'" - आमच्यावेळी नव्हते ब्वा असे - "'

Submitted by विदेश on 14 January, 2016 - 23:38

हल्ली-
उन्हाळ्यात पाऊस पडतो
पावसाळ्यात थंडी वाजते
हिवाळ्यात ऊन रणरणते ..
आमच्यावेळी नव्हते ब्वा असे -

हल्ली-
दिवसा काही झोपा काढतात
रात्री जागरणे काही करतात
फेस्बुकात फेस घालतात ..
आमच्यावेळी नव्हते ब्वा असे -

हल्ली-
एकेकजण एकेका खोलीत
प्रत्येकजण स्वत:च्या चालीत
कानात हेडफोन असतो घालीत ..
आमच्यावेळी नव्हते ब्वा असे -

हल्ली-
तो गाडीवर वाकडी करतो मान
तो हातवारे करत बसतो छान
तो धडकून घालवत असतो जान
आमच्यावेळी नव्हते ब्वा असे -

हल्ली-
संक्रांतसण पंधरा जानेवारीला
लग्नाऐवजी महत्व शूटिंगला
शांततेची सुरुवात गोंधळाला ..
आमच्यावेळी नव्हते ब्वा असे -

............... विजयकुमार देशपांडे
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्वी १४ जानेवारी म्ह्णजेच संक्रांत असायची.
दुस-या दोन ओळी लग्नमुहूर्तवेळीच दिल्या जाणा-या व्हिडिओशूटिन्ग आणि वधूवराच्या हार घालण्यासाठीच्या उचलाउचलीस उद्देशून . प्रतिसादासाठी आभार !

साधारणपणे दर आठ वर्षांनी संक्रांत १५ जानेवारीला असते. ते सूर्याच्या संक्रमणावर अवलंबून असते .. पुर्वीपासून !!