आंबोळ्या

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 May, 2013 - 08:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तांदुळ १० वाट्या
मुगडाळ, तुरडाळ, मसुरडाळ, चणाडाळ, उडीदडाळ प्रत्येकी १ वाटी, पाव वाटी मेथी दाणे.

मिठ
ताक
तेल

क्रमवार पाककृती: 

आंबोळ्यांचे पिठ बनवण्यासाठी तांदूळ व सगळ्या डाळी एकत्र धुवाव्यत व उन्हात वाळवाव्यात. वाळलेल्या डाळीत मेथीदाणे घालून पिठ दळून आणावे.

आंबोळ्या करायच्या ५-६ तास आधी पिठ पाण्याने जाडसर भिजवायचे. ५-६ तासांनंतर करताना त्यात थोडे ताक घालून सैलसर करायचे व चवीनुसार मिठ घालायचे.


नंतर तव्यात जरासे तेल पसरवून त्यावर आंबोळीचे पिठ पसरायचे.

आता तव्यावर लगेच झाकण द्यायचे.

२ मिनिटांत चर्रर्र आवाज होतो मग झाकण काढायचे आणि आंबोळी उलटी करुन १-२ मिनिटे ठेवायची.

नंतर गरमा गरम आंबोळी चटणी बरोबर सर्व्ह करायची.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी २ संपतातच.
अधिक टिपा: 

काही जण घावण, आंबोळी उलटत नाहीत. पण मी उलटते कारण त्यामुळे कुरकुरीत होतात.
पाककृती हवी आहे माहीत आहे का ह्या धाग्याच्या ८२ व्या पानावर अजुन वेगवेगळ्या टिप्स मुग्धा, मंजूडी आणि सुचारीता यांनी दिलेल्या आहेत. http://www.maayboli.com/node/24273?page=81

माहितीचा स्रोत: 
पाककृती हवी आहे माहीत आहे का ह्या धाग्यावर मुग्धा, मंजूडी, सुचारिता व जुन्या मायबोलीवरील सोनचाफा यांच्या मदतीने ही रेसिपी मिळाली
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टिकेल ग ४-५ महिने किंवा त्यापेक्षा जास्तही. सगळ कोरडच तर आहे. फक्त व्यवस्थित वाळलेले हवे.

अरे हे आंबोळ्या पीठ मागे केलेलं अजून शिल्लक आहे पण मी विसरलेच होते. बरं झालं परत रेसिपी वर आली. आता उद्या करीन Happy

Anushri gharat valavle tari chalte. Fankhali ratrabhar theun purn korde karun ghe.

harsha thodya pramanat ghari dalta yete na.

लीना मला वाटते पीठ घट्टच राहिले की जाळी नाही पडणार

सुनिधी उन्हात वाळवायला ठेवले की वरून साधारण खालच्या पेक्षा मोठा सुती कपडा पसरून दगड लावले चारही बाजूनी की नाही पक्षी खाणार, प्लॅस्टिक पसरू नका कारण धान्य सुकत नाही, उन झिरपत नाही प्लॅस्टिक मधून

माझ्याकडे तयार केलेले पीठ नसते त्यामुळे मी अडीच वाट्या तांदूळ आणि त्याच प्रमाणात म्ह्णजे पाव वाटी प्रत्येक डाळ साधारण ५ - ६ तास भिजवून वाटते. भिजवताना थोडे धने पण घालते.

मला घावणे पीठ असे लिहिलेले पीठाचे पाकिट एकाने मालवण हून आणून दिले आहे . घटक तांदूळ असे छापले आहे. तर ते कसे वापरायचे???

Dhanashril

त्यातच सगळे घटक असतील. वरीलप्रमाणे भिजवून काही वेळाने करायचे. ताक गरज वाटली तरच घालायचे. मीठ बहुतेक घालावे लागेल. कोकणातील काही तांदळाना मूळचाच चिकटपणा असतो ( असेच तांदूळ आंबोळ्यांसाठी वापरतात. ) त्यामूळे चांगल्या आंबोळ्या होतात, नुसते तांदूळ असले तरी.

दिनेशदा इतर कुठलेहि घटक लिहिले नाहीत. ह्यात कांदा वगैरे घातले तर चालेल का???आणि आंबवायचे वगैरे नाही ना???

Pages