लाल टमाटे : ३ मध्यम,
कांदा : १ मध्यम,
मिर्ची : एखाद दुसरी लहानशी. तिखटपणा व आवडीनुसार कमीजास्त.,
कोथिंबीर : थोडीशी,
लसूण : ३-४ पाकळ्या,
जिरं.,
मीठ.,
उक्कूसं कच्चं शेंगदाण्याचं तेल. (फोटोत नाहिये)
माझ्या झाडावरचे ३ टमाटे मला गेले २-४ दिवस खुणावत होते. प्लस काहीतरी चटपटीत बनवायचं होतं. मग म्हट्लं बर्याच दिवसांत न बनवलेलं भरीत बनवावं.
तर,
टमाटे अन मिर्च्या भाजायला ठेवा :
टमाट्याची साल सुटायला आली की गॅस बंद करा :
दरम्यान कांदा, लसूण, कोथिंबीर चिरून ठेवा. टमाटे सोलून घ्या. मिर्ची बारीक चॉप करा. (माझी स्पेशल शेफ'स नाईफ पाहून ठेवा ) जिरं भाजून जाड कुटून घ्या.
सोयिस्कर भांड्यात हे सगळे घटक घालून मस्तपैकी कुस्करून घ्या. हाताने कुस्करणार असाल तर मिर्ची शेवटी घाला, नाहीतर हाताची आग होईल. (फोटोत सोयिस्कर भांडे नाही.)
चव पाहून मीठ घालून मिक्स करा.
वरतून मस्तपैकी चमचाभर कच्चं तेल ओता.
ऊपरसे गार्निशके लिये थोडी कोथिंबीर डाला.
फास्टात तयार झालेलं चटपटीत टमाट्याचं भरीत 'दाखवायच्या' भांड्यात काढून फोटो काढा :
पोळी/फुलक्यासोबत मस्त लागतं.
माबोवर अगदी अळूच्या देठांचं भरीत दिसलं, पण हे नव्हतं. म्हटलं टाकायला हवं.
कितीही वाटलं, तरी कांदा भाजू नका. चव अन टेक्स्चरमधला क्रंच जातो. हवं तर कांद्याची पात घालू शकता कांद्याऐवजी.
आमच्यात चपातीला पोळीच म्हणतात. पुरणपोळीला पुरणपोळी म्हणतात.
फोटो मारकांसाठी काढलेले आहेत. मारकं द्यावे ही नर्म इनंती.
..
..
शेगडी बाय बॅक करायची गरज आहे
शेगडी बाय बॅक करायची गरज आहे
छान चकचकीत काळ्या ग्लास टॉप वाली घ्या..पुढच्या पाककृतीला १००/११०, अगदी गरम पाणी बनवलं तरी चालेल
अरे एवढं काय शेगडीचं? सौ.
अरे एवढं काय शेगडीचं? सौ. दीमांनी बाकीचा स्वयंपाक झाल्यावर भरीत करण्यासाठी दीमांच्या ताब्यात दिली असेल. सगळं आटपलं की स्वयंपाकघर आवरताना घासली जातेच की शेगडी.
झाडाला खुणावणारे टमाटे नसतील
झाडाला खुणावणारे टमाटे नसतील तर काय कराव ?
मुदलात झाडच नसेल तर काय कराव ?
( अजून थोडे प्रतिसाद वाढवण्यासाठी )
झाडाला खुणावणारे टमाटे नसतील
झाडाला खुणावणारे टमाटे नसतील तर काय कराव ? >>>>>>>>>टमाटे झाडाला खुणावतात??
टमाटे दीमाना खुणावतात ना?
सामिष आणि सात्विक किचनं
सामिष आणि सात्विक किचनं निरनिराळी आहेत.
सामिष आणि सात्विक किचनं
सामिष आणि सात्विक किचनं निरनिराळी आहेत.>>
सात्विक नव्हे निरामिष!
कारण निरामिष भोजन सात्विक असेलच असे नाही! ..
उदा... झणझणित चमचमित मिसळ किंवा हिरव्या मिरच्यांचा खर्डा आ हा हा ~~~~ ह्यांच्या असल्या अस्सल गावरान ठसक्याला सात्विक कसे म्हणणार??
जे खाऊन मन तृप्त होतं ते
जे खाऊन मन तृप्त होतं ते सगळंच सात्विक
मनःशांती देणार्या गोष्टी सात्विकच असतात की नाही
री काय लिहिलयंस??
री काय लिहिलयंस??
बहुतेक काही तरी सात्विक
बहुतेक काही तरी सात्विक आकडेवारी खाल्ली दिसतेय रियाने !!
रिया स्पेशल शेफ'स नाईफने
रिया :p
स्पेशल शेफ'स नाईफने चुरडलेला लसूण वापरा.. जास्त छान लागेल
यापुढील कुठलीही रेस्पी मी
यापुढील कुठलीही रेस्पी मी शेगडीवर ठेवलेल्या भांड्यासहित देणार नै अस झाहिर करतेय रे बा.. लय चुका निघत्यात लोकाईच्या नजरेत अन मला नजर लागलेली आवडणार नै मला तरी बर इन मिन दोन रंगाच्या डीशेश, दोनच गंज, दोन प्रकारच्या वाट्या यासाठी मी शिव्या नै खाल्ल्या अजुन.. शिव्या म्हणण्यापेक्षा अस का तस का वाले प्रतिसाद
बाकी भाजलेल्या लसणापेक्षा कच्चा लसुण जास्त मस्त लागतो.. तिखट चव एकदम..
