कोक्पर - ३

Submitted by उदय८२ on 13 January, 2016 - 00:59

कोक्पर - २

"त्या ट्रकमधले सगळे टार्गेट झाले का?" अॅर्नॉल्डने अचानक विचारले.
"हो. मागच्या ट्रकमध्ये चार होते आणि पुढच्यात तीन होते."
"कोणी सुटले नाही ना? नाहीतर त्यांना आपल्या पोझिशन्स कळतील आणि मग ते त्याच प्रकारे हल्ला ठरवतील."
"नाही आम्ही जिथे होतो तिथून तरी कुणीच नाही"
"ठीक आहे. कॅरी ऑन." अॅर्नॉल्ड विल्यम्सबरोबर पोझिशन्स घ्यायला निघून गेला.
"आपल्याला इथून या इमारतीवरून किमान बाराशे मीटर वेस्ट आणि एक हजार पन्नास मीटर ईस्ट्चा रोड-व्ह्यू मिळतोय. आपले स्नॅपर एक चौकाच्या या दक्षिण टोकाला एक या तीनशे मीटर दूर आग्नेयेला दगडी घराच्या वर. आणि एक मागे सहाशे मीटरवर लाल घराजवळ. एक पाचशे मीटरवर मशिदीसमोरच्या इमारतीवर. दुसरा सहाशे मीटरवर. आपल्या पूर्वेकडच्या मागच्या बाजूला. ओके? पुढच्या चौकातल्या स्नायपरकडून उत्तरेकडचा रस्ता कव्हर होईल. आणि दक्षिणेकडेदेखील तिथूनच लक्ष ठेवायचे. तो पॉइंट पर्फेक्ट आहे. दगडी घरावरून स्नॅपर पहिल्या स्नॅपरच्या मागच्या बाजूवर लक्ष ठेवेल. तिथे आतून बरेच गल्लीबोळ आहेत. चौकात यायच्या आधीच उतरून कोणी मागच्या बाजूने आले, तर त्यांना या घराच्या बाजूने जावे लागेल. तशीच परिस्थिती या उत्तर बाजूच्या मशीदीची आहे. तिथून उतरून कोणी आतून आले तर मशिदीजवळून येणार आणि मला तो एरिया बरोबर वाटत नाही. तिथे उंच इमारती जास्त आहे कोणीही स्नॅपरवर लक्ष ठेवू शकतो म्हणून मला तिकडचा स्नायपर गच्चीवर असणे बरोबर वाटत नाही खाली पंधराव्या माळ्यावरच्या फ्लॅटमध्ये राहिलं. त्या इमारतीत कोपर्‍यावरच्या खोलीत दोन स्लाइडींग विंडोज आहेत......... हो बघून आलो मी."
"तेच विचारणार होतो." डेव्हिडने डोळा मारत विचारले.
"माझे काम पर्फेक्ट असते, या बाजूने मागे त्या लाल घराजवळ जो स्नायपर असेल तो आपल्याला साठ डिग्रीला असेल. आपल्या पूर्वेला असणार्‍या बिल्डिंगमुळे गाडी पुढे गेल्यावर आपल्याला दिसणार नाही. त्यासाठी आपल्याला पुढे जावे लागणार. त्यामुळे गाडीवर लक्ष ठेवण्याकरिता हा पॉइंट महत्त्वाचा आहे. आपल्या मागच्या पॉइंटवर असणारा एकशेऐंशी डिग्रीत लक्ष ठेवेल. त्याचा पॉइंट मशीद ते लाल घराजवळचा स्नायपर आणि नंतर गाडी पुढे गेल्यावर त्याचा व्ह्यू त्यापुढच्या रस्त्यावर. इज दॅट क्लिअर? एनी डाउट्स सार्जंट?" विकी म्हणाला.
"तू पिरॅमिड व्ह्यू बनवत आहेस विकी? " डेव्हिडने लॅपटॉप मध्ये डाटा अपलोड करता करता आश्चर्याने विचारले.
"हो..." डोळे मिचकावत विकी मिश्किलपणे म्हणाला.
"ठीक आहे. कॅरी ऑन.. लक्षात ठेव तू आपल्याला पिरॅमिडच्या केंद्रस्थानी ठेवले आहेस. अश्या वेळेला आपल्याला गरज पडल्यास लगेच कोपर्‍यात जाता येणार नाही. त्यासाठी तुला स्कोप ठेवायला लागेल." डेव्हिडने विकीला वेळीच सावध केले. विकीच्या लक्षात आले नव्हते की हल्ला झाल्यास सगळे एकदम अॅक्टिवेट होणार होते. अशावेळी सगळ्याबाजूंनी गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला तर कोणत्याही पॉइंटला अचानक मूव्ह होऊन ती जागा मोकळी करता येणार नव्हते. कारण पिरॅमिड व्ह्यू मध्ये प्रत्येकजण एकमेकांचा सपोर्टर असतो. हलचाल करताना ऑर्डर द्यावी लागते मग कोणत्या पॉइंटला ती द्यायची हा देखील प्रश्न उद्भवतो आणि ती थांबली तर रिस्क जास्त असते. हाच मुद्दा डेव्हिडने विकीच्या लक्षात आणून दिला. खरंतर विकी सारख्या अनुभवी ऑनफिल्ड मॅपमेकरला हे लक्षात आलेच असते. रायनोला स्टारव्ह्यु हवा होता पण त्यासाठी कुमक पॉइंटवर जास्त खर्ची पडली असती. म्हणून तो व्ह्यू सोडावा लागला.
"अजून एक. प्रत्येक स्नायपरजवळ दोन-तीनची पोझिशन्स. दोघांपैकी एक वॉच ठेवणार आणि एक त्या जागेची सुरक्षा करणार आणि अपडेट देत राहणार. तीन जण त्या पॉइंटवर लक्ष ठेवणार." रायनो ने माहितीत भर टाकली.
"चला एक वाजला आता ट्रुप्स येतील. हे ऑपरेशन क्रॉसिंग आपण मरिन्स आणि सील्स संयुक्तरीत्या करणार आहोत. मरिन्सची एक बटालियन आपल्या मदतीला येत आहे. त्याचे नेतृत्व सेकंड लेफ्टनंट मायकल वेलास करणार आहे. सव्वाशे ते दीडशे सैनिक आपल्याला मिळतील अशी शक्यता आहे सेकंड लेफ्टनंट मायकल इथे आल्यानंतर मेजर अॅर्नॉल्ड त्याला ट्रुप्स हँडओव्हर करेल. अरेंजमेंट्स रायनो बघेल. विल्यम्स, रायनो आणो मी इथे असू. अॅर्नॉल्ड, तू समोरच्या दगडी घराच्या पॉइंटवर आणि विकी लाल घराच्या पॉइंट वर.. एनी डाउट्स?" डेव्हिड लॅपटॉप बंद करून बोलला.

