मधुमेहः आयुर्वेदिक औषधोपचार

Submitted by गजानन on 11 February, 2016 - 09:11

मधुमेह आणि आयुर्वेदिक उपचार आणि त्यांचे (सु)(दु:) परिणाम यावर इथे चर्चा व्हावी, अशी अपेक्षा आहे.

तुम्हापैकी कोणाला मधुमेहावर आयुर्वेदिक औषधांचा अनुभव आहे का?

मधुमेही व्यक्तींना अनेकदा आयुर्वेदिक औषधे घेऊन बघा, तुमची सगळी औषधे बंद होतील, असा सल्ला दिला जातो. त्या अमक्या अमक्याची औषधे पूर्णपणे बंद आहेत, असे ऐकून त्या संबंधित रुग्णाकडे खोलात जाऊन चौकशी केली असता त्यांना अजूनही रक्तशर्करा नियंत्रणासाठी अ‍ॅलोपथिक औषधे (गोळ्या किंवा/आणि इन्शुलीन) घ्यायला लागतात असे समजले. (आयुर्वेदात मधुमेहावर उपचार उपलब्ध नाहीत, असे इथे अजिबात म्हणायचे नाही. किंबहुना रोजच्या गोळ्या आणि इन्शुलीनमधून सुटका करून देणारी आयुर्वेदिक औषधे मिळाली तर कोणताही मधुमेही तुम्हाला आशीर्वादच देईल. पण एक-दोन उदाहरणात खोलात गेल्यावर वरीलप्रमाणे समजले, म्हणून नमूद केले इतकेच.)

मुंबई, नवी मुंबई अथवा पुण्यात चांगले आयुर्वेदिक मधुमेहतज्ज्ञ माहीत असतील तर कृपया इथे माहिती द्या.

आमच्याकडे एका मधुमेह्याकरता एका नातेवाईकांनी आस्थेने (अर्ध्या दिवसाचा प्रवास करून) एक आयुर्वेदिक औषध आणून दिले आहे. ते औषध म्हणजे कसल्यातरी झाडाच्या पातळ तासलेल्या साली/ढपल्या आहेत. त्या पाण्यात भिजत ठेवून ते पाणी प्यायचे असे त्या नातेवाईकांनी ते औषध देताना सांगितले. डॉ. सल्ल्याशिवाय असे काही अज्ञात देणे नको वाटते. त्या सालींविषयी कोणाला काही माहिती आहे का? आम्हाला त्या सालींविषयी अगदी प्राथमिक स्वरुपाची देखील माहिती मिळू शकली नाही. दुसरे म्हणजे आम्ही अ‍ॅलोपॅथिक डॉ. ना व्यवस्थित कल्पना देऊन दुसरे एक आयुर्वेदिक चूर्ण आधीच चालू केले आहे. तेंव्हा सध्या हे सालींचे औषधही आताच चालू करण्याचा विचार नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिमा चांगली पोस्ट. शेअर करणार आहे घरी.
माझ्या सासूबाईंना गेल्या वर्षी डायबिटिस डीटेक्ट झाला. डॉक्टरांनी त्यांना गहू पुर्ण बंद करायला सांगितला. त्याऐवजी नाचणी, ज्वारी, बाजरी ची भाकरी, आणि थोडा भात खाण्यास हरकत नाही असे सांगितले.तसेच बटाटा, सुरण , ड्राय फ्रूट्स वैगरे पुर्ण बंद. फळांमध्ये फक्त सफरचंद. ३/३ महिन्यांनी टेस्ट करत होतो. आता त्यांनी एक चपाती खाण्यास हरकत नाहे असे सांगितले आहे. कारण सासूबाईंना स्वत:च रोज भाकरी खायला नको वाटत होते. रोज ४० मिनिटे चालणे आवश्यकच.

डायबेटिस हा amylin या हार्मोन्च्या Deposits मुळेच होतो हे सिद्ध झाले असून, त्यावर लौकरच औषध उपलब्ध करण्याची शक्यता आहे ज्याने डायबेटिस बरा होऊ शकतो, अशी बातमी दोन वर्षांपूर्वी वाचण्यात आली.

त्यात पुढिल दोन वर्षात असे औषध उपल्ब्ध होण्याची शक्यता दर्शवली होती.

