रपुन्झेल पास्कल अनं बरच काही....

Submitted by विनार्च on 1 February, 2016 - 06:29

हा आमचा नाइफ पेन्टींगचा अजून एक प्रयत्न....
माध्यम : अ‍ॅक्रलीक कलर
रंग तयार करण्याच काम डायरेक्ट कागदावरच केलं गेलय.... ( आता हा लेकीचा पॅलेट काढायचा आळस आहे की जिनीयसगिरी हा प्रश्न अनुत्तरीत आहे Wink )

रपून्झेल न पास्कल Happy
IMG_20160121_210935.jpg

वन ट्री पेन्टींग
माध्यम : जलरंग

IMG_20160201_154639.jpg

लोणावळ्याच्या रस्त्यावर आम्हाला दिसलेला सुर्यास्त.... जो आम्ही हॉटेलवर पोहचल्या पोहचल्या वहीत उतरवला
माध्यम : कलर पेन्सिल्स

IMG_20160201_155728.jpg

हे ३डी ड्रॉइंगचे काही प्रयत्न.....

IMG_20160201_160939.jpgIMG_20160201_161517.jpg

समोर गोटी ठेवून हे चित्र काढलय.... हे चित्र पुर्ण होई पर्यंत घरातले सदस्य जणू घरभर माइन्स पेरले आहेत अशा प्रकारात जपून पावल टाकत फिरत होते Proud

IMG_20160201_160518.jpg

हा आमचा फेव्हरेट घोडा .... ह्याचे बरेच व्हर्जन्स घरातल्या प्रत्येक भिंतीवर... दाराच्या मागे..वहीच्या मागच्या पानांवर पहायला मिळतात Happy
युनिकॉर्न
IMG_20160201_161447.jpg

ही आम्ही काढलेली रांगोळी
IMG_20160201_160027.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच सुंदर चित्रे आहेत. मुलीचे अभिनंदन!! गोटीचे चित्र आणि सूर्यास्त विशेष आवडले Happy मुलगी कुठे चित्रकलेचे शिक्षण घेत आहे का?

खरंच genius आहे तुमची मुलगी. खरंतर चित्रकारी आणि रांगोळी यांचं तंत्र वेगळं असतं. तिला हे दोन्ही छान जमलं आहे. Keep it up.

आता हा लेकीचा पॅलेट काढायचा आळस आहे की जिनीयसगिरी >>> अर्थातच जिनीयसगिरी Wink
सगळीच चित्रं सुंदर आहेत... खूपच आवडली.

छानच. रपुन्झेलचे डोळे, जलरंगातलं चित्र व फेव्हरेट घोडा - प्रतिभेचा साक्षात्कारच !

Pages