सॅटेलाईटफोन वाजला.
"वॉरहेड कमिंग. वॉरहेड कमिंग"
"रॉजर दॅट. मेजर कमांड डेव्हिड. ओव्हर"
"जनरल लॉट्स हिअर, पोझिशन्स क्लिअर. ओव्हर"
"कॉपी दॅट, 35-40 नॉर्थ 40-27 ईस्ट. ओव्हर"
"ट्रूप्स इन्कमिंग विदिन 20 मिनिट्स, मेजर मायकल वेल्स कमांडिंग. ओव्हर"
"कॉपी, आमची तयारी झाली आहे. स्नायपर बरोबर दोन-तीन पोझिशन्स बिल्ड, ऑपरेशन कमांडर मेजर अॅर्नॉल्डच्या हातात आहे ओव्हर"
"गुड, कॅरी ऑन, नो सिव्हिल कॅज्युअल्टीज, डोंट इंटरफ़िअर विथ पब्लिक अँड लोकल ट्रूप्स, आपण इथे फक्त "ऑपरेशन क्रॉसिंग"साठीच आलो आहे. डु द जॉब अँड मूव्ह बॅक. स्टे कनेक्टेड विथ मी. ओव्हर अँड आऊट."

थोड्याच वेळेत आर्मीच्या व्हॅन्स आणि हॅमर्स इमारतीजवळ उभ्या राहिल्यात. त्यातून मोजकेच सैनिक बाहेर पडले. त्यात मेजर मायकल देखील होता. अॅर्नॉल्ड आधीच खाली येऊन थांबलेला.
"वेलकम मेजर, आय ऍम मेजर अॅर्नॉल्ड.. " मायकलशी हस्तांदोलन करत अॅर्नॉल्ड म्हणाला.
"हॅलो मेजर.. जनरलने एक कंपनी पाठवली आहे अचानक इराकसीमेवर प्रॉब्लेम आल्यामुळे इथे मी फक्त ८० सार्जन्ट घेऊन आलो. वन ब्लॅकबर्ड इन एअर. मला देखील परत जावे लागणार आहे. होप यू विल हँडल द सिचुएशन."
"ओन्ली एटी? नेव्हर माइंड मेजर. आम्हाला सवय आहे या प्रकाराची.. चला आपण वर जाऊन पोझिशन्स बघून घेऊ." अॅर्नॉल्ड त्यांना गच्चीवर घेऊन आला. वरती सगळ्यांनी आपापले परिचय दिले. अॅर्नॉल्डने ही माहिती लागलीच दिली की आपल्याला सव्वाशे ऐवजी ऐंशीच सैनिक दिले आहेत. काय आणि कोणत्या प्रकारचे सैन्य आणि हत्यारे आहेत आणि मेजर मायकल देखील आपल्या बरोबर नाही. हे कळल्यावर कुणाला ही आश्चर्याचा धक्का बसला नाही जणू काही हे रोजचेच होते. युद्धकाळात अचानक काहीही घडू शकते अशामुळे अशी लवचिकात ठेवावीच लागते. रायनोने मॅप उघडून बोलायला सुरुवात केली.
"ठीक आहे आपल्याकडे ऐंशी आहेत. त्यातले बहुतांशी ग्रेनेड आणि मशीनगन्स ट्रूप्स आहेत. स्नायपर्सची एक टीम आहे. पावणेदोन वाजले आहेत. आम्ही पाच पॉईंटवर एक-एक स्नायपर आणि २-३ ची अरेंजमेंट्स ठरवली आहे मेजर मायकल मला तुमच्या टीम मधले तीन स्नायपर हवेत."
"सार्जन्टस अल्बन, सॅमी,जॉर्जी, रुसलान, अॅल्विन, दिमित्री, तात्सुओ हे सात स्नायपर आहेत तुम्ही निवडा. ऑल आर इक्वल्स"
"ह्म्म्म्म दिमित्री, तात्सुओ, जॉर्जी... दिमित्री चेकपॉईंट सुपरमार्केट, तात्सुओ मशीद पॉइंट आणि जॉर्जी हा आपल्या मागचा पॉइंट क्लिअर? राहिलेले अल्बन विकीबरोबर, सॅमी अॅर्नॉल्ड बरोबर"
"दिमित्रीबरोबर आणखी एक जोड. एक साऊथ वर आणि एक नॉर्थवर लक्ष ठेवेल." विकी म्हणाला.
"बरोबर. मग रुसलान दिमित्रीबरोबर आणि अॅल्विन तात्सुओ बरोबर राहील."
"माझ्याबरोबर स्नायपर?? मला नाही वाटत रायनो तिथे दोघेतिघे हवेत. सॅमीला जॉर्जीबरोबर ठेव. त्याचा कव्हर एरिया मोठा आहे. मला फक्त दिमित्रीची मागचीच बाजू सांभाळायची आहे. "
"अॅर्नॉल्ड वॉज राईट रायनो." डेव्हिडने सांगितले.
