शब्दांजली - परिसस्पर्श

Submitted by भाग्यश्री परांजपे on 23 January, 2016 - 06:38

खरेतरं आपण दोघेही अगदी सामान्यच पण
तुझ्यात आणि माझ्यात एक गोष्ट समान
की सामान्य म्हणून जन्मलो पण
मरणं सामान्य म्हणून नाकबूल!

दिवास्वप्नच हे आपले नाही का ?
जोपर्यंत आपण नव्हतो भेटलो...

पण आताशा आपल्या आयुष्यांनी,
एकमेकांना असे काही स्पर्शलेय म्हणून सांगू?
मी तर दगडच होते पण
आता कळतेय की मी परिस आहे तुझ्याकरिता आणि
तू पोलाद अस्सल, शुद्ध, चोख बावनकशी सुवर्ण होण्याची वाट पाहणारा

कसेय ना तुझ्यामुळे मी अर्थपूर्ण...
अन माझ्यामुळे तू मौल्यवान!

आता मी पहातेय ह्या दिवास्वप्नालाही परिसस्पर्श होताना....
आणि तुला अन मला स्वप्नपूर्तीच्या दिशेने मार्गस्थ होताना...

- भाग्यश्री

Group content visibility: 
Public - accessible to all site users