एलोरा लेणी एक भव्य अनुभव .

Submitted by विश्या on 15 January, 2016 - 05:43

जानेवारी महिन्याच्या पहिल्याच साप्ताह मध्ये ,एक ट्रीप झाली आणि वर्षाची छान सुरवात झाली (आई वडील आणि आजी आजोबा असल्यामुळे जास्त भर मंदिर आणि देवांची ठिकाणे पाहण्यावर होता )

प्रवास सुरु - कोल्हापूर - आई अंबाबाई - नायकबा - पाल चा खंडोबा - पुणे - शिरडी - औरंगाबाद - दौलताबाद - खुलताबाद - भद्रा मारुती - घृष्णेश्वर ( बारा पैकी एक जोतिर्लिंग ) - एलोरा लेणी - बिवी का मकबरा - देवगड चे दत्त मंदिर - शनि शिंगणापूर - मोरगाव चा गणपती - जेजुरीचा खंडोबा - पुणे - प्रती बालाजी मंदिर केतकावळे- कोल्हापूर

प्रथम दर्शन पाल चा खंडोबा - कराड , जिल्हा सातारा .
rsz_pal-01.jpg

एक सेल्फि
rsz_palicha_khondoba_0.jpg

पाली नंतर - पुणे व तीतून पुढे सरळ नगर साई बाबा दर्शन शिर्डी . येथे फोटोस परवानगी नसल्याने फोटो नाही काढले . शिर्डी ला म्हणावी तशी गर्दी नसल्यामुळे अवघ्या तासाभरात दर्शन घेऊन पुढील प्रवास सुरु झाला औरंगाबाद च्या दिशेने .
औरंगजेब च्या शहरात म्हणजेच औरंगाबाद . अजून बर्याच वास्तू आणि आठवणी तस्याच ताज्या आहेत इतिहासाची साक्ष देणाऱ्या , त्यातीलच हा एक किल्ला दौलताबाद .

दौलताबाद .
भारत माता मंदिर प्रवेशद्वार
dau-1.jpg

तोफांचा खजिनाच आहे जणू या किल्ल्यावर त्यातल्याच काहींचे फोटो .
dau-2_0.jpgdau-17.jpg

या तोफेच्या पुढील बाजूस हिंदुनी आपली प्रतिमा कोरली आहे तर मागील बाजूस उर्दू भाषेत काही वाक्ये लिहिली आहेत .
rsz_img_20160108_160743.jpgrsz_img_20160108_160752.jpg

आत जातानाच आमाला मानव जन्माचे पूर्वज दिसले निवांत क्षणी मग काय टिपले त्यांना पण .
rsz_dau-3.jpg
किल्याच्या आतील प्रवेशद्वार
dau-4.jpgdau-5.jpg
त्या काळातील पाण्याचा जमिनीत पुरलेला माठ .
dau-6.jpgdau-7.jpg
एक मोठा बुरुज .
dau-11_0.jpgdau-12.jpgdau-15.jpg

एक स्मायली ....... सहजच
ek_smile2.jpg

सूर्यदेवता हि जणू त्या किल्याला सोनेरी प्रकाशानेच मडवत असेल
dau-16.jpg

अखेर अमी दौलताबाद ची दौलत नयनांनी लुटून पुढे प्रस्तान केले ते सरळ भद्रा मारुती मंदिर .
या मारुतीचे वैशिस्ट म्हणजे पूर्णपणे आकाशाकडे थोंड करून सरळ झोपलेली मूर्ती आहे , मूर्तीच्या चारी बाजूने काचेची पेटी असते ती आरती पुरती काढून ठेवली जाते .
फोटो नाही काढता आला .
तीतून पुढे आमचा प्रवास सुरु झाला तो घृष्णेश्वर . महादेवाचे एक मंदिर ( बारा जोतिर्लिंग पैकी एक ) या मंदिराचे पण एक वैशिस्ट आहे , पुरुषांनी गाभार्यात जाताना उघडे जावे लागते ( बनियन पण काढून जावे लागते ) .
दर्शन झाल्यानंतर तितेच अमी एक ठिकाणी निवास व्यवस्ता होईल अश्या ठिकाणी रूम घेतल्या आणि वस्ती केली .