"ओके बॉस पोझिशन्स क्लिअर... लेट्स अपडेट डाटा टू ब्लॅकबर्ड. दे गिव्ह अस मुव्ह्स" रायनोने वर आकाशात त्यांच्या जवळ येणार्‍या हेलिकॉप्टराकडे बोट दाखवले.
"दोन वाजलेत. स्नायपर्सना पोझिशन्सवर पोहचवा. मेजर मायकल, तुम्ही सैन्य त्या त्या ठिकाणी पेरायला सुरू करा, विल्यम्स तू यांच्यासोबत जा आणि परत आल्यावर पकडलेल्या लोकांची तपासणी रायनो बरोबर कर. बत्तीस सार्जन्ट्स पोझिशन्स वर आणि अठ्ठेचाळीस सार्जन्ट्स फील्डवर. रायनो तू इथे थांबून ब्लॅकबर्ड्शी को-ऑर्डिनेट कर. मी या सार्जंन्ट्सना घेऊन आठशे मीटरच्या सर्कलमध्ये सर्च ऑपरेशन सुरू करतो. पाचच्या आत आपल्याला एरिया क्लीअर करून घ्यायचा आहे." डेव्हिडने हुकूम सोडला.
मायकल आणि विल्यम्स आपापल्या गन्स घेऊन त्यांच्या सार्जन्ट्सना पॉइंट्सशी घेऊन जायला निघाले. दोन व्हॅन्स आणि तीन हॅमर त्यांच्या सोबत निघाल्या. अॅर्नॉल्ड आणि विकी साथिदारांसहीत रस्त्याच्या बाजूने गल्लीबोळातून लपत कुणालाही सुगावा न लागू देता आपल्या पॉइंट्सकडे निघाले. डेव्हिडने आपल्या साथीदारांचे दहादहाचे चार गट केले.
"सार्जंन्टस, मी मेजर कमांडर डेव्हिड तुमचे नेतृत्व करणार आहे.. ऑपरेशन क्रॉसिंग काही वेळात सुरू होईल. त्या आधी आपल्याला आठशे मीटर परिघातला एरिया चेक करून घ्यायचा आहे. प्रत्येक घर, प्रत्येक इमारत, त्यातले रहिवासी, सगळ्यांची तपासणी करायची. कुणावर संशय आला तर लगेच त्याला बाहेर काढून सेंट्रलब्लॉक जवळ आणायचे. आठ जण इथेच राहतील पकडून आणलेल्यांवर लक्ष ठेवण्याकरिता. इथे आल्यावर त्यांची कसून तपासणी करा. त्यांचे फिंगरप्रिंट्स, फोटो घ्या. सगळ्यांना इथे आणल्यावर विल्यम्स आणि रायनो तपासणी करतील. मेजर रायनो वर आहे त्यांच्याची संपर्क साधून डेटाबेसमध्ये तपासा. आपल्याला हवे असलेल्या लोकांमध्ये यांच्यापैकी कोणी आहे का? एकही संशयित तपासणी न करता जाऊ नये. बायका- मुलांना त्रास देऊ नका. त्यांची बसण्याची सोय वेगळ्या फ्लॅट्स मधे करा. आणि नो सिव्हिल किलिंग हे लक्षात राहू द्या. आपल्याला इथे केवळ ऑपरेशनसाठीच बोलवले आहे. त्यांच्या रोजच्या कामांमध्ये हस्तक्षेप करू नका. लोकल पोलिस, इत्यादींच्या भानगडीत पाडू नका.. काही गडबड असेल तर समोरून गोळी आल्याशिवाय ओपन फायर करू नका. शक्यतो स्नायपर्सना टार्गेट लेसर द्या. इथले लोकं आपले शत्रू नाहीत हे नेहमी लक्षात ठेवा. इज दॅट क्लिअर? नाउ टीम ए तुम्हाला 35°01'13.9"N 40°27'25.5"E मशीद एरीया ते 35°01'02.4"N 40°27'35.6"E या इमारतीच्या मागे चर्चपर्यंत शोधायचा आहे.. टीम बी तुम्हाला 35°01'11.4"N40°27'00.9"E दगडी घरापासून ते 35°00'57.9"N 40°27'13.9"E लालघर एरिआ शोधायचा आहे. टीम सी तुम्हाला 35°01'23.1"N 40°27'06.4"E हा चौकसभोवतालचा एरिया बघायचा आहे. आणि टीम डी तुम्ही माझ्याबरोबर असाल आपल्याला हा पूर्ण रस्ता क्लीअर करायचा आहे. टीमलिडर्स काही ठिकाणी वॉच ठेवण्यासाठी सैन्य ठेवू शकतात. एनी डाउट्स ? लेट्स मूव्ह सार्जंट्स"

