मी बाजीराव

Submitted by जित on 3 February, 2016 - 07:19

मागच्या शनिवारी whats-app वर एका भारतातल्या मित्राशी गप्पा मारताना Green-Card चा विषय निघाला अाणि मित्राने विचारल की "काय रे अमेरिकन citizenship घेणार अाहेस का?" त्यावेळी जरी त्याला म्हटल की "बघुया" तरी तो विचार काही डोक्यातुन जाईना. घरात शिरलेली माशी कशी गुणगुण करून त्रास देते तसा त्या विचाराचा भुंगा डोक पोखरू लागला. मग संध्याकाळी मित्रांबरोबर "अमृत"प्राशन करताना हीच चर्चा.

मनात विचार अाला Indian Citizenship अापल्याला मिळते ती अाई-वडलांमुळे (लग्नाच्या बायकोसारखी). भारतात राहण म्हणजे अापल्या संस्कृतीशी नात जोडून राहण. अापला देश म्हटल की एक स्थैर्य मिळत अायुष्याला, अापल्यावर कितीही वाईट दिवस अाले तरी अापला देश, अापली माणस अापल्याला सोडून देणार नाही ह्याची खात्री असते मनाला.

अशी ही Indian citizenship सोडून American citizenship पाठी धावण म्हणजे खर तर अागीशी खेळ. ती वश झाली की गगनाला गवसणी घातल्याचा अानंद. पण अमेरिकेत राहण म्हणजे सतत डोक्यावर टांगती तलवार. कुठेतरी मनात खोलवर सारख जाणवत राहत की हा देश अापला नाही, वाटत कधी ह्यांच्या policies बदलल्या अाणि citizenship रद्द झाली तर? पण अमेरिकन citizenship च्या benefits ला पण तोड नाही. ७० एक देशात without visa entry, Retirement benefits etc. अर्थात day-to-day अायुष्यात तसा काहीच फायदा नाही.

तर सांगायचं काय की American citizenship is glamorous, thrilling, हवीहवीशी, जिच्यासाठी कुठलीही risk घ्यावीशी वाटणारी, म्हणजे बाजीरावच्या "मस्तानी" सारखी, अाणि Indian citizenship is stable, अापली संस्कृती जपणारी, प्रेमळ, स्वत:हून साथ न सोडणारी, म्हणजे बाजीरावच्या "काशी" सारखी, थोडक्यात काय की अापण म्हणजे बाजीराव. (अादल्यादिवशीचा "बाजीराव मस्तानी" चित्रपट अाणि अाताच्या अमृताचा प्रभाव दुसर काय)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users