Submitted by सांजसंध्या on 15 March, 2013 - 13:45
दिवे देत नाही
काल एका कवीच्या, गाली होत्या खळ्या
चष्मा उचलून म्हटले "ते", अल्सर आहे खुळ्या
पुन्हा होती कवितेत, काळजामधे चिता
पुस्तक काढून म्हटले ते, पोर्शन कुठे होता
जास्वंदीच्या ओठांना, भुंगा दंशून गेला
स्केच काढून म्हणाले, ओठ कुठे गेला
मी ही आता ठरवलंय, हुश्शार जरा होऊ
लपून छपून झाडीमधे, टोचा मारत जाऊ..
कविता आता शिकणारै, मेडीकलला जावून
कथा लिहून देईन बाई, टॅलीक्लास लावून
तरीदेखील म्हणेल कुणी , हद्द झाली बाई
म्हणेना का लगेच आम्ही, दिवे देत नाही :हहगलो::फिदी::खोखो::हाहा:
- संध्या
( कवितेत काही शास्त्रीय चुका असतील तर कळवाव्यात ही नम्र विनंती :दिवा:)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
(No subject)
(No subject)
कॉमर्सलाला जाईन घेईन, कादंबरी
कॉमर्सलाला जाईन घेईन, कादंबरी लिहून >>> टायपो आहे का?
गिरीकंद, थँक्स लक्षात आणून
गिरीकंद, थँक्स लक्षात आणून दिलंस ते. डन डना डन
गिरीकंद, लोक म्हणतात खळ्या आतल्या बाजूला पडतात का ? मग गालास तोंड नसते का म्हटले ?
कॉमर्सलाला जाईन,>>>>>>>>>>>हे
कॉमर्सलाला जाईन,>>>>>>>>>>>हे पण दुरुस्त कर.
केलं शोभा ते ही. पाकळीला
केलं शोभा ते ही.
पाकळीला गुलकंद कसा द्यायचा म्हणून ला ला ला ठेवला होता पाकळी म्हणजे बॉटनीची आणि गुलकंद फूड क्राफ्ट इन्स्टिट्यूटचा...कुठं कुठं शिकायला जायचं !!! अजून बायोलॉजी पण राह्यलंय. ट्रॅप(सापळा) वापरायसाठी स्केलेटन शिकायचाय..
पाकळीला गुलकंद कसा द्यायचा
पाकळीला गुलकंद कसा द्यायचा म्हणून ला ला ला ठेवला होता हाहा पाकळी म्हणजे बॉटनीची आणि गुलकंद फूड क्राफ्ट इन्स्टिट्यूटचा...कुठं कुठं शिकायला जायचं !!! अजून बायोलॉजी पण राह्यलंय. ट्रॅप(सापळा) वापरायसाठी स्केलेटन शिकायचाय..>>>>>>>>>>>>.शिका. शिका. सगळ शिकून घ्या. म्हणजे नवीन कविता करायला सोप्प होईल.
नक्की नक्की. आता युरेनियमचं
नक्की नक्की. आता युरेनियमचं हाफ लाईफ शिकायला जाणारै.. म्हणजे एकाचे दोन, दोनाचे चार कसे होतात ते शास्त्रीय दृष्ट्या कळेल तरी
आता मात्र घ्याच
ती दिवा लावते काळजात
ती दिवा लावते काळजात थरथरता
रोजचा गडद पदरात थोपवुन वारा.................. ह्या गदीमांच्या ओळी उगाचच आठवल्या.
आपल्या सुंदरशा कवितेच्या प्रतिक्षेत!!
हम्म. प्रयत्न करीन.
हम्म. प्रयत्न करीन. धन्यवाद.
इतरपापफ़लानि यथेच्छया विलिख तानि सहे चतुरानन
अरसिकेषु कवित्त्वनिवेदनम् शिरसि मा लिख मा लिख मा लिख
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
हम्म
हम्म
निखळ हास्याच्या फुलझड्या
निखळ हास्याच्या फुलझड्या
काहीच्याकाहीम्हंजेकाहीच्याकाह
काहीच्याकाहीम्हंजेकाहीच्याकाहीच्याकाही??
कैच्याकैच्च दिवे नकोत
कैच्याकैच्च
दिवे नकोत ना...बरं इथे लावलेत तेच पुरेत बरं एक तरी घ्येच्च!!!!
खरंचै. कैच्याकै सर्वांचे
खरंचै. कैच्याकै
सर्वांचे आभार
मजेदार
मजेदार
सही आहे.
सही आहे.
सगळ्या कवी लोकान्नी या
सगळ्या कवी लोकान्नी या कवितेचा जरुर जरुर अभ्यास करावा ही नम्र विणंती!
या शासनाच्या काळात शंभर
या शासनाच्या काळात शंभर रूपयाला दिवे मिळतात ते पण एलईडी, आधी परवडतच नसतील ना !
सांजसंध्या किती छान नाव आहे
सांजसंध्या किती छान नाव आहे की नाही कापोचे
अरे मुला ज्येष्ठ नागरिकांची
अरे मुला
ज्येष्ठ नागरिकांची ही कसली रे थट्टा ? आता का माझं वय राहीलं अशा प्रश्नांची उत्तरे देण्याचं ? ही संध्याबाळ ही भांबावली असेल बिचारी या अनपेक्षित हल्ल्याने.
काय सांगु तुम्हाला कापोचे ,
काय सांगु तुम्हाला कापोचे , कसली सुंदर होती सांजसंध्या , गेली बिचारी
अरेरे !
अरेरे !