खाओ सोय- चिकनसूप फॉर द स्टमक

Submitted by वर्षू. on 25 January, 2016 - 09:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

नॉर्दनमोस्ट थायलँड ची खासियत असलेले हे सूप, अगदी बँकॉक मधे ही शोधून सापडणार नाही. पोट भरण्यासाठी,बस्,एक बोल ही काफी है!! Happy
अतिशय चविष्ट आणी पौष्टिक असं हे सूप करायलाही सोपं आहे.
तर पेश आहे ,'ऑथेंटिक खाओ सोय'
लागणार्‍या जिन्नसांची यादी लंबी चौडी दिसत असली तरी तुमच्या किचन मधे यापैकी ९५% जिन्नस सापडतील..

मसाला पेस्ट करता-
१) १/२ टेबल स्पून हळद
२) ३ तेजपाने (बे लीफ)
३) १ १/२ टेबलस्पून धन्याची पूड
४) १ टेबल स्पून जिरपूड
५) २ टी स्पून आल्या ची पेस्ट किंवा इंचभर लांबी चे आले,चकत्या करून
६) १ टी स्पून पांढर्‍या किंवा काळ्या मिर्‍याची पूड
७) ३ टी स्पून किंवा आवडीनुसार तिखट चिली फ्लेक्स
८) १ लवंग
९) लसणाच्या ८,९ सोललेल्या पाकळ्या ,चकत्या करून
१०) २ मध्यम आकाराचे कांदे- उभे पातळ चिरून
११) १/४ कप कोथिंबीर मुळांसकट चिरलेली
१२) ५,६ वाळक्या लाल मिरच्या ( तिखट वर्जन)
१३) तीनेक इंच लांबी चे गालांगल
१४) काफिर लाईम ची मूठभर पाने
१५) १ टी स्पून काफिर लाईम पावडर
सूप करता

१) १ टेबलस्पून तेल
२) १ किलो चिकन ब्रेस्ट आणी लेग्स ( मोठेसेच तुकडे घ्यायचेत)
३) ३ कप होम मेड चिकन स्टॉक
(थोडे चिकन पीसेस( वेगळे घ्यायचेत- वर लिहिल्यापैकी नाही ) , बोन्स सकट भरपूर पाण्यात उकळत ठेवावे. यात सेलेरी ची पाने, एक मोठा कांदा चिरलेला, दोन लहान कॅप्सीकम चिरलेले, ४,५ लसणाच्या कळ्या ठेचून घेतलेल्या, ( पांडान लीव्ज- ऑप्शनल) आणी मीठ
घाला. खूप उकळल्यावर स्टॉक गाळून काचेच्या बरणीत स्टोअर करून फ्रीज मधे ठेवावा. आमच्याकडे हा स्टॉक , स्टॉक मधे करून ठेवलेला असतो. यातील चिकन, श्रेड करून फ्राईड राईस मधे वापरता येते.)

४) १ कॅन नॉन स्वीटंड कोकोनट मिल्क
५) २ पॅकेट्स एग नूडल्स

सजवण्याकरता
१) दोन लहान कांदे - पातळ काप करून
२) विनीगर मधील हिरव्या मिर्च्या ( रेडीमेड)
३) कांद्याच्या पाती बारीक चिरून घेतलेल्या
४) २,३ लिंबांच्या फोडी

क्रमवार पाककृती: 

१)मसाला बनवण्याकरता दिलेले जिन्नस , एकेक करून सर्व कोरडे भाजून घ्या.
(काफिर लाईम ची पाने आणी वाळक्या मिरच्या वगळून)
२) तोपर्यन्त वाळलेल्या मिरच्या, थोड्या गरम पाण्यात भिजवून ठेवा.
३) सर्व जिन्नस भाजून घेतल्यावर मिक्सरवर अगदी बारीक वाटून घ्या.
४) मोठ्या भांड्यात तेल गरम करायला ठेवा. यात मसाला पेस्ट टाकून, तेल वर येईस्तो परता.
५) ही सर्व तयारी होत असता दुसर्‍या गॅस वर कढईत चिकन चे तुकडे परतायला ठेवा. चिकन चा रंग चारी बाजूने पिवळसर झाला की गॅस बंद करा. अ‍ॅक्चुली थाय लोकं कच्चेच चिकन चे तुकडे टाकतात पण आपल्याला परतल्याशिवाय चैन नाही नं पडत.. म्हणून!!!
६) मसाला नीट फ्राय झाला कि त्यात पाणी, चिकन स्टॉक घाला. उकळी फुटल्यावर काफिर लाईम ची पाने, कोकोनट मिल्क अ‍ॅड करा.
खूप थिक नको सूप. जरूरी नुसार पाणी किंवा चिकन स्टॉक अ‍ॅड करा. आता चिकन पीसेस घालून नीट मिक्स करा.
झाकण ठेवून चिकन , मऊ शिजेपर्यन्त मंद गॅस वर ठेवून द्या.

