कोक्पर - १

Submitted by उदय८२ on 1 January, 2016 - 04:28

"American Sniper" या अप्रतिम चित्रपटात एक लहानसे ५ मिनिटांचे दृश्य होते. पण ते बघितल्यावर अस्वस्थ झालो होतो. सैनिकांना किती मानसिक यातना सहन कराव्या लागत असतात याचे एक छोटासा नमुना अनुभवला होता. चित्रपट पाहिल्यावर त्या दृश्यावर सतत विचार चालू होते. एक सामान्य नागरीकाच्या दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करत होतो. भावना, प्रेम, क्रोध, निंदा, तिरस्कार इ. फक्त आपल्यासाठी असतात. सैनिकांसाठी फक्त "ऑर्डर" असते.
त्या एका दृश्याभोवती स्वतंत्र कथा रचन्याचा प्रयत्न केला आहे. कथा ही चित्रपटावरून असल्याने त्यातल्या बर्‍याच पुरक व समान गोष्टी कथेत घेतलेल्या आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

"कोक्पर"

सिरीया.

सततच्या अतिरेकी कारवाया आणि प्रत्युत्तरादाखल होणार्‍या हवाई हल्ल्यांमुळे बरीच शहरं ओस पडले आहे. हजारो कुटुंबे जीव मुठीत ठेवून सतत दहशतीखाली जीवन जगत आहे. नाटो आणि इतर देशांचे एकत्रित सैन्य विरुद्ध तिथले बंडखोर नेते, लोक यांच्यात सतत चकमकी होतात. बरीच वर्षे सिव्हिल वॉरच्या नावाखाली असंख्य आघात देश सहन करत आहे. काही कडव्या अतिरेकी संघटनांनी या अस्थिरतेचा फायदा घ्यायला सुरुवात केली आहे. तिथल्या काही स्थानिक नेत्यांना पाठिंबा देऊन आपली पाळेमुळे घट्ट रोवत, एकेक शहर काबीज करण्याचे काम जोमाने सुरू केले. संयुक्त राष्ट्रसंघाने धोका वेळीच ओळखून ही शहरे अतिरेकी आणि त्या नेत्यांच्या तावडीतून सोडवण्याकरिता आपले सैन्य पाठवले आहे.

अशाच असंख्य ऑपरेशन्सपैकी एक घटना-

इराक सीमेजवळ युफेरट्स नदीच्या किनारी वसलेले एकेकाळी समृद्ध असलेले शहर अल-मयादिन. १८ जानेवारी, २०१५ शुक्रवार, सकाळचे सव्वासात वाजले आहेत. रात्रीपासूनच सुरू असलेली पावसाची रिमझिम. ढगाळ वातावरण. हवाई गस्ती चालू आहेत. शहरावरून घिरट्या घालणार्‍या हेलिकॉप्टर्सची घरघर अधूनमधून शांततेचा भंग करत. सार्जन्ट मेजर विल्यम्स याने एका इमारतीच्या गच्चीवर पोझिशन घेतली आहे. त्याचा साथीदार सार्जन्ट फिलिप गच्चीच्या दरवाजाजवळ पहार्‍यावर आहे. दोघे आपापल्या रिलिव्हर्सची वाट पाहत आहेत.

तेवढ्यात त्यांच्याजवळचा सॅटेलाईट फोन वाजतो.

"ब्रावो २२३५ कमिंग."
"रॉजर दॅट, सार्जन्ट ब्लॅककॅप. ओव्हर."
"सार्जन्ट२२३५, कॅप्टन लोटस हिअर. ओव्हर."
“कॉपी दॅट ओव्हर."
“सील्स वॉरहेड विल रिप्लेस युअर टीम ऍट एट ओ’क्लॉक. ओव्हर."
"ओके, टू-टू. आय रिपीट, ओव्हर."
" ब्रावो २२३५, पोझिशन क्लिअर, ओव्हर."
"35-40 नॉर्थ 40-27 ईस्ट ओव्हर"
"कॉपी दॅट ब्रावो. टू-फॉर अॅण्ड थ्री-फॉर इनफ़, ओव्हर"
"रॉजर, इनफ़, पोझिशन लॉटस"
"ब्रावो 2235, जॉईन 534 अल्फा 45-46 नॉर्थ 40-32 ईस्ट. ओव्हर अॅण्ड आऊट"