याबाबत येथिल डॉक्टरांना काही माहिती असल्यास, कृपया सांगावे.

चांगला धागा.

ओळखीच्या एका व्यक्तींनी असेच वैदूचे औषध घेऊन शुगर कंट्रोलला आणली आहे म्हणून पथ्यं सांभाळणे सोडून दिले आणि नंतर महिन्याभरातच ते गेले.

आईला गेली दहा वर्षं मधुमेह आहे. पण तिचा या असल्या आयुर्वेदिक औषधांवर बिल्कुल विश्वास नाही, त्यामुळे ती सरळ डॉ. सांगतील तितकेच पथ्य आणि गोळ्या घेते. मध्यंतरी शुगर खूप वाढल्याने तिला इन्शुलिनचे इंजेक्शन द्यावे लागत होते. त्यानंतर आहार आणि व्यायामामुळे शुगर कंट्रोलला आली आहे.

पाच वर्षापूर्वी बाबांचे प्राणायाम इ.इ. चालू होते,औषधेही डॉ च्या सल्ल्याने आणि योग्य प्रमाणात शुगर कंट्रोल मध्ये होती. पण मध्ये काही काळ सकाळी उठल्यावर शुगर इतकी लो व्हायची की तितका वेळ डोळे उघडे असून चक्कर येणे आणि जवळ जवळ कोमात असल्यासारखी परिस्थिती.हा काळ १०-१५ मिनीटे असायचा.ग्लुकॉन डी/लिंबू सरबत देण्याचा प्रयत्न झाला पण तेही घेतले जायचे नाही. कोथरुड मध्ये एका क्लिनिक डॉ ना कन्सल्ट केल्यावर रात्रीचे इन्स्युलीन कमी केले.असे चक्कर-इन्स्युलीन कमी हे १-२ दा रिपीट झाल्यावर सह्याद्री मल्टिस्पेशालिटी ला दाखवल्यावर इ सी जी मध्ये हृद्य बरेच सावकाश चालते आहे असे दिसले आणि पेस मेकर लावला.त्यानंतर सर्व प्रश्न सुधारले.
पेस मेकर सहित ३ वर्षे आयुष्य जगले.शेवटच्या सहा महिन्यात डॉ ने किडनीचा उतरता ग्राफ आणि इरिव्हर्सिबल नुकसान लक्षात घेऊन 'आता पाहिजे ते खाऊ द्या' असे सांगितले.

अनु Sad

सगळ्यांकडून हे सर्व घाबरवण्यासाठी नसून 'डायबिटीस चे पैलू आणि केस स्टडिज' याची महिती द्यायला आहे याची जात्यातील्/सुपातील मंडळींनी नोंद घ्यावी. Happy

http://www.maayboli.com/node/45316 - माझ्या मुलीच्या टाईप १ डायबेटिसची कहाणी.

माझ्या धाकट्या मुलीला टाईप १ डायबेटिस आहे - (२००० साली डिटेक्ट झाला) - तिच्याविषयी सर्व माहिती वरील धाग्यात आहे.

डॉ. दिमांची पोस्ट अगदी महत्वाची आहे -
१. व्यायाम
२. पथ्य
३. औषधे
४. नियमीत तपासणी*.
या बाबी गरजेच्या आहेत. - ---- डॉ. नी हा जो अतिशय मोलाचा सल्ला दिलेला आहे तो जर सतत नजरेसमोर असेल तर डायबेटिसला घाबरण्यासारखे काहीही नाही.

सध्या माझी ही मुलगी एम. बी. ए. करण्यासाठी बंगलोरला आहे.(एकटी). तिला इन्स्युलिन पंप बसवल्यामुळे तिची ती सर्व मॅनेज करु शकते. पण दररोज रात्री शुगर चेक करुन आम्हाला वॉट्सअ‍ॅपवर कळवते. बाकी ती आता पूर्णपणे इंडिपेण्डण्टली शुगर कंट्रोल करु शकते.

आम्ही तिला डायबेटिस करता कधीही आयुर्वेदिक वा होमिओपॅथिक औषधे देत नाही. किरकोळ सर्दी-ताप, पोट बिघडणे याकरता आयुर्वेदिक औषधेच देतो (मात्र डॉ.च्या सल्ल्यानेच) पण डायबेटिस करता अजिबात नाही.