७) तोपर्यन्त पाकिटावर लिहिलेल्या सूचनांनुसार एग नूडल्स शिजवून ठेवा.
८) खायला घेताना बोल मधे एग नूडल्स घ्या. वरून गरमागरम सूप, नूडल्स बुडतील इतके घ्या. लिंबु पिळणे मस्ट आहे. आवडीनुसार आंबटपणा कमी आधिक ,अ‍ॅडजस्ट करता येईल.

मसाला पेस्ट

ओह..हॉ.. एंड प्रोडक्ट मधे वरून तळलेले नूडल्स ही टाकायचे आहेत

वाढणी/प्रमाण: 
माणशी एक बोल .. पुरेसंय
अधिक टिपा: 

शेवटच्या फोटूत दिसणारे चिली ऑइल मी घरीच केलंय. थाय चिली फ्लेक्स ना गरम तेलात जळू न देता जस्ट परतून एका बॉटल मधे भरून स्टोअर करून ठेवलंय.
थाय इन्ग्रेडिएंट्स अमेरिकेत एशिअन स्टोअर मधे सहज मिळू शकतील.
आजकाल भारतात ही नेचर बास्केट सारख्या दुकानांतून मिळतील बहुतेक!!

माहितीचा स्रोत: 
चायनीज ओरिजिन चा थाय मित्र!!!
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा! मस्तच Happy
एक प्रश्न आहे - चिकन स्टॉक तुम्ही कुठे प्रीझर्व्ह करता? डिप फ्रीज की नॉर्मल फ्रीज? किती दिवस चांगला राहतो? त्यातले चिकन सॅलॅड्स इ. साठी वापरता की वर्‍हाडी चिकन सारख्या पदार्थात वापरता?

कसलं यम्मी दिसतंय हे! वर्षुताई काय ऐकत नाय आजकाल.

आपल्याला परतल्याशिवाय चैन नाही नं पडत.. म्हणून!!! >>> Lol

वा वा,
मस्तच दिसतेय
'सोल'वाल्या चिकन सूपहून अधिक शांती मिळेल यामुळे

चिकन स्टॉक तुम्ही कसा प्रीझर्व्ह करता? पिसेस सकट की पिसेस काढून? डिप फ्रीज की नॉर्मल फ्रीज?>>> मी पीसेस काढून स्टॉक आईस क्यूब्जच्या ट्रेमधे घालून फ्रीजरला टाकते. फ्रीज झाल्या की काढून झीपलॉकमधे भरून ठेवते. पाहिजे तशा वापरते.

तयार बोल मस्त दिसतोय.
शेवटल्या फोटोत लिंबाच्या शेजारी काये? गालांगल का?

मस्त दिसतंय.

भारतात चिकन स्टॉक चे क्यूब मिळू शकतील. गलांगल आता बिग बझार मधेही असते. काफिर लाइम मात्र बघितले नाही भारतात.

@संपदा - चिकन स्टॉक , लहान बरण्यांमधे डीप फ्रीझर मधे बरेच महिने स्टोअर करून ठेवता येते. त्यातील मिठाच्या क्वांटिटी मुळे भरपूर टिकते. पण बहुदा याचा वापर फ्राईड राईस, विविध सूप्स अश्या पुष्कळ रेसिपीज मधे केला जातो त्यामुळे इतके महिने वगैरे ठेवण्याची वेळ नाही येत.
इन फॅक्ट अंजली ने सुचवलेली पद्धत आवडली मला. बरीच जागा वाचेल फ्रीझर मधली. Happy

त्यातले चिकन , चायनीज स्टाईल फ्राईड राईस मधे आणी एशिअन सॅलड्स किंवा सीझर्स सॅलड्स टाईप च्या सॅलड मधे वापरते., वर्‍हाडी किंवा इतर इंडिअन रेसिपीज मधे अजिबात नाही वापरत..

@ योकु ... नाही ते गालांगाल नाहीये.. ग्रीन चिली इन विनिगर आहे.. रेडीमेड पिकल्ड चिली.
गालांगाल चा फोटो तुम्हाला थाय ग्रीन करी च्या रेसिपीत स्पष्ट पणे पाहता येईल

@ दिनेश- रेडीमेड चिकन स्टॉक चे क्यूब्ज?? रिअली?? त्या पेक्षा घरी केलेलं जास्त छान असेल नक्की!!!

मस्त रेसिपी !
वर्षुताई एक प्रचंड झणकेदार थाई सूप आहे पण नाव विसरलो. आठवत असेल तर त्याची पण रेसिपी टाक ना.

मस्त. Happy
तुम्ही व्हिएतनामीज सूप (फो) पण करता का? तो कन्सेप्टच प्रचंड आवडतो. त्यात एक तिखटजाळ सॉस मिळतो, साम्हौ तो घेतला की तांबड्या रस्सासारखा वास/ स्वाद येतो. पाणी सुटलं तोंडाला Happy

वॉव कसल भारी दिसतय. नक्की करुन बघणार

हे श्रीयुत टॉम कोण ह्याचा विचार करत होते Lol रेडीमेड इन्ग्रेडिएन्ट वापरुनच बनवले आहेत हे श्री टॉम, स्क्रॅच पासुनची रेसेपी दे प्लिज..