फोन ठेवला जातो. विल्यम्स हातातली रायफल थोडी बाजूला करून फिलिपला आवाज देतो. फिलिप पायर्‍यांवर बसलेला असतो, तो आवाज ऐकून विल्यम्सजवळ येतो.
"सॅटेलाईटकॉल होता. आपल्याला रिप्लेस केले जाणार आहे"
"मरीन्स येत आहेत?” उत्सुकतेने फिलिप विचारतो.
"निगेटिव्ह. सील्स," शांतपणे विल्यम्स ने उत्तर दिले.
"सील्स?????” फिलिप आश्चर्याने ओरडतो. "ते कशाला येत आहे. इथे इतके काय महत्त्वाचे आहे.?
“काय माहीत, मला ही समजले नाही.. पण असेल काही"
“कशावरून?"
“नुसते सील्स नाहीत........ सील्स वॉरहेड येत आहेत. "
"व्हॉट............... तू नीट ऐकलेस?....... वॉरहेडच बोलले ना... " फिलिपचे डोळे विस्फारले. "नक्की काय चाललंय?"
"असेल काहीतरी... वॉरहेड आर लास्ट.”
“येस.... काही अतिमहत्त्वाचे असल्याशिवाय ती टीम बाहेर पडत नाही.... "
“हो.... आता पर्यंत दोन महिन्यांत साडेतीनशे टार्गेट केले अस ऐकलं," नाखुशीने विल्यम्स म्हणाला.
“साडेतीनशे..? जास्तच असतील, २१८ तर एकट्या मायकेलचेच आहेत. विचार कर अॅर्नॉल्ड, रायनो, विकी यांनी मिळून किती केले असतील..!! " फिलिपने वरची माहिती पुरवली.
"असतील जास्त! मला काय?" विल्यम्स आता रागातच बोलला.
“जास्तच.... कित्येकजण तर पॉइंट ब्लॅंक वर आहेत." फिलिप मुद्दाम खिजवण्याकरिता बोलला.
“बदल रे विषय..... मला त्या निळ्या छतवाल्या घरात गडबड वाटत आहे." रायफलच्या दुर्बिणीवरुन डोळा काढून विल्यम्स म्हणाला. खरंतर त्याने वॉरहेडमध्ये जाण्यासाठी फार प्रयत्न केले पण ऐनवेळेस मायकलची वर्णी लागल्याने त्याचे सिलेक्शन ब्रावो टीम मध्ये झाले.

“कुठे? सांग बरं," फिलिप आपली दुर्बीण सावरत म्हणाला.
“एट ओ’क्लॉक, 1059 मीटर,मेन रोड शॅडो हाउस.”
“@# ऑफ मॅन, तुला आता मुलींमध्ये पण गडबड दिसतेय?... इतकी सुंदर आहे... तुला गडबड वाटली?“ फिलिप गंमतीने म्हणाला.
" तू मुलगीच बघ... मी काल संध्याकाळपासून त्या घराकडे लक्ष देतोय... गडबड वाटत आहे." विल्यम्स खेकसला.
"तुला तर प्रत्येक मुलीतच गडबड वाटते..... मुलामध्ये वाटत नाही.... म्हणून मी आजकाल लांबच असतो.. हा हा हा"
“नालायका.... तुला मस्करी सुचतेय .. कालपासून २७ फोन केलेत तिने"
“हे जीझस.... तू इतके लक्ष ठेवून आहेस... असेल तिचा बॉयफ्रेंड यार... आजकाल हे देशदेखील आधुनिक झालेत.. कूल मॅन"
“नवरा घरात असताना ?"
“तू कुठे बघितलास?"
"काल गच्चीवर आलेला, पहिला फोन यायच्या आधी ... पण नंतर फोन आल्यावर आतच... परत आलाच नाही."
"फोन बॉयफ्रेंडचा असेल रे..... बोललो ना... बायकोवर संशय आला असेल. मग बसला असेल पहारा देत... तुला माहीत आहे का? लोक काय काय करतात त्यासाठी... ऐक... "
"शटअप फिलिप... तुझे काम मी करतोय..... शूट करू की लक्ष देऊ..... तुला लक्ष ठेवायला सांगितले ना कॅप्टनने?"
“ १-२ पोजिशन्स असताना मी लक्ष देऊ की इमारतीवर पहारा देऊ? काय महत्त्वाचे? तुला म्हणालो होतो. इथे २ -२ घे."
"ओके... ओके.... ते दोघे कुठे आहेत?"
"एक समोरच्या इमारतीच्या तळाशी... दुसरा आपल्या इमारतीच्या तळाशी"
"फाईन.......... पावणेआठ-आठला येतील ते..... आज सकाळपासून ते दिसलेच नाहीत, घरात हालचालही दिसत नाही काही.... गेले असतील का ?"
"इट्स फ्रायडे ब्रो............ तू नवर्‍या पाहिलेस?
"इतके नीट नाही... ती खिडकी जवळ होती तेव्हा गच्चीवर हालचाल झाली म्हणून मी scope वर केली muzzle जड असल्याने लवकर हलत नाही. पुसटसे दर्शन झाले. दाढी होती. पण लोंबणारी नव्हती. साधारण हाईट असेल बहुधा."
"जाऊ दे. वॉरहेड बघून घेतील. आल्यावर सांग त्यांना"
"मला एक सांग विल्यम्स या दोघांना देखील घेऊन जायचे आहे? "
"का ? तुला काय प्रॉब्लेम आहे त्यांच्याशी? "
"नाही तसे नाही.... आपण कसे एकाच देशाचे आहोत.. ते एशिअन आहेत"
"तुला त्यांच्या नावावरून प्रॉब्लेम आहे, असं सांग ना सरळ."
"असंच काहीसं... तुला समजलं ना?"
"एक लक्षात ठेव. भले त्यांचे धर्म एकमेकांविरुध्द आहेत परंतु इथे आपण अतिरेक्यांबरोबर लढत आहोत.. तेव्हा देश, धर्म, इत्यादी महत्त्वाचे ठरत नाहीत... ते दोघे दहशतवादाविरुद्ध एकत्र लढत आहेत.. शिक काही."
"हो रे... असेच आपले मनात आले आणि बोललो... जाऊ दे. काय म्हणते तुझी हिरॉईन."
"सकाळपासून तर कोणीच नाही दिसले, बहुधा उठले नसतील अजून."
"आठ वाजायला आले, अजून आले नाहीत वॉरहेड."
"येतील रे... डिझर्टबॉय येईल इतक्यात."