गंज म्हणजे काय? आम्हाला रस्ट
गंज म्हणजे काय? आम्हाला रस्ट / कोरोजन वाला गंज माहिती आहे.
कुठे काय बरोबर तर लिहिलय
कुठे काय
बरोबर तर लिहिलय
टिना, घाबरू नकोस. हे फक्त
टिना, घाबरू नकोस. हे फक्त दिमांच्या रेस्पींच्याच वाट्याला येणारे प्रश्न आहेत.
सोपी अन स्लर्प आहे रेसिपी.
सोपी अन स्लर्प आहे रेसिपी.
रच्याकने,
परिक्षक भिंग घेउन तपासतात फोटो.
मी काही डेअरिंग करणार नाही आता रेस्प्या टाकायच. ( मी टाकलेलेया एकमेव रेसिपिचे फोटो पाहून आले तर चार सहा चुका दिसल्या मला )
इन्ना, तू असं स्वतःहुन
इन्ना, तू असं स्वतःहुन लिहिल्याने मी मुद्दाम जाऊन पाहून चुका शोधून आले
इन्ना >> गंज म्हणजे पातेल..
इन्ना >>
गंज म्हणजे पातेल.. स्टील अॅल्युमिनीयम चे भांडे ..
कुठे काय फिदीफिदी बरोबर तर
कुठे काय फिदीफिदी
बरोबर तर लिहिलय >>
हे असं लिहीलं होत.
मस्त ! दिमा टोमॅटोलाही
मस्त ! दिमा टोमॅटोलाही इंजक्शन देत असावते बहुतेक
मार्क -१०
पण पहिल्या फोटोतली मिर्ची
पण पहिल्या फोटोतली मिर्ची दुसर्या फोटोत मोठी झाल्यासारखी दिसते >>> मलाही ही हाच प्रश्न पडलेला.
पण उष्णतेने गोष्टी प्रसरण पावतात हे कधीकाळी शाळेत शिकल्यामुळे गप्प बसले .
पण तरीही चिकित्सक मनाला मग टॉमेटो , सन्त्र्याच्या आकाराचे का नाही झाले हा प्रश्न पडलाच .
मला मार्केटातून आणलेल्या
मला मार्केटातून आणलेल्या टमाट्यांनीच खुणावले.
भरीत तयार आहे. कांदा अर्धवट भाजला. भाजलेल्या कांद्याच्या चवीसाठी. वरचे दोन तीन पापुद्रे भाजलेले आणि आतमधे कच्चा असा. त्यामुळे क्रंच गेलेला नाही.
शेंगदाण्याचे तेल घरात नाही. ऑलिव्ह ऑइल घातले.
चव अफाट आहे.
आलं का भरीत वर
आलं का भरीत वर परत?
झब्बूबद्दल थ्यांकू!
भरीत मस्त दिसते आहे. चव सांगीतल्याबद्दल डब्बल धन्स
मस्त रेसेपी आणि मस्त फोटो.
मस्त रेसेपी आणि मस्त फोटो. आजच करणार.
..
..
मी केलं आज, मस्त झालं ,बदल
मी केलं आज, मस्त झालं ,बदल एवढाच केला कि लसुण पण भाजला !
कच्चा लसुण नाही खाऊ शकत !
भाजलेला टोमॅटो वगैरे बघून मिड्ल इस्टर्न जेवणाची आठवण आली म्हणून बरोबर पोळी/ भाकरी न घेता पिटा ब्रेड भाजून खाला मस्तं तीळ वगैरे लावून :).
मिड्ल इस्टर्न थाट केला तरी भरीताची चव मात्रं थोडी मेक्सिकन कडे झुकणारी लागली, स्मोकी सालसा म्हणु शकते , नेक्स्ट टाइम चिप्स बरोबर खाल्लं पाहिजे !
फोटो टाकिन रिसाइझ केल्यावर.
कच्चा लसूण असा वेगळा कळत पण
कच्चा लसूण असा वेगळा कळत पण नाही डिजे.
नेक्स्ट टाइम ट्राय करीन नक्की
नेक्स्ट टाइम ट्राय करीन नक्की नी :).
Btw स्नॅपचॅट वर आहे का कोणी ? तिथे स्टेप बाय स्टेप फोटु आणि १० सेकंदाचे छोटे व्हिडीओ टाकलेत करताना
लसुण नाही आवडत त्यामुळे
लसुण नाही आवडत त्यामुळे लांबणीवर पडतोय बेत
हे आमचं फेवरेट तोंडीलावणं
हे आमचं फेवरेट तोंडीलावणं आहे. पण आम्ही त्याला भरीत न म्हणता चटनी म्हणतो.
Pages