. आता ' समथिंग नाइस' हवं आहे. या शब्दाचा धसका घेतला आहे मी आता. कुठुन सतत एवढी क्रिएटिविटी आणि उत्साह आणावा?

चीज चिली टोस्ट
पास्त्यात वापरता येईल का?
ब्रुशेट्टा
लसान्या
गार्लिक ब्रेड
(प्रचंड सीनफुल पण तोंपासु रेसिपी)

@ वेका & मनीमाऊ - मशरूम्स स्टफ्फ्ड, ,सॅलड्स, मॅक्रोनी हॉटपॉट, फ्राईड मॉझरेला स्टिक्स, चीज बॉल्स, टोमेटो-मॉझरेला बाईट्स.

चला कामाला लागा दोघी आता Proud

मोझारेला चीजी डिप म्हणून गूगल करा, बर्‍याच रेसिपीज मिळतील. त्यात व्हेजी स्टिक्स, ब्रेड स्टिक्स बुडवून खायचे.

थँक्यु गर्ल्स ! वर उल्लेखलेल्या सगळ्या रेसिप्स सर्च करते आहे.

सनव, चीज पराठा डोक्यात होताच, तो प्रयत्न करुन पाहिला. पण मोझारेला ज्या प्रकारे मेल्ट होतं आणि गार झाल्यावर कोरडं होतं, त्यामुळे पराठे फार काही बरे झाले नाहीत. म्हणजे गरम ठीक लागले, पण करुन ठेवलेले नव्हते छान लागत. आता १-२ दिवसांनी बटाटा चीझ मिक्स पराठे करायला सांगेन. ते बहुदा बरे लागावेत.

अनु, पिझा लगेच करुन झाला होता. आता प रत गार्लिक ब्रेड किंवा ब्रु शेटा म्हणजे बेकरी प्रॉड्क्ट्स नको वाटताहेत. पण पास्ता करुन पहाता येइल.

वर्षु, स्टफ्ड मश्रुम्स मला टेम्पटिंग वाटताहेत. करुन पहाते.

अरुंधती/राजसी, चीझी डीप्स मुलांना आवडतात. गुगलुन पहाते.

हा हा मनिमाऊ Wink तू आणि मी वेगळे का आयडी आहोत? सगळी अ‍ॅडमिनदेवाची कृपा Wink

बरं मश्रुम्स आणि पिझा बेस आणणे ही दोन कर्तव्य आज-उद्यामध्ये करते. आणि आज संध्याकाळी अ‍ॅज इट इज सँडविचवर बोळवण करणारच होते तीत हे चीझ घालेन. माझी मुलं चीझी डिप्सच्या बाबतीत थोडी सोसोच आहेत. उगाच चिप्स आणायला लावलीत आणि त्याच मटकावतील सो दॅट आणि फ्राइड चीज वगैरे पर्याय बाद.

मने तू आणखी काही केलंस तर कळवं. मग आपण ड्युआय असल्याने फोटो बिटो पण टाकू Proud

रिझोटो - मोझा. चीज, चेरी टोमॅटोज् व बेसिल वापरून
बेक्ड स्टफ्ड बटाटे / सिमला मिरची - सारण ब्रोकोली, रंगीत सिमला मिरच्या, लसूण, मिरची यांची भाजी + क्रीम + मोझा. चीज.

भटुरे कधी केले नाहीत, करावेसे वाटतायत. पण
१)तेलकट न होणारे असे भटुरे असतात का? मी आजवर खाल्लेले समस्त भटुरे तेलात न्हाऊ घालून आणालेले होते!
२)अंडं, यीस्ट, बेकिंग सोडा, मैदा हे मला भितीदायक पदार्थ न घालता यत्ता पहिली दर्जाचे कणीक, मीठ, तेल, दही इतपतच पदार्थ घालून ते करता येतात का? आणि प्रायोगिक तत्त्वावर करायचे झाल्यास ते पुरी आकारात होतात का? की कशानेही फुगुन-रुसून मोठ्ठे ढब्बे होतातच? पुरीटाईप झाले तरी भटुरेच असतात ना?

असतील तर(च) रेस्पी हवी आहे.

Pages