सुरुवातीला हे (टाईप १ डायबेटिस) कोणालाही कळता कामा नये असा विचार करणारी सोनू आता मात्र अगदी कोणालाही अगदी सहजपणे सांगू शकते - हो, आहे मला डायबेटिस ! इतकेच काय, डायबेटिस इज माय बेस्ट फ्रेण्ड ! असंही दिलखुलासपणे ती म्हणते..... तिने इतक्या सहजपणे हे कसं काय स्वीकारलंय हे मलाही सांगता येणार नाही...

धन्यवाद... Happy

घरच्याघरी साखर तपासण्यासाठी काही उपकरण असतील तर ब्रान्ड आणि मॉडेल नंबरसहीत त्याची इथे माहिती लिहा. धन्यवाद. तसे मी गुगलवर शोधणारच आहे पण इथे स्वानुभवी लोकांची मते उपयोगी ठरतील.

घरच्याघरी साखर तपासण्यासाठी काही उपकरण असतील तर ब्रान्ड आणि मॉडेल नंबरसहीत त्याची इथे माहिती लिहा.>>>>> आपल्या रक्तातील शर्करा तपासण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याला ग्लुकोमीटर म्हणतात. बाजारात अनेक कंपन्यांचे उपलब्ध आहेत. आम्ही गेली १०-१२ वर्षे अ‍ॅक्युचेक (accu chek active) वापरतो. उत्तम आहे.

index_0.jpg

bee is Singapore the brands may be different. Just for info, in India Mixtard 30/70 is available but the same you can't get in SG.

निदान एक सकारात्मक गोष्ट मला जबाबदार आयुर्वेदीक तज्ञांमधे दिसून आली, कि ते अलोपथी औषधे बंद करा असे सांगत नाहीत. त्याच्या जोडीने आमची औषधे घ्या, नियमित तपासणी करा असेच सांगतात. खोटे दावे करणारे ते वेगळेच असतात.

गजानन या धाग्याकरता तुमचे अनेक धन्यवाद. दिमा डॉक्टर आहेत, पण ते खरोखरीच हाडाचे ( बोन स्पेशालीस्ट नव्हे) डॉक्टर आहेत हे ही या धाग्याच्या निमित्ताने दिसुन आले. तसे इतर वेळा दिसुन येतेच. कारण कोणाशी वाद जरी झाले, कोणी नकळत भान्डले तरी दिमा ते विसरुन योग्य त्या वेळेस, योग्य प्रश्नाला योग्य उत्तर कळकळीने देतात हे पण पाहीले आहे.:स्मित:

डायबेटीस पेशन्ट करता समजा नाहीतर तुमच्या घरात कोणी डायबेटीक असतील त्यान्च्याकरता समजा. नुकताच एक भयन्कर अनूभव माझ्या एका स्त्री नातेवाईकाना आला. त्याना १० वर्षापासुन डायबेटीस आहे. पण मागे वर्षभरापूर्वी श्रावण व गणपतीत उपास केल्याने तसेच साबुदाणा व बटाटे खाल्ल्याने त्याना पोटात भयानक दुखु लागले, सकाळपासुन उलट्यावर उलट्या होऊ लागल्या. शेवटी त्यान्च्या मुलाने ताबडतोक त्याना त्यान्च्या फॅमिली डॉ. कडे नेले. ते डॉ. तपासायच्या आधीच म्हणाले की याना ताबडतोक अ‍ॅडमीट करा नाहीतर काही खरे नाही. घाबरलेल्या नातेवाईकानी त्याना अ‍ॅडमीट केले. तर सोनोग्राफीत पॅनक्रियाला सुज आल्याचे दिसुन आले. म्हणजे डॉक च्या निदान पॅनक्रियाटीज (pancreatitis) झाल्याचे समजले.

त्यानी त्या काळात मरणप्राय वेदना सहन केल्या. आठवडाभर नुसते सलाईन, नो पाणी, नो अन्न! मग ८ व्या दिवशी पचतय का हे बघायला थोडे पाणी प्यायला दिले. ते पचल्यावर मग रव्याची खीर दिली. मग नन्तर मुगाची पातळ खिचडी वगैरे सान्गीतली. डॉकने त्याना मरणाच्या दाढेतुन बाहेर ओढुन काढले. त्या डॉक ना नमस्कार.