तिसरा दिवस हा पूर्ण पने वेरूळ ची लेणी पाहण्यासाठी राखीव ठेवला होता .
बरेच फोटो काढले पण त्यातील अगदी ठराविकच फोटो इथे टाकत आहे .
लेणी नंबर -१६ सर्वात जास्त आकर्षित करणारी आणि सर्वात मोठी लेणी कैलास .
rsz_img_4302.jpgleni-3_0.jpg

अतिशय प्राचीन जवळ पास ६०० वर्षापूर्वी कोरलेली हि लेणी जणू आपल्या भारतीय कला कौशल्याचे प्रतीकच आहेत .
एक डोंगरामध्ये वरून खाली आणि बाहेरून आत मध्ये कोरलेली हि लेणी जी आजच्या संगणक युगाला पण सहज स्पर्धा करू शकतील .
leni-6.jpgleni-7.jpg

काही परदेशी पर्यटक या कलाकृतीला आपल्या डोळ्य्मध्ये साठवत विचारात मग्न कसे कोरली असतील बरी हि लेणी .
leni-22.jpg
लेण्यामध्ये पण खूप वेगवेगळा इतिहास लपलेला होता पण तो जाणून घेण्याइतका वेळ नसल्याने फक्त फक्त फ़ोटोन्वरच समाधान मानले .
leni-10.jpgleni-10.jpgleni-12.jpgleni-13.jpgleni-14.jpgleni-15.jpgleni-16.jpg

माझी छकुली ही खूप खुश होती , नवनवे पोज देत होती फोटो साठी .
ek_smile-4.jpgek_smile.jpg

काही नवीन लेणी .
leni-18.jpgleni-19.jpgleni-20.jpgleni-21.jpgleni-23.jpgleni-24.jpgleni-25.jpgleni-27.jpgleni-28.jpg

काही नवीन फोटो माझ्या परदेशी मित्रांसोबत .
pardeshi_pahune.jpg

सर्वात सुंदर आणि अद्भुत अशी ही एक बुद्ध लेणी , कारागीर्तेचा एक अद्भुत नमुनाच .
leni-69.jpgleni-39.jpgleni-65.jpg

एक मोठी पिंड .
leni-44_0.jpgleni-63.jpgleni-77.jpgleni-83.jpg

अखेर लेणी आणि इतिहास मनात साठवून आमचा पुढील प्रवास पुढे सुरु झाला तो औरंगजेब ची कबर पहिली आणि सरळ पुढे पहिला तो बिवी का मकबरा .
B kM-1_251x335.jpg
हीच ती कबर जिच्यासाठी हा सगळा महाल बांधला गेला .
B kM-4_671x501.jpgB kM-10_426x318.jpgB kM-9_426x318.jpgB kM-7_1030x769.jpgB kM-5_671x501.jpg

बिवी का मकबरा अवघ्या १.३० तासात उरकून पुढे प्रस्तान सरळ देवगड (कोकणातील देवगड नाही बर का )
देवगड हे छोटेशे खेडे गाव आहे औरंगाबाद - अहमदनगर रोडवर तिथे " श्री गुरुदेव दत्ताचे अतिशय प्रसन्न असे मंदिर आहे " हे ठिकाण आणि क्षेत्र इतके प्रसन्न आहे कि आमचा तिसरा मुक्काम इथेच ठरला .
मंदिराच्या बाहेरील मोकळी जागा , अतिशय स्वच आणि प्रशस्त
guru-3.jpgguru-6.jpg

मंदिराचे महाद्वार मंडप कमान .
guru-1.jpgguru-12.jpgguru-13.jpg

महाद्वारातून आत गेल्यानंतर दिसते ते दत्त मंदिर - एक नदीच्या तीरावर वसलेले हे मंदिर जवळपास ६० वर्षापूर्वी जीर्नोद्वार केलेले आहे
guru-14.jpg
मंदिराच्या मागेच नदीचा घाट आहे जिथे रोज संध्याकाळी बरेच साधू तपस्या करत असतात .
हाच तो घाट , पण अपुर्या पावसाभावी नद्या कोरड्या पडल्या आहेत .
guru-.jpgguru-10.jpgguru-8.jpg
या क्षेत्रावर लोकांना राहण्यासाठी एक भक्तनिवास आहे तेथे उत्तम अशी राहण्याची आणि जेवणाची सोय आणि ते ही अल्प खर्चात केलेली आहे - हाच तो भक्त निवास .
guru-2.jpg
आमची आजी .
guru-4.jpg
भक्तनिवासाच्या मागेच एक शेत तले होते त्याचा एक फोटो .
guru-15.jpg