थोड्याच वेळात खालून सुभेदार हनीफचा आवाज घुमला, "डिझर्टबॉय इज कमिंग." सगळे लगबगीने आवरू लागले. अवघ्या पाच मिनिटांत इमारतीखाली नाटोची "डिझर्टबॉय" हम्वी जीप पोहचली. दणदणीत खाटखाट बुटांचे आवाज येऊ लागले. क्षणभर हनिफला मनुष्यरुपी चार दानवच अवतरले असे वाटले. स्वतः पठाण असून देखील त्याला धक्का बसला यावरूनच चौघांच्या ताकदीचा आणि देहयष्टीचा अंदाज यावा. सर्वांत पुढे वॅन अॅर्नॉल्ड, त्याच्यामागे रोमन विकी, हेन्री रायनो आणि सर्वांत शेवटी डेव्हिड मायकल वर पायर्‍या चढत होते. खाली सुभेदार हमीद आपला पार्टनर लेफ्टनंट अरुणला त्यांच्याबद्दल सांगायला लागला.
वर पोहचल्यावर थोड्या नाखुशीनेच विल्यम्सने मायकलचे स्वागत केले. स्वतःला हवे असणारे स्थान दुसऱ्या कोणी हिरावले आणि तोच नंतर बॉस म्हणून आला तर असे वाटणे साहजिकच आहे. अर्थात ते स्थान मायकलने स्वतःच्या मेहनतीच्या आणि अतुल्य कामगिरीच्या जोरावर मिळवले होते. मायकलला विल्यम्सच्या नाखुशीची कल्पना त्याच्याबरोबर ट्रेनिंग घेतानाच झाली होती. विल्यम्स जास्तीतजास्त नंबर मिळवण्यासाठी बर्‍याचवेळा मर्यादेबाहेर जाऊन कृती करायचा. साध्या हलणार्‍या टार्गेटला देखील तो एकाच जागी सतत गोळ्या मारुन टार्गेटचे डोके, हात उद्ध्वस्त करायचा. त्याला बऱ्याचदा मायकलने समजावले होते. पण विल्यम्सचे मत वेगळेच होते. "ही रायफल शत्रूला चिरडून टाकण्याकरिता मिळाली आहे." याच खुनशी वृत्तीमुळे सील्समध्ये त्याचे सिलेक्शन होता होता राहिले.