मस्त हे पण .. शोधायला हवे आता एखादे थाय फूड कोर्ट .. चार पदार्थांची नावे गाठीशी जमा झालीत आपल्या कृपेने Happy

अमितव ,विएटनामीज रेस्टॉरेंट्स मधे bun bo सूप आणी इतर स्पेशालिटीज ट्राय केल्या आहेत.. पैकी घरी फक्त राईस पेपर सलाद रोल्स बनवलेत.. ते pho सूप , मला तायवान स्टाईल मधे जास्त आवडतं. ऑथेंटिक चायनीज,
रादर कँटोनीज जेवण , विएटनामीज चवींच्या बर्‍याच आसपास आहे.

अदिती.. थोड्या दिवसापूर्वी केलं होतं घरी, स्क्रॅच पासून.. पण फोटो काढायचं लक्षात राहिलं नव्हतं.. खैर फिर सही.. खास माबो करता Happy

ऋन्मेष.. थाय फूड कोर्ट?? कि फूड कोर्ट मधे थाय स्टॉल?? सॉर्री पण भारतात मला अजून पर्यन्त कुठेही ऑथेंटिक थाय फूड मिळालेलं नाहीये.. हे सूप तुला बँकॉक मधेही नाही मिळणार रे!!

सही आहे रेसिपी! आयतीच खायला मिळावी असे वाटते आहे Happy हे टॉम यम सूपसरखंच लागतं का?
माझ्या चायनीज शेजारणीने एकदा त्यांच्या न्यू इयर पार्टीला बोलावलं होतं. तिने डायनिंग टेबल वरच कढईत सूप उकळत ठेवलं आणि बाजूला चिकन, वेगवेगळ्या भाज्या, डम्पलिन्ग्ज वगैरे ठेवलं. प्रत्येकाने त्यातले हवे ते त्या सूप मधे सोडायचं आणि थोड्या वेळाने सूप + त्यात जे काय सोडलं असेल ते असं वाढून घ्यायचं असा बेत होता. तेही सूप असंच होतं साधारण. त्याला काय म्हणतात ते विसरले आता.

माझ्या चायनीज शेजारणीने एकदा त्यांच्या न्यू इयर पार्टीला बोलावलं होतं. तिने डायनिंग टेबल वरच कढईत सूप उकळत ठेवलं आणि बाजूला चिकन, वेगवेगळ्या भाज्या, डम्पलिन्ग्ज वगैरे ठेवलं. प्रत्येकाने त्यातले हवे ते त्या सूप मधे सोडायचं आणि थोड्या वेळाने सूप + त्यात जे काय सोडलं असेल ते असं वाढून घ्यायचं असा बेत होता. तेही सूप असंच होतं साधारण. त्याला काय म्हणतात ते विसरले आता.

>>>> मै, मंगोलियन हॉट पॉट ते. इथे आहे बघ २६ नंबरचं प्रचि.

शाबु शाबु पण म्हणतात.

मस्त पाकृ!
आमच्या इथे इंटरनॅशनल मार्केटमधे गलांगल आणि काफिर लाईमची पाने कायच्या काय महाग विकतात.

सॉर्री पण भारतात मला अजून पर्यन्त कुठेही ऑथेंटिक थाय फूड मिळालेलं नाहीये.. हे सूप तुला बँकॉक मधेही नाही मिळणार रे!!
>>>>>>>>

ओके, याला मी आपल्या घरी यायचे आमंत्रण समजतो Wink

मैत्रेयी.. ते सुकीयाकी ही असेल कदाचित.. शाबु शाबु आणी सुकीयाकी दोन्ही जॅपनीज प्रकारचे हॉट पॉट आहे..
पण मंगोलियन प्रकारात किंचीत वेगळे सॉसेस वापरतात आणी लिटिल थाय कडे झुकणारी चव असते.
आफ्टर ऑल साऊथ ईस्ट एशिअन देशांच्या जेवणात थोड्या फार फरकाने काही कॉमन प्रकार आहेतच!!

शेवटचा फोटो आणि नूडल्स ड्रेन होतायत तो फोटो टेम्टींग आहे एकदम. पण पुन्हा एकदा, चिकनमुळे पास.
मला थाय रेस्टॉ.मध्ये व्हेज टॉम यम सूप, सॅलड आणि फ्लॅट राईस नूडल्सबरोबर थाय बेसिल आणि स्टर फ्राय व्हेजीज हे आणि हेच खायचं कायम क्रेविंग असतं.

ओह.. खरंच की काय ऋन्मेष.. थांब एडिट करू दे ते वाक्य.. Wink Proud

जस्ट किडिंग!! Light 1 घे. यू आर मोस्ट वेलकम!!! Happy

सायो, या सूप ला चिकन स्टॉक शिवाय पर्याय न्हाय..
पण वेज थॉम यम सूप पण खूपच छान लागतं. पपया सॅलड ही वेजीज करता मस्त ऑप्शन आहे , मायनस फिश सॉस आणी ड्राय श्रिंप्स.. Happy

Pages