दुसर्‍यान्दा १० महिन्यानी परत तोच त्रास, कारण बाहेरुन मागवलेले छोले वगैरे. आता मात्र त्या एवढ्या घाबरल्यात की मरण ठीक आहे पण ते दुखणे नको अशी अवस्था आहे.

तेव्हा डायबेटीस पेशन्टकरता व नातेवाईकान्करता खालील सुचना. ( मी डॉ नाही, पण डॉकने सान्गीतलेले लिहीत आहे)

१) उपास पूर्ण बन्द करा, देव भावाचा भुकेला आहे, तुम्हाला उपाशी ठेवुन तो स्वत चैनीत रहात नाही ही खुणगाठ मनाशी बान्धा.

२) बटाटे, साबुदाणा, छोले, पावटे, चणे असे पदार्थ जमल्यास पूर्ण बन्द करा, नाहीतर कधीतरी दुपारी जेवणात घ्या, रात्री हलका आहार घ्या,जड आहार घेऊ नका.

३) नियमीत चेक अप करा. बाजारु मिठाया टाळा. घरच्या बनलेल्या नुसत्या थोड्या चाखुन बघा.

४) दररोज भरपूर चाला. ( वयानुसार व्यायाम करा, अती ताण पण घेऊ नका)

५) दूधी, पडवळ अशा फळभाज्या पण आहारात ठेवा.

बाकी डॉ सलल देतील तो आचरणात आणा.

उपास (साबूदाणा बटाटा खाऊन वा काहीच न खाऊन) बंद करा हे डायबिटीक पेशंटस ना पहिला सल्ला देतात.
रश्मी खरंय. दीमा हाडाचे डॉ आहेत.

मधुमेहा बरोबर हाय बीपी व वजन जास्त असल तर जास्त धोक्याचे आहे. तिनी वर ट्रीट मेंट व लाइफ स्टाइल चेंज आवश्यक आहे. इग्नोअर करू नका एक ही.

दीडबम्ब्या..... छान पोस्ट लिहीलिस Happy सहमत.

बाकी आमचे आईबाप कानास धरुन पिरगाळून सांगत.... आये सांगायची की कार्ट्या, शिन्च्या, जीभेच्या चवीकरता गिळू नकोस, पोट भरुन शरिरसंपदेकरता गीळ... दोन घास कमीच गीळ, दु:ष्काळातून आल्यागत करू नकोस, हावरटपणा तर नाहीच नाहि चालणार ...
अन बाप सांगायचा की म्ह्सोब्या, आळशा सारखा अंडाच निवणं करुन बसु नकोस जिथे तिथे, कामं कर, आयशीला मदत कर, काम करुन माणूस मरत नाही....
आजवर हे पाळत आलोय. हीच जीवनशैली कदाचित अधिक सभ्य भाषेत आयुर्वेदातही सांगितलेली असेल, कुणास ठाऊक.
पण आई नेहेमी सांगायची की सगळ्या व्याधीविकारांचे मूळ "खाण्यात" आहे व जीभेवर ताबा असेल, तर धडगत आहे.
तेव्हाच तिने मधुमेहाबद्दलही सांगुन ठेवलेले, की मधुमेह एकदा झाल्यावर कधीही बरा होत नाही. त्याचा परिणाम वाढत गेल्यास साध्या साध्या जखमाही भरुन येत नाहीत, चिघळतात, वेळेस ते ते अवयव कापून काढावे लागतात. मधुमेह झाल्यावर खाण्यापिण्याची पराकोटीची पथ्ये पाळावी लागतात. तेव्हा मधुमेह होऊच नये असे जीवन जगा.
(नुकतिच मित्राच्या मधुमेही वडिलांची केस बघितली, पायाचा अंगठ्यास खरचटल्याचे निमित्त, मग पाणी जाऊन पू वगैरे, शेवटी अंगठा कापावा लागला)

बायदिवे, मधुमेह होतो कशाने? (अंतर्गत शुगरच्या घडामोडी नका सांगू)
साखर, तुप्प गुळ पोळी वगैरे नियमित खाल्ल्याने मधुमेह होतो का?