पाठीला आपली स्नायपर Barrett.50 Cal अडकवून आणि हातात एम२७ रायफल घेऊन डेव्हिड टीम बरोबर पुढे झाला. तो पर्यंत बाकीच्या टीम्स आपापल्या ठिकाणी निघाल्या. सर्च ऑपरेशनमध्ये एक सार्जंट घराचा दरवाजा धक्का मारून उघडतो तर दुसरा एका बाजूने आत घुसण्याच्या तयारीत असतो त्याचबरोबर आतून कोणी हल्ला करू नये म्हणून दारासमोर जरा दूर अजून एक सैनिक तयारीतच असे. आत गेल्यावर सगळ्या लोकांना एकत्र करणे ओळखपत्रे तपासणे चालू होते. कुणाच्या घरात जबरदस्ती घुसणे हे डेव्हिडचे नावडते काम. पण नाइलाजाने करावेच लागत होते. एकेक करून घरात-इमारतीत घुसून तपासणी करणे चालू होते. ज्यांच्या कागदपत्रांमध्ये गडबड वाटत होती त्यांना सेंट्रलब्लॉकजवळ आणले जात होते. डेव्हिड आणि सहकारी एका इमारतीत गेल्यावर तपासणी करत असताना दोन व्यक्तीवर संशय येउ लागला.

:क्रमशः

कोक्पर - ४

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users