माझ्या शिक्षकांच्या लकबी

Submitted by गजानन on 13 March, 2011 - 10:56

आपल्या शिक्षकांच्या गमतीशीर लकबी, सवयी लिहिण्यासाठी हा धागा.

जुन्या मायबोलीवर तो इथे होता. http://www.maayboli.com/hitguj/messages/644/90465.html?1127323309

अ‍ॅडमिनटीम - कृपया या गप्पांच्या पानाचे धाग्यात रुपांतर करावे ही विनंती. या ग्रूपात धागा उघडण्याची सोय मला दिसत नाहीय.
( पण आधी काही धागे उघडलेले दिसताहेत.)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

engineering ला असताना एका प्रोफेसरनी एका मुलाला विचारले होते , "Your name is what? "
त्या मुलाला कळेचना सर प्रश्न विचारत आहेत की त्याला त्याच नाव सांगत आहेत.... Happy

आम्हाला एक गावडे मॅडम होत्या. गणित शिकवायच्या. आम्हाला शिकवायच्या नाहीत पण जबरी दहशत. सकाळी प्रार्थनेला उभे राहिल्यावर. प्रार्थना, प्रतिज्ञा आणि जन गण मन हे तिन्ही याच क्रमाने शाळेच्या प्रांगणात सगळ्यानी जमून आपापल्या वर्गानुसार रांगेत उभे राहून समुहगायनात, नजर सरळ समोर ठेवून म्हणायचे असायचे. तेंव्हा या बाई रांगांवर बारीऽऽक नजर ठेवून असायच्या. रांगेत कोणी मस्ती केली किंवा बारीकशी जरी हालचाल केली तरी नकळत कुठून कश्या बरोब्बर त्या विद्यार्थ्याच्या समोर उगवायच्या आणि खाडकन कानफटात वाजवायच्या!

या सगळ्या एकदम अटेन्शन अवस्थेत असा बार आपल्याच आजूबाजूला निघाला म्हणजे आधी दचकायला व्हायचं आणि मग आतून हश्श्याच्या अश्या उकळ्या फुटायच्या की जेवढ्या दाबून धरू त्याच्या दुप्पट फोर्साने बाहेर पडू पाह्यच्या.

आमच्या एक बाई सतत 'लक्षात घ्या!' म्हणायच्या. आम्ही त्यांचे लक्षात घ्या मोजले होते. इतिहासाच्या डबल पिरियडला १९७ वेळा म्हणाल्या होत्या. आम्हाला आपण सगळ्या (आमचा वर्ग) कसल्या डॉन आहोत असे वाटले होते.
आता गंमत अशी की बहुतेक सर्वच बॅचेसनी त्यांचे लक्षात घ्या मोजले होते. जे आम्हाला आमचे डॉन वाटून झाल्यावर कळले. Proud

आमच्या एका शिक्षकाना शिकवताना पुस्तकातला धडा पाठ करून जशास तसा म्हणून दाखवायची सवय होती. अर्थात मराठी माध्यमातून आलेली मुले, आणि ११/१२ वीला भौतिकशास्त्र इंग्रजीमधे.. त्यात शिक्षक असे.. त्यामुळे कुणाला काही कळायचे नाही. वर्गात हुशार मुले म्हणजे देसाई, जगताप , खान...
त्यांच्यापैकी कुणा एकाने 'कळलं' म्हटलं की ते खूश.. त्यामुळे एका परिच्छेद झाला की ,
Are you understanding or nothing else... ? असं विचारायचे. मुलांचे चेहरे पाहून....
Mr. Desai.... Mr. Jagatap... Mr. Khan.......
Anybody... somebody........ nobody .... हे चढत्या भाजणीत म्हणायचे..त्यातले nobody हे अर्थात निराशेने असायचे..
Should I repeat in Marathi or proceed further ... हा पुढचा प्रश्न..
आणि मग मराठी म्हटले की... टार्कू (Torque) जो असतो तो मोमेण्ट ऑफ फोर्स असतो....' असा धडा चालायचा... Happy