माझ्या घरात माझ्या भाच्याला टाईप-१ डायबेटिज आहे वयाच्या ५ वर्षि झाला होता आता तो २० वर्षाचा आहे.
स्वता: इन्स्युलिन टोचुन घेतो नुकतिच त्याला बिपी ची गोळीपण सुरु झालिय. Sad

सकुरा, खरंच वाईट.
लहान मुलांचे Type-1 डायबेटिस म्हणजे खुप वाईट वाटते, न कळण्याच्या वयातच झालेले.

दीमा खूपच चांगली पोस्ट आहे. कठीण विषय सर्वांना कळेल अशा प्रकारे समजावून सांगण्यासाठी तुमच्या पोस्ट्स म्हणजे वस्तुपाठ असतात.

मधुमेहावर नियंत्रणासाठी आजकाल "कमीकर्बोदके आणि उच्चचरबीयुक्त आहार" (LCHF)
यावर बरीच उलट सुलट चर्चा होते आहे. या विषयावर मायबोली तज्ञांचे काय मत आहे.

मधुमेहाविषयी कोणीतरी तज्ज्ञ व्यक्तीने सविस्तर माहितीपूर्ण लेख लिहा, प्लीज.

मधुमेहींच्या आहाराविषयी कोणते उपयुक्त पुस्तक आहे का?

वर कुणीतरी विचारलं आहे की मधुमेह नाहिये पण घरात अनुवांशिक आहे तर तपासण्या कराव्यात का? ... अगदी नक्किइ कराव्यात. दर ३ महिन्यांनी नाही तरी वर्षाकाठी एकदा किंवा दोनदा नक्कीच कराव्यात.

मधुमेह हाताबाहेर जाण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे - ताण-तणाव (स्ट्रेस). तो असेल तर आहार विहार औषध वगैरे गोष्टी फारश्या उपयोगी पडत नाहीत. मानसिक स्वास्थ्य अत्यंत महत्त्वाचं आहे.

माझ्या काही शंका मधुमेहा विषयी ? कुणी दूर केल्यातर बरे होईल .. खुद्ध डॉक्टरांनी केले तर बरे होईल ?
1. मधुमेह विषयी आजार आणि पेशंट गेल्या काही एक वर्षात अचानक वाढले आहेत.
2. Pathalogy लॅब मधून पेशंट चा प्रवास चालू होतो , patahlogy लॅब चा रीपोर्ट हा 100 % बरोबर आहे हे ग्राहकाला (पेशंटला) कसे सांगाल ?
3. अन्य दूसरा कुठे साधन आहे का की, लॅब रीपोर्ट खरे सांगत आहे.
4. नक्की काय आर्थिक गणिते आहेत , हे एकदा सांगा की सर्व सामान्य समाजाला, नुसती लुटालूट , बिचारा पेशंट ल काहीच नाही आहे.
5. तुम्ही कुठल्या डॉक्टर ल शुगर झाली हे ऐकले आहे का ? असेल तर त्यांनी ती कुठे टेस्ट केली आणि कशी आणि सर्वात महत्वाचे त्यामधील आकडे जे सांगतात त्याच्या मध्ये नेमका किती वजा फरक धरायचा हे माहिती मिळाली तर बरे होईल.
5. भारता मध्ये डॉक्टर लोकांनी एक MYTH तयार करून ठेवले रोगी आणि रुग्णाविषयी , जितक्या लवकर आपण शहाणे होऊ हे चांगले.
6. आपल्या जुन्या लोंकांना विचारा , त्याकाळी मधुमेह ,, असे काय होते काय ?
7. संपूर्ण जगा मध्ये औषध कंपन्या आणि doctors आणि hospitals आणि इतर साखळ्या , लोकांना खुळ्यात काढण्याचे उद्योग आहेत.
8. कुणी किती नाकारले तरी हेच सत्य आहे.

>>लोकांना खुळ्यात काढण्याचे उद्योग आहेत.>>

झाला धागा सुरू.
------------
इन्सुलिन कंट्रोल बंद पडते ते पुर्ववत करेल तेच औषध. पण ते कुणाकडेच नाही.

Pages