आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की
आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .
आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .
आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .
कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .
गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .
हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ?
त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?
लोकहो ,
आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया
खाली आणखी काही पॉईंट अॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया
आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.
कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू
रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .
१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही
२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे
जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण
त्यामुळे आता रोजचे गुण १०.
म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अॅड करत जाईन .
काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल
आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा .
31 August, 2014 - 12:59
१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०
१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल
४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस
काल मला डाॅक्टरांनी जाग केलयं
काल मला डाॅक्टरांनी जाग केलयं .. आजपासुन सुरु परत!
रात्री जेवण ९-९.३० ला होत न झोप १०.३० -११ ला .. तरी जेवणात २ पोळी + भाजी /ओट्स खातेय
चनस, परत सुरू करतानाही पहिले
चनस,
परत सुरू करतानाही पहिले ८-१० दिवस अवघड जातात . मग सवय होते परत
२ वर्षांपूर्वी वजन कमी करायला
२ वर्षांपूर्वी वजन कमी करायला सिरियसली सुरूवात करून ३० पाऊंड्स उतरवले होते वर्षभरात. मग नोकरीतला बदल, रिलोकेशन, घरापासून लांब रहाणं, प्रवास, नवीन गावी सेटल होणं, ह्या प्रक्रियेत त्यातले १५ परत मिळवले. पण आता परत जोमानं सुरूवात केली आहे. पोर्शन कंट्रोल आणी व्यायाम ह्याला पर्याय नाही. पहिलटकरण्याचा उत्साह नाहीये, पण अनुभव तर गाठीशी आहे. त्याच्यावरच भर आहे.
केदार..वॉव डेटा इ.इ. सो
केदार..वॉव डेटा इ.इ. सो प्रोफेशनल.. मस्तं रे!! गुड टू सीयू बॅक ऑन ट्रॅक!!
माझे कसचे.. तुझेच आभार.. तुझ्यामुळे आता परत या धाग्या ला जीवनदान मिळालंय.. थांकु
विक मध्ये उतरेलल वजन वीक एंड
विक मध्ये उतरेलल वजन वीक एंड ला परत चढत. शुक्रवारी जी घसरण लागते ती रविवारी गाडी एकदम तळाशी. अस होऊ नये म्हणून काय करता? एकच दिवस attitude कसा घालवायचा. मागच्या वर्षभरात २१ पौंड उतरवले आहेत धापा टाकत . अजून ७ पौंड उतरवायचे आहेत पुढच्या ६ आठवड्यात. Motivation कमी पडतंय
पूर्णवेळ व्रतस्थ रहाणं
पूर्णवेळ व्रतस्थ रहाणं आपल्याला परवडण्यासारखं नाही. त्यामुळे विकेंड चा स्लॅक गृहीत धरूनच मी टारगेट आखतो.
माझ उलट होत . वीकेंडला ३-४
माझ उलट होत . वीकेंडला ३-४ तास दोन्ही दिवस क्रिकेट होत , आणी घरच खाण होत (रोज पि. सौदागर ग्रहावरून खराडी ग्रहावर जायचे असल्याने डबा अशक्यच). त्यामुळे तेव्हाच वजन कमी होते .
पण वीकेंडला वजन वाढायचे मुख्य कारण म्हणजे रात्री अन बाहेरचे खाणे. ते टाळायचा प्रयत्न करा . चमचमीत कमी अन शक्य असल्यास दुपारी खा.
तुम्ही किती खाता यापे़क्षा काय खाता हे महत्वाचे आहे .
Thanks केदार. ह्या विकांताला
Thanks केदार. ह्या विकांताला तोंडावर ताबा ठेवायचा प्रयत्न करणार. सोमवारी कळवीन नक्की काय झाल
मी चहा बिनसाखरेचा घेते पण
मी चहा बिनसाखरेचा घेते पण दुधात घालते त्या "चैतन्य कल्प" मधे साखर आहे , नुसतं दूध नाही पिऊ शकतं. असं काही आहे का दुधात घालायला ज्यात साखर नसते ?
बिन साखरेचं शतावरी
बिन साखरेचं शतावरी
हळद दूध बिना साखरेचं किंवा
हळद दूध बिना साखरेचं किंवा अगदी किंचीत साखर घालून बेस्ट लागतं, पण उष्णता वाढेल.
प्राजक्ता_शिरीन, तिबेटीयन लोक
प्राजक्ता_शिरीन, तिबेटीयन लोक चहा करताना त्यात मिठ आणि बटर घालतात. दुधात घालून चव घेऊन पहायला हवे.
ओके, बिनसाखरेचं शतावरी बघते
ओके, बिनसाखरेचं शतावरी बघते मिळालं तर. कोणत्या स्पेसिफिक ब्रँडचं आहे का ?
ब्रँड नाही माहिती ग्ग.. मी
ब्रँड नाही माहिती ग्ग.. मी अर्कशाळा सातारा चे घ्यायचे पण ते बहुदा साखरे सहित आहे
उर्जिता जैन चे बिना साखरेचे
उर्जिता जैन चे बिना साखरेचे मिळते पण त्याची चव कडवट लागते पिववल जाणार नाही.
शतावरी पावडर नुसती तुळशीबागेत
शतावरी पावडर नुसती तुळशीबागेत आयुर्वेदिक दुकानांत मिळेल.
