Submitted by कविता क्षीरसागर on 21 January, 2016 - 09:58
अंधार हा ….
युगांचा साचला अंधार हा
घृणेने गोठला अंधार हा
नसे ना का मला माझे कुणी
उराशी कवळला अंधार हा
कशाला माळले तू चांदणे
तुझ्यावर भाळला अंधार हा
नको लाजू प्रिये दे ओठ दे
बरे की लाभला अंधार हा
सरावाने नजर मरतेच ना
तरी का लाजला अंधार हा
पुन्हा झाले रिकामे घर , तसे
छळाया लागला अंधार हा
सुरांनी एवढे केले खुळे
निळासा भासला अंधार हा
उगा नावे कुणी ठेवू नका
खरे तर चांगला अंधार हा
कविता क्षीरसागर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुन्हा झाले रिकामे घर ,
पुन्हा झाले रिकामे घर , तसे
छळाया लागला अंधार हा <<< वा वा
एकंदर गझल तरल आहे.
उगा नावे कुणी ठेवू नका - ह्या ओळीत टायपो झाला आहे. नावे चे नवे झाले आहे.
नसे ना का मला माझे कुणी
उराशी कवळला अंधार हा <<< दर्जेदार शेर!
शुभेच्छा कविता.
धन्यवाद बेफीजी
धन्यवाद बेफीजी
वाह्...एकसे बढकर एक! पहिले
वाह्...एकसे बढकर एक!
पहिले सातही शेर खास!
मस्तंय.
मस्तंय.
छान .
छान .
सरावाने नजर मरतेच ना तरी का
सरावाने नजर मरतेच ना
तरी का लाजला अंधार हा!
सुरेख ओळी! वा!
तलम आहे. वैविध्य आहे. फार छान !
शुभेच्छा !
वाह, बढिया ....
वाह, बढिया ....
सर्वांचे मनापासून धन्यवाद !!
सर्वांचे मनापासून धन्यवाद !!
कविता... खूप छान.... अंधार
कविता...
खूप छान....
अंधार माझाही खूप जवळचा त्यामुळे
जरा जास्तच आवडली गझ़ल..
सुरेख !
सुरेख !
धन्यवाद भाग्यश्री , पाटीलजी
धन्यवाद भाग्यश्री , पाटीलजी .....
सुरांनी एवढे केले खुळे निळासा
सुरांनी एवढे केले खुळे
निळासा भासला अंधार हा...किती प्रत्ययास येणारे शब्द.....
युगांचा साचला अंधार हा
युगांचा साचला अंधार हा
घृणेने गोठला अंधार हा >>> सुंदर
नको लाजू प्रिये दे ओठ दे
बरे की लाभला अंधार हा >>> आहाहा...
नसे ना का मला माझे कुणी
उराशी कवळला अंधार हा >>> अप्रतिम