त्या वर्गातल्या इतर पोरांचे काय झाले कोण जाणे...? Sad

आम्हांला इतिहासाला खिरे सर म्हणून होते. अतिशय रंगून जात त्यांचा विषय शिकवताना. तितकेच सुंदर बासरीवादनही करायचे. २६ जानेवारीला शाळेतल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा मोठा सहभाग असायचा. शिकवताना आपल्या जाड भिंगांच्या चश्म्यातून पाहात वाक्याच्या शेवटी...
आँ??.. हा असे म्हणायची सवय होती. पण सरांना आणखी एक विचित्र सवय होती ती अशी की ते फळ्यावर लिहिता लिहिता मध्येच तोंडावर हात ठेऊन अंगठा आणि तर्जनीने नाक ओढत असत. खडूच्या पावडरीने ते हुळहुळत असावे. पण ते इतक्यांदा करत की त्यांना भानही नसायचे की दोन्ही हात आलटून पालटून तोंडावरयेताहेत ते.
एकदा मस्तपैकी चार पांढरी बोटे नाकाच्या बाजूला उमटली होती. आणि दुसर्‍या बाजूला दोन पुसटशी. सर पांढर्‍या मिशा आलेल्या बोक्यासारखे दिसत होते.. त्यात ते त्यांच नाक उडवून आँ? हां.. असं करायला सुरुवात झाली आणि जो काही कल्लोळ.. आवरलाय...!! Biggrin
तो अजूनही स्पष्ट आठवतोय Proud

प्राथमिक शाळेत आमचे जे मुख्याद्यापक होते, यवतकर गुरुजी, ते दोनच बोटांनी थप्पड मारायचे. अर्थात त्यांचा हातही जाडजूड असल्याने आमच्या गालावर ती दोनच बोटे पुरेशी व्हायची.

दुसरे म्हणजे कोणी टाईमपास / लक्ष देत नसलेले दिसले तर म्हणायचे - आता बर्‍या बोलाने इकडे लक्ष दे नाहीत अशी हजामत करीन.... हे म्हणताना डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताची बोटे वस्तर्‍याला धार लावल्याप्रमाणे फिरवायचे. आणि तसे करताना टॉक टॉ़क असा मजेशीर आवाज करायचे. तो आवाज ते तोंडातून काढतात की धार लावत असलेल्या वस्तर्‍याची हालचाल करताना डाव्या हाताखाली उजव्या हाताच्या बोटांनी नकळत चुटकी वाजवून काढतात की आणखी कसा हे मात्र आम्हाला बर्‍याच शक्यता स्वतः ट्राय करूनही शेवटपर्यंत कळले नाही.

जुन्या मायबोलीवरचा फॉन्ट नसल्याने ते पेज मराठी टु मराठी ट्रान्सलेट केले आणी काय घडले ते पुढे बघा.:हहगलो:

Milindaa
सोमवार, सप्टेंबर 19, 2005 - 8:11 सकाळी: पोस्ट संपादित करा पोस्ट हटवा प्रिंट पोस्ट हा संदेश वेबसाईटशी लिंक करा

बाइयी Aro ivaYaya kayaÊ TU ilaihtÜsa Kaya ए tula किलकिले AazvaNaIca ilahayacyaa Aahot TR yaÜgya TU ब्रॅन्डन XaÜQa हिल आईना ilahI. tsaa ब्रॅन्डन nasaola TR navaa ब्रॅन्डन ksaa caalaU krayacaa saaMgaayalaa nakÜca tulaa आहे.

मधमाशी
सोमवार, सप्टेंबर 19, 2005 - 9:19 सकाळी: पोस्ट संपादित करा पोस्ट हटवा प्रिंट पोस्ट हा संदेश वेबसाईटशी लिंक करा

imailaMdaÊ हू baIbaI] GaDayacao कामा मै KUp काना krtÜ. हेक्टर baIbaI nauktaca सौ $ kolyaamauLo मै% yaat EK o> CÜTIXaI व्यतिरिक्त kolaI की lakbaI vyatIir> AapNa iXaxakaMivaYayaI doKIla ilahU XaktÜ jaoNaok $ एनए AaNaKI EK baIbaI] GaDayacao कामा pDNaar naahI. baáyaacada baIbaIcao naava vaogavaogaLo pÜYT pahUna badlalyaa gaolao Aaho. mhNaUna मै baIbaI naivana AsalyaamauLo tsao सूचित kolao AahoÊ maayabaÜilakraMnaI naivana naavao saucaivalaI doKIla Aahot. (एक baIbaIvar lakbaI vaacata vaacata naMtr marazI laÜkaMcao ihMdI saarKo हेक्टर baIbaI rTaLvaaNaa हू} एनए jaa ?? ला.

