टमाट्याचं भरीत ( फोटोसहित : मार्कांसाठी )

Submitted by दीड मायबोलीकर on 13 January, 2016 - 12:36
tomato bharit
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लाल टमाटे : ३ मध्यम,
कांदा : १ मध्यम,
मिर्ची : एखाद दुसरी लहानशी. तिखटपणा व आवडीनुसार कमीजास्त.,
कोथिंबीर : थोडीशी,
लसूण : ३-४ पाकळ्या,
जिरं.,
मीठ.,
उक्कूसं कच्चं शेंगदाण्याचं तेल. (फोटोत नाहिये)

क्रमवार पाककृती: 

माझ्या झाडावरचे ३ टमाटे मला गेले २-४ दिवस खुणावत होते. प्लस काहीतरी चटपटीत बनवायचं होतं. मग म्हट्लं बर्‍याच दिवसांत न बनवलेलं भरीत बनवावं.

तर,

टमाटे अन मिर्च्या भाजायला ठेवा :

टमाट्याची साल सुटायला आली की गॅस बंद करा :

दरम्यान कांदा, लसूण, कोथिंबीर चिरून ठेवा. टमाटे सोलून घ्या. मिर्ची बारीक चॉप करा. (माझी स्पेशल शेफ'स नाईफ पाहून ठेवा Wink ) जिरं भाजून जाड कुटून घ्या.

सोयिस्कर भांड्यात हे सगळे घटक घालून मस्तपैकी कुस्करून घ्या. हाताने कुस्करणार असाल तर मिर्ची शेवटी घाला, नाहीतर हाताची आग होईल. (फोटोत सोयिस्कर भांडे नाही.)

चव पाहून मीठ घालून मिक्स करा.

वरतून मस्तपैकी चमचाभर कच्चं तेल ओता.

ऊपरसे गार्निशके लिये थोडी कोथिंबीर डाला.

फास्टात तयार झालेलं चटपटीत टमाट्याचं भरीत 'दाखवायच्या' भांड्यात काढून फोटो काढा :

पोळी/फुलक्यासोबत मस्त लागतं.

वाढणी/प्रमाण: 
एक-दोघांपुरतं.
अधिक टिपा: 

माबोवर अगदी अळूच्या देठांचं भरीत दिसलं, पण हे नव्हतं. म्हटलं टाकायला हवं.

कितीही वाटलं, तरी कांदा भाजू नका. चव अन टेक्स्चरमधला क्रंच जातो. हवं तर कांद्याची पात घालू शकता कांद्याऐवजी.

आमच्यात चपातीला पोळीच म्हणतात. पुरणपोळीला पुरणपोळी म्हणतात.

फोटो मारकांसाठी काढलेले आहेत. मारकं द्यावे ही नर्म इनंती.

माहितीचा स्रोत: 
वहिनी.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

..

शेगडी बाय बॅक करायची गरज आहे Happy
छान चकचकीत काळ्या ग्लास टॉप वाली घ्या..पुढच्या पाककृतीला १००/११०, अगदी गरम पाणी बनवलं तरी चालेल Happy

अरे एवढं काय शेगडीचं? Happy सौ. दीमांनी बाकीचा स्वयंपाक झाल्यावर भरीत करण्यासाठी दीमांच्या ताब्यात दिली असेल. सगळं आटपलं की स्वयंपाकघर आवरताना घासली जातेच की शेगडी.

सामिष आणि सात्विक किचनं निरनिराळी आहेत.>>

सात्विक नव्हे निरामिष!

कारण निरामिष भोजन सात्विक असेलच असे नाही! ..

उदा... झणझणित चमचमित मिसळ किंवा हिरव्या मिरच्यांचा खर्डा आ हा हा ~~~~ ह्यांच्या असल्या अस्सल गावरान ठसक्याला सात्विक कसे म्हणणार?? Wink

जे खाऊन मन तृप्त होतं ते सगळंच सात्विक Proud
मनःशांती देणार्या गोष्टी सात्विकच असतात की नाही Wink

यापुढील कुठलीही रेस्पी मी शेगडीवर ठेवलेल्या भांड्यासहित देणार नै अस झाहिर करतेय रे बा.. लय चुका निघत्यात लोकाईच्या नजरेत Proud अन मला नजर लागलेली आवडणार नै मला Wink तरी बर इन मिन दोन रंगाच्या डीशेश, दोनच गंज, दोन प्रकारच्या वाट्या यासाठी मी शिव्या नै खाल्ल्या अजुन.. शिव्या म्हणण्यापेक्षा अस का तस का वाले प्रतिसाद Lol

बाकी भाजलेल्या लसणापेक्षा कच्चा लसुण जास्त मस्त लागतो.. तिखट चव एकदम..

सोपी अन स्लर्प आहे रेसिपी. Happy
रच्याकने,
परिक्षक भिंग घेउन तपासतात फोटो.
मी काही डेअरिंग करणार नाही आता रेस्प्या टाकायच. ( मी टाकलेलेया एकमेव रेसिपिचे फोटो पाहून आले तर चार सहा चुका दिसल्या मला Wink )

पण पहिल्या फोटोतली मिर्ची दुसर्या फोटोत मोठी झाल्यासारखी दिसते >>> मलाही ही हाच प्रश्न पडलेला.
पण उष्णतेने गोष्टी प्रसरण पावतात हे कधीकाळी शाळेत शिकल्यामुळे गप्प बसले .
पण तरीही चिकित्सक मनाला मग टॉमेटो , सन्त्र्याच्या आकाराचे का नाही झाले हा प्रश्न पडलाच .

मला मार्केटातून आणलेल्या टमाट्यांनीच खुणावले.
भरीत तयार आहे. कांदा अर्धवट भाजला. भाजलेल्या कांद्याच्या चवीसाठी. वरचे दोन तीन पापुद्रे भाजलेले आणि आतमधे कच्चा असा. त्यामुळे क्रंच गेलेला नाही.
शेंगदाण्याचे तेल घरात नाही. ऑलिव्ह ऑइल घातले.

12540716_10153371614412151_2818995723521828869_n.jpg

चव अफाट आहे.

आलं का भरीत वर परत?
झब्बूबद्दल थ्यांकू!
भरीत मस्त दिसते आहे. चव सांगीतल्याबद्दल डब्बल धन्स 5.gif

..

मी केलं आज, मस्त झालं ,बदल एवढाच केला कि लसुण पण भाजला !
कच्चा लसुण नाही खाऊ शकत !
भाजलेला टोमॅटो वगैरे बघून मिड्ल इस्टर्न जेवणाची आठवण आली म्हणून बरोबर पोळी/ भाकरी न घेता पिटा ब्रेड भाजून खाला मस्तं तीळ वगैरे लावून :).
मिड्ल इस्टर्न थाट केला तरी भरीताची चव मात्रं थोडी मेक्सिकन कडे झुकणारी लागली, स्मोकी सालसा म्हणु शकते , नेक्स्ट टाइम चिप्स बरोबर खाल्लं पाहिजे !
फोटो टाकिन रिसाइझ केल्यावर.

नेक्स्ट टाइम ट्राय करीन नक्की नी :).
Btw स्नॅपचॅट वर आहे का कोणी ? तिथे स्टेप बाय स्टेप फोटु आणि १० सेकंदाचे छोटे व्हिडीओ टाकलेत करताना Proud

Pages