बदल हवा आहे

Submitted by जयदीप. on 16 February, 2016 - 13:15

हीच बहुतेक वानवा आहे
फक्त थोडा बदल हवा आहे

तू इथे पोच आणि मागे बघ
सूर्य दिसणार काजवा आहे

या उन्हाळ्यातल्या झळांसोबत
काय येणार गारवा आहे?

थांबलो तर पडेन मग मागे
थांबलेला जरी थवा आहे

कोण आहे विचारतो पत्ता
मी तसाही इथे नवा आहे

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users