हे mbutimbu
सोमवार, सप्टेंबर 19, 2005 - 10:15 सकाळी: पोस्ट संपादित करा पोस्ट हटवा प्रिंट पोस्ट हा संदेश वेबसाईटशी लिंक करा

imailandaÊ iXaxakancyaa lakbaInmaQyao% yaanaI kolaolyaa kovaL ivanaÜdI iknvaa ÌtIca Asaavyaat Asaa TR tuJaa H + naahI हो naaÆ ivasangat
XabdcClaca krayacaa TR lakbaI mhNajao sava ?? ई var बाई nao saaingatlaolyaa gaÜYTI% YAA% YAA iXaxakancyaa caangalyaa var

रश्मी, सुरुवातीचे आर्काईव्हज फाँटमुळे दिसत नाहीत. या पानावर जा. आणि त्याच्या वर अर्काईव्हज् ची यादी आहे तीही बघा. http://www.maayboli.com/hitguj/messages/644/90333.html

धन्यवाद गजानन.:स्मित:

आमच्या पिटीच्या सराना एक सवय होती. कुणीही सरावात चूकले की तू पास तू नापास असे आधीच ओरडायला सुरुवात करायचे आणी सटासट रट्टे हाणायचे. त्यामुळे मुले-मुली वचकुन असले तरी पास-नापास यावरुन त्यान्ची टिन्गल करायचे.

भारी आहेत सगळेच किस्से.
(लेखनाचा धागा असे विरंगुळा ग्रुप मधे अनेक धागे दिसताहेत. आता सोय नाही दिसत ही )

....

आमच्या वर्गावर वर्गशिक्षिका म्हणून एक बाई होत्या. त्यांचा तास असला की शेजारच्या वर्गातून काळे सर आपला तास सोडून वर्गाबाहेर येऊन उभे राहत आणि सूर लावून गाणे म्हणत

"कोणाचे काय काय काय काय चाल्लंय ?
चिऊच्या गाण्याने काऊ येतोय "

त्या बाई लाजल्या की मग हे तासावर जायचे. या क्रमात कधीच खंड पडला नाही.

आत्ता नीट वाचला हा धागा...

सोमण म्हणून एक सर शाळेत संस्कृत आणि मराठी शिकवीत. त्यांना जांभया भारी येत असत. त्यांनी प्रत्येक तासाला किती जांभया दिल्या ते तास चालू असताना आम्ही सर्व मुले मोजत असू आणि तास संपला रे संपला की तो आकडा जोरजोरात ओरडत असू >>>> काय आठवण काढली आहेस ग. आमच्या वर्गात ते आले की आधी गलका व्हायचा, मग ते चिडायचे आणि नंतर शांत होउन गालातल्या गालात हसायचे, तेव्हा वर्गातली मुल "सर, तुम्ही रामासारखे हसता" अस एकासुरात ओरडायची.. ७ वीला ते पहिल्यांदा मराठी शिकवायला आले तेव्हा मुलांनी इतक छळल त्यांना की आम्हाला ते तोंडावर म्हणाले होते. "नालायक वर्ग आहे हा, मी मुख्याध्यापकांना सांगणार आहे पुढच्या वर्षी मला या वर्गावर संस्कृत शिकवायला पाठवु नका" आणि खरच नव्हते आले.

तास चालू असताना अध्ये मध्ये उगीचच कुणालाही उभे करायची त्यांना फार खोड होती. बोट दाखवून "ए, तू उभी रहा गं!", "ए, तू उभा रहा रे!" असा आदेश सोडायचे. पण कशासाठी उभे केले ते सांगायचेच नाहीत. मग अचानक सगळ्या वर्गाला उभे करायचे आणि मग एकेक आवडीच्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला "ए, तू बस गं बाई!", "ए जोशी, तू शहाणा मुलगा आहेस. तू बस रे!" असं करून बसवायचे. ज्या विद्यार्थ्यावर राग आहे अशाला "ए पडीयार, तू जास्त आगाऊ आहेस. तो उभीच रहा!" असे म्हणायचे. >>>> येस्स्स हे पण Lol

मेश्राम सरांच्या बगळा नामकरणाच गुपित इथे इतक्या वर्षांनी उघड झाल. धन्स निंबे. Wink Proud

Pages