अखेर ३ दिवसाच्या फिरती नंतर आमचा परतीचा प्रवास सुरु झाला - आणि येता येता एक नावाजलेले तीर्थ क्षेत्र शनि शिन्गापूर . याचे क्षेत्राचे वैशिस्ट प्रत्येकाला माहित आहेत . येथे कोणत्याही घराला , दुकानाला , बँकांना दारे नाहीत .
maruti-2.jpg
हेच ते शनि देवतेचे मंदिर .
maruti-3_0.jpg
फोटोस परवानगी नसल्याने जास्त फोटो नाही काढले .
परतीच्या प्रवासात सुरवात .

येतेवेळी एक रांजणगाव , मोरगाव , जेजुरी अशी अनेक ठिकाणे फिरायची तो पण वेळे अभावी मोरगाव गणेशाचे दर्शन घेतले , तितेच महाप्रसादाचा आस्वाद घेतला आणि सरळ वारी पुढे जेजुरी गडावर .
jeju-3.jpgjeju-4.jpg

जेजुरीच्या खंडे रायाचे दर्शन घेऊन सरळ पुणे , पुणेकरांना त्यांचा घरी सोडून कोल्हापूर चे मंडळी सरळ N H -४ वरून थेट कोल्हापूरला रवाना झाले , जाता जाता प्रती बालाजी केतकावळे , येथे दर्शन घेतले आणि रिटर्न back टु होम .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान फोटो.
बरीच मोठी सफर झाली तूमची.
मला वेरुळची लेणी कधीची बघायची आहेत, जाणंच होत नाही.
देवगड मात्र बघितलंय. त्याच्या जवळपासही बरीच मंदीरे आहेत ( एका अष्टविनायक यात्रेतच दाखवली होती. )

धन्यवाद बी आणि दिनेशदा , पहिल्याच प्रतिसादाबद्दल .
दिनेशदा वेरूळ ची लेणी जितकी छान आहेत तितकीच छान अजिंठा ची लेणी पण आहेत असे ऐकून आहे पण आमच्या कडे वेळ कमी असल्याने अमी तो बेत या ट्रीप मध्ये घेतलाच नव्हता .

यो नम्स्ते !
ते जरा घृष्णेश्वर करायचे मनावर घ्या प्लीज.

नशीब ऋ. बाळ इतका नाही फिरला नायतर, एक एक टिकाणासाठी एक एक धागा सोसावा लागला असता.

पण ते भ्रुष्णेश्वर नाहीये तर घृष्णेश्वर आहे. >> अरेरे. असे पण आहे का धाग्यात. एवढे वाचवले आणि बघवले नाही.
शिर्षकासाठी आलो फक्त.
मराठी माणसाने वेरुळ एवजी एलोरा लिहीण्याचे काय कारण असावे?
मुळ नाव वेरुळ आहे ना? आणि हे महाराष्ट्रात आहे ना? ऐतिहासीक दृष्ट्याही तेव्हाची संस्कॄती मराठीच होती ना?
आपणच हे सगळे पाळले नाही तर ईतर तरी कशाला पाळतील?

बापरे चांगलीच मोठी आहे ही सफर.. आणी बरोबर असलेल्या सीनिअर सिटिझनांनी ही एंजॉय केली हे विशेष!! Happy
अजंठा वेरूळ , चारेक वर्षांपूर्वी पाहिलं, अगदी प्रायमरी पुस्तकातला इतिहासाचा धडा हा असा समोर उभा पाहून
इतका रोमांच अनुभवला ना!!!!

छान फोटो.