"हॅलो मेजर विल्यम्स, काय सिच्युएशन आहे?" मायकल हस्तांदोलन करीत बोलला.
"ठीक आहे, मेजर कमांड मायकल. फायरिंग अधूनमधून होत आहे. त्याच्याकडे रॉकेट लाँचर्ससारखी हत्यारे मोठ्या प्रमाणात आहेत .. अत्याधुनिक गन्स देखील आहेत."
"ह्म्म्म्म... तुझ्याबरोबर हा आहे....? " फिलिपच्या शरीरयष्टीकडे कटाक्ष टाकून अॅर्नॉल्ड पुटपुटला
"हॅलो.. मी सार्जन्ट फिलिप... ब्राव्हो२२३५.." अॅर्नॉल्डकडे हात पुढे करून फिलिप बोलला.
"तुझे सिलेक्शन कसे झाले फिलिप.. नशीब चांगले आहे माझ्या हातात नाही सापडलास!" अॅर्नॉल्डने हात जवळजवळ जोरात दाबलाच. फिलिप बिचारा कळवळला.
"सोड रे त्याला. जिथे जातोस तिथे ताकद दाखवायलाच हवी का.?" रायनोने फिलिपपुढे हात केला. "याला मस्करी करायची जरा जास्तच सवय आहे तू मनावर घेऊ नकोस." मायकल विल्यम्सशी बोलता बोलता मध्येच म्हणाला.
"इट्स ओके..." रायनोला हात न मिळवता फिलिपने चक्क भारतीय पध्दतीचा नमस्कार केला.
"हा काय प्रकार करतोय? " अॅर्नॉल्डसारखाच असणार्‍या रायनोने कुतूहलाने विचारले. "संगतीचा परिणाम.. आमच्या बरोबरचा लेफ्टनंट अरुण इंडियन आहे. ही इंडियन पध्दत आहे... अॅर्नॉल्डला भेटल्यावर यापध्दतीचे गुण मला कळले." फिलिप हसत म्हणाला. त्याच्या बोलण्याचा अर्थ लक्षात येऊन सगळेच हसू लागले. तणावाच्या परिस्थितीत असे विरंगुळ्याचे क्षण क्वचितच मिळतात.

पाऊसाची रिपरिप अधून मधून चालू होती. वॉरहेडला त्या इमारतीसमोर सोडून डिझर्टबॉय शहरात फ़ेरफ़टका मारायला गेलेली. कुठूनही रॉकेटलाँचर ग्रेनेडने हल्ला होण्याची शक्यता असल्याने जीपला फ़ार तर वीसतीस सेकंदच थांबता येत असे. त्यामुळे ती परत आल्यावरच विल्यम्स आणि त्याच्या साथीदारांना निघता येणार होते.
रायनो आणि विकी आजूबाजूचे वातावरण आणि परिसर बघण्याकरीता निघाले.
अॅर्नॉल्डने गच्चीच्या दरवाज्याची बाजू सांभाळली. डेव्हिडला विल्यम्स त्याची पोझिशन दाखवत होता. सेंट्रल ब्लॉकच्या अगदी समोरच्याच टोकावर त्याने जागा निवडलेली. तिथून समोरचा संपूर्ण रस्ता, साधारण पाचशे मीटर तरी, सहज दिसत होता. लांबून एक मिलिटरी ताफा चारपाचवाहनांसह त्या रस्त्यावरून जात होता. नजर ठेवायला अशीच जागा वॉरहेड्सला या मिशनसाठी हवी होती. डेव्हिडने आपली स्नॅपरगन Barrett.50 Cal घेऊन पोझिशन घेतली. बाजूला विल्यम्स होता. बोलता बोलता सहज त्याने विषय काढला.

"डेव्हिड, एक सांगायचे होते."

:क्रमशः

कोक्पर - २

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिसादकांचे धन्यवाद

युरो :- तो चित्रपट आणि घटना सत्यघटनेवर आधारीत आहे. मी फक्त त्या घटनेभोवती काल्पनिक कथा विणण्याचा अल्प प्रयत्न केला आहे.
दुसरा भाग टाकण्यात आला आहे

कथा आवड्ली. पुढच्या भगाची वाट बघतो आहे.

मी सहज विचारल कारण तुम्ही कम्युनिकेशनचं केलेले वर्णन.

काही सजेशन आगाउ पणे करतो आहे.

रॉजर दॅट हे जनरली एखादी कमांड दिल्यावर म्हणत्तात. म्हणजे कामांड समजली कार्यवाही करतो / होते आहे.

कॉपी दॅट म्हणजे माहिती समजली योग्य ती नोंद केली आहे.

वी आर रीप्लेसिंग वॉरहेड्स अॅट ८ ओ क्लॉक याचा अर्थ ८ वाजता की तुम्च्य पोसिशन पासुन ८' ओ क्लॉक वर

वेळ सांगायची असेल तर ८०० अवर्स जास्त छान वाटेल

टीम स्विच होते आहे रीप्लेस होत नाही.

स्विचिंग टू वॉरहेड्स , स्टॅंड बाय फ़ोर एक्सफ़िल्ट्रेशन अॅट ८०० अवर्स

(रीप्लेस्मेंट लॉस्ट किंवा नीरुपयोगी गोष्टीची करतात.)

एक तेवढ रॉकेट प्रोलेल्ड ग्रेनेड करा , रॉकेट लॉंचर ग्रेनेड ऐवजी.

मान्य आहे हा छेद्रान्वेषी पणा आहे तरी जे जास्त ठळक पणे जाणवल ते माफ़ी मागुन सुचवतो आहे.