फार वाईट लागत नाही, दुधात एक फ्लॅट चमचा घातली तर. दूधाचे प्रमाण बरे असेल आणि पावडर नीट मिसळली तर कडवट चव मास्क होते.
शतावरीने वजन वाढतं.
शतावरीने वजन वाढतं. आयुर्वेदिक डॉ च्या सल्ल्याने घ्या. दुध नुसते पिता येत नसेल तर त्यात हळाद, सुंठ पावडर, घरी बनवलेला दुधाचा मसाला, वेलची पावडर वगैरे घालता येते.
प्राजक्ता, मी प्रेगू असताना
प्राजक्ता, मी प्रेगू असताना आयुर्वेदीय अर्कशाळेचं शतावरी कल्प दुधात घालून घेत असे. हे बघ, पुण्यात नक्की मिळेल.
कल्प मधे साखर असते.. उर्जिता
कल्प मधे साखर असते..
उर्जिता जैन कडे जेव्हा आम्ही गेलो होतो तिने तिच्या क्लिनिक मधले पॅकेट दिले होते आणि त्याने वजन वाढते हे पण तिथल्या मुलिने सांगितले होते.
दुधात घालायला स्कीम्ड मिल्क
दुधात घालायला स्कीम्ड मिल्क पावडर वापरता येइइल. कोणत्याही मोठ्या कन्फेकश्नर कडे मिळेल. फक्त ती नीट ढवळावी लागते. किंचीत गोडवा येतो शिवाय पौष्टीक पण ! ( मालती कारवारकरांच्या ऑलमोस्ट प्रत्येक पुस्तकात ह्याचा उल्लेख आहे. )
मी अगदी नेटानी २ महिन्यात ४.५ किलो कमी केल. पण गेले २/३ आठवडे बारीक सारीक आजारपणांमुळे आणि आळसामुळे गाडी तिथेच थांबलीये. ( खर तर ' किती बारीक झालीस ' हे ऐकून जरा ढिलाई आलीये ). पण अजून. ३ कि तरी कमी व्हायला हवेत !!!
१५ मार्च टारगेट आहे आणि ह्या संपूर्ण वर्षात ५९ चा काटा परत ओलांडायचा नाही हे पण !
नुसतं दूध नाही पिऊ शकतं
नुसतं दूध नाही पिऊ शकतं >>>>
भाताशिवाय पोट भरत नाही..>>>>
साखरेशिवाय चहा चालत नाही>>>>>
..
इत्यादी गोष्टींवर मात करणे हेच तर करायचं आहे...
(आमच्याकडे एक उदाहरण आहे. ऋजुताला दिड लाख भरले.. पण तिले दिलेल्या सल्ल्यावर.. चहात थोडी साखर, जेवताना थोडा भात.. वगैरे वरील कारणे सांगून घेतले.. पैसे संपले.. वजन तिथेच आहे..)
हा वेडपटपणाच नाही का? याचा
हा वेडपटपणाच नाही का? याचा शरीरावर कायमस्वरूपी वाईट परिणाम होत नसेल का? आमीरखानला ही असले उद्योग करण्याची सवय आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/cine-news/sarabjit-first-look-ran...
ऋजुताला दिड लाख भरले >>>>>
ऋजुताला दिड लाख भरले >>>>> बापरे !!! एवढे पैसे भरावे लागतात
बापरे !!! एवढे पैसे भरावे
बापरे !!! एवढे पैसे भरावे लागतात>>>>> हो ना,तेही आपलेच वजन कमी करून
आणि एवढ्या पैश्यात तिची
आणि एवढ्या पैश्यात तिची सहकारी स्काईपवर येते सल्ले द्यायला... .... तुम्ही बेबो नसाल तर..
हो तिने अंबानी बंधुंना मुठभर
हो तिने अंबानी बंधुंना मुठभर चने- शेंगदाणे खिशात ठेवायचे शिकवले आहे म्हणे.....किती फी घेतली काय माहित.
ऋजुता चे रेट प्रचंड आहेत,
ऋजुता चे रेट प्रचंड आहेत, तिचं पुस्तक वाचल्यावर साईट पाहिली होती.
पण दिवेकर बाई 'डोन्ट लूज माईंड. लूज वेट' मधले काही फंडे 'विमेन अँड वेट लॉस तमाशा' मध्ये काँट्रॅडिक्ट करतात असे वाटले होते.(आता दोन्ही पुस्तके जवळ नाहीत, एकच आहे दोन्ही परत जवळ आणली तर मुद्दे लिहेन.)
आणि एवढ्या पैश्यात तिची
आणि एवढ्या पैश्यात तिची सहकारी स्काईपवर येते सल्ले द्यायला... .... तुम्ही बेबो नसाल तर>>>> शब्दच संपले
आणि एवढ्या पैश्यात तिची
आणि एवढ्या पैश्यात तिची सहकारी स्काईपवर येते सल्ले द्यायला... .... तुम्ही बेबो नसाल तर
<<
कमीत कमी खिशाचं वजन कमी होतं हेही नसे थोडके.
केदार भाऊ तुम्ही प्रेरणा आहात
केदार भाऊ तुम्ही प्रेरणा आहात आमची तेंव्हा प्लीज़ कीप इट उप
Pages