लेण्यांचे फोटो पाहताना बरेचदा बोरीवली राष्ट्रीय उद्यानाजवळील कान्हेरी गुफांचेच फोटो बघतोय असे वाटले. एलिफंटाही अर्थात फार काही वेगळे नाही, पण मी तिथे एकदाच गेलोय आणि कान्हेरी गुफांच्या इथे ७-८ वेळा. एकंदरीत बरेच साधर्म्य असते लेण्यांत.

मस्त फोटो. फार मोठा प्रवास केलात.

छान वाटलं. आम्ही काही वषे श्रीरामपुरला होतो तिथुन हे देवगड अगदी जवळ, ब-याचदा गेलोय. प्रसन्न आणि सुंदर परीसर. गंमत म्हणजे आमचं गाव कोकणात देवगड तालुका त्यामुळे देवगड म्हटलं की तिथल्या लोकांना वाटायचं, जवळ तर आहे तुमचं गाव. Happy

वेरुळ लेणी, घृष्णेश्वर मंदीर, भद्रा मारुती मंदीर, शनी शिंगणापुर इथेही जाऊन आलो. किल्ला मात्र बाहेरुन बघितला आणि बिबिका मकबरापण बाहेरुन बघितला. शिर्डीला ब-याचदा गेलो.

आज विशालभाऊ तुमच्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या. छोकरीचा फोटो खुप गोड.

खूपच छान

एलोरा नाव पण तसं अगदीच इंग्रजाळलेलं नाहीये.
वेरुळच्या २९ व्या क्रमांकाच्या धुमार लेणीपासच्या कड्यावरुन झेप घेत एला (सध्याची इला) नदी वाहते. एला नदीच्या सान्निध्यामुळे वेरुळचे प्राचीन नाव एलापूर हे होते. राष्ट्रकूट राजा कर्क ह्याच्या बडोदे ताम्रपटात एलापूर लेण्यांच्या निर्मितीबद्दलचा उल्लेख आलेला आहे.

तुमच्या छायाचित्रांमधील रावणानुग्रह मूर्ती, गरुड, त्रिपुरांतक शिव, लिंगोद्भव शिव, गजासुरवधसंहारमूर्ती, सप्तमातृका ह्या अगदी सहजीच ओळखू येताहेत.

सीनिअर सिटिझनांनी ही एंजॉय केली हे विशेष >>> खरे तर हि ट्रिपच त्यांच्यासाठी ठरवली गेली होती , आजीने तर जेजुरी गड हि एकदा दोनदा थांबून सर केला , सर्वात जास्त उत्साह तर त्यांनाच होता .
डोंगर्वेडा - धन्यवाद तुमच्या या माहितीबद्दल , नाहीतर इथे लोक चुका काढण्यासाठी जास्त उत्सुकतेने तयार असतात .

बाकी सर्वांचे आभार आपल्या प्रतिक्रियेबद्दल .

विश्या,
डोंग"र्वे"डा यांनी एलोरा हे मराठीच नाव आहे असे म्हटलेले नाही.
जरी मी चुकाच काढण्यासाठी मुद्दाम आलो असेन, असे तुमच्या समाधानासाठी ग्राह्य धरले, तरी एकदा त्या चुका कळल्यावर त्या न सुधारण्यावर तुमचा भर दिसतो आहे.

डोंगरवेडा,
आपण याबद्दल एखादी लिंक किंवा संदर्भ पुस्तक आणि ते कुठे मिळेल ते सुचवु शकाल का?
गुगल नकाशात नदीचे नावे वेलगंगा दाखवले जाते आहे. जरी हे सगळे १००% खरे असेल तरी, एलोरा च्या ऐवजी एलापुर म्हणावे लागेल ना? एलोरा शेवटी अमराठीच झाले ना?

प्रकाशचित्रे सुंदर आहेत.
रा.भि.जोशींच्या 'घाटशिळेवरी उभी' या प्रवासवर्णनासंग्रहातून "एळ राजाने हे नगर वसले, म्हणून त्याचे नाव एळापूर. एळापूरचेच एळौर-एळूर-वेरूळ झाले (असा पुराणांत उल्लेख आहे) उर्दू -फारसी लिपीत लिहिले तर एल , ईल, एळ, ईळ यापैकी त्याचा कोणताही उच्चार होऊ शकतो."

वेरूळला बौद्ध, हिंदू आणि जैन अशा तिन्ही धर्मांची लेणी, याच क्रमाने आहेत.

एळापूरचेच एळौर-एळूर-वेरूळ झाले (आसा पुरणांत उल्लेख आहे) उर्दू -फारसी लिपीत लिहिले तर एल , ईल, एळ, ईळ यापैकी त्याचा कोणताही उच्चार होऊ शकतो."

@स्पॉकः वेरुळच्या लेण्यांवर मी एका दुसर्‍या संस्थळावर सविस्तर लेखमाला लिहिली होती. त्याची लिंक येथे देणे मला योग्य वाटत नाही.
एलोरा हे नाव इंग्रजांनी दिलेले आहे. जे सरळ वेरुळ आणि जुन्या एलापूरचा अपभ्रंश ह्यांचे एकत्रित रूप आहे. इला नदीलाच वेलगंगा म्हणतात.

वेरूळ लेण्यांच्या निर्मितीत एळ राजाचा कसलाही संबंध नाही. अशा नावाचा राजाही प्रत्यक्षात होऊन गेला नाही. दंतिदुर्गाने वेरुळच्या कैलास लेण्याची मूहुर्तमेठ रोवली व कृष्णाने प्रत्यक्ष निर्मितीस आरंभ केला. राष्ट्रकूटांच्या जवळपास ५/६ पिढ्या आणि सुमारे १२० वर्षे ह्या लेणीनिर्मितीस खर्ची झाली.

मला वाटतं स्पॉक यांचा मुद्दा आहे की मराठीत वेरूळ असेच नाव लिहायला हवे. त्यात(तसा आग्रह धरण्यात) काही वावगे नाही.

आधीच्या प्रतिसादांत लेण्यांचा आणि एळ राजाचा संबंध आहे किंवा एळ राजा प्रत्यक्षात होता याबद्दल काहीच म्हटलेलं नाही. तसंच ते जिथून घेतलंय , त्याचा संदर्भही दिलाय.

छान लेख व प्रचि.
आत्तांच उत्खननात वेरुळ लेण्यांच्या खालीं जुन्या अज्ञात शहराचा शोध लागल्याचं वाचनात आलं !

सुंदर फ़ोटो आणि तितकेच सुंदर वर्णन त्या त्या जागेचे.....एकूणच प्रवास छानच झाल्याचे दिसत आहे विशाल. मित्रांसोबत भटकंती आणि ज्येष्ठ लोकांना घेऊन केलेली अशी फ़िरती यात नक्कीच फ़रक पडतो...विशेषत: दुस-या गटातील जबाबदारीचा मुद्दा लक्षात घेतला तर....जो तुम्ही अतिशय उत्कष्टरित्या पूर्ण केला आहे.

धन्यवाद मामा - तुमची प्रतिक्रिया खूप अपेक्षित होती आणि ती आली सुद्धा .

छान सहल घडली..
मी जेजुरी नै गेली अजुन..एक दिवस काढावा लागेल..

मी अजिंठा वेरुळ २००० साली बघीतल..मस्त मस्त वाटत.. त्या कोरलेल्या भव्य दिव्य लेण्या अन त्यातल्या मुर्ती.. मला स्वतःला वेरुळ पेक्षा अजिंठा जास्त आवडल होत पण..
आमची ३ दिवसांची सहल होती..पहिले शेगाव ला दर्शन करुन मग दौलताबाद मधला किल्ला, बिवी का मकबरा, अजिंठा अन वेरुळ असा बेत होता.. मज्जा आली होती.. अजुनही आठवत सगळ्चं ..

विश्या,
संपादनातच सगळ्यात वरती शिर्षक बदलण्याची सुविधा आहे. तसे बदलत नसेल तर काय करायचे त्याबद्दल काही माहिती नाही.

मला स्वतःला वेरुळ पेक्षा अजिंठा जास्त आवडल होत >>> आमचाही अजिंठा पाहण्याचा प्लान होता पण वेळे अभावी नाही जमले आणि वेरूळ पासून पुढे १०० किमी जावे लागले असते म्हणून अजिंठा स्तगीत केले आणि परतीचे देव देव केले .

धन्यवाद रवि ...
स्पॉक तो पर्याय करून पहिला मी , पण बदल होत नाही .