बाप्पाचे अनुभव

Submitted by राजेश्वर on 11 April, 2011 - 05:32

श्री. आशुचॅम्प चे अमानविय वाचले, त्यांनतर आलेले एका एकाचे अनुभव वाचले. मग प्रश्न पडला की जर हे भुताचे / अमानविय अनुभव येऊ शकतात तर देव बाप्पाचे सुध्दा बर्‍याच व्यक्तींना अनुभव आले असतिल.
ते त्यांनी ईथे जर शेअर केले तर आम्हाला आनंदच होईल आणी परमेश्वरावरची आमची श्रध्दा वाढेल. माझ्या बाबतित म्हणाल तर प्रकाशीत करण्यासारखा मला अजुन कोणत्याच प्रकारचा अनुभव आलेला नाही. (अमानविय आणी देव बाप्पाचा) पण माझा देवा वर विश्वास आहे अर्थात कोणी याला अंधश्रध्दा म्हणेल पण मला त्यांच्या वाटेला जायचे नाही. प्रयत्न हाच असेल की आपल्या अनुभवातुन परमेश्वरी लिलेचा आनंद घेऊ शकु.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

.

माझे सासरे दत्तभक्त आहेत आणि दरवर्षी न चुकता गुरूचरित्राचे पारायण करतात,
याचे फळ म्हणुन की काय माझ्या दोन्ही मुलांचा जन्म गुरूपुष्यामृत योगातला आहे.

माझे कोल्हापुरच्या अंबाबाईचे दोन अनुभव.

अनुभव १:
९० च्या आधी मित्रंमंडळींसोबत गोव्याला निघलो होतो. रात्री निघायला उशीर झाला. वाटेत एका मित्राला सातार्‍यातुन घ्यायचे होते. त्याच्या घरी पोचलो व घरी आदरातिथ्याने रात्री उठुन त्याच्या आइने सर्वांसाठी पोहे केले होते. उशीर झाल्यावर सर्वांनी कोल्हापुरला न जाता तसेच पुढे जाऊ असे ठरवले. साधारण रात्री २-३ वाजता कोल्हापुरात आमच्या जीपचे टायर फुटले. कसले जीवाचे गोवा आणी कसले काय असे झाले होते अगदी. बर सगले बॅचलर, नोकर्‍या वगैरे विषयच नव्हता. सगळे हवालदिल. ट्रीप बोंबलली म्हणुन. आता सकाळशिवाय काहीच होणार नाही हे लक्षात आल्यावर सगळे म्हणाले चला आता देवीचे दर्शन घेऊ. देवीदर्शन करुन देवळाच्या बाहेर पडलो आणी आश्चर्याची गोष्ट म्हणजे जवळच एक टायरवाला पहाटे उठलेला होता. त्याच्याकडे एक गोटा टायर मिळाला २००/३०० रुपयांना. त्या गोटा टायरवर कोल्हापुर ते गोवा व परत पुण्याला असा प्रवास एकदम सुखरूप झाला. माता ने बुलाया है प्रसंग होता अगदी.

अनुभव २:
साधारण ३ वर्षापूर्वी तारकर्लीला गेलो होतो. येताना आंबा घाटात माझ्या बॉनेटमधुन बारीकसा धूर यायला लागला. मित्राच्या मुलाचे लक्ष गेले व तो काका धूर करुन ओरडला. गाडी बाजुला घेऊन थांबवली व बघीतले तर होसपाईप फुटलेला. गरम झालेल्या गाडीत पाणी टाकावे म्हणले तरी फार पाणी नव्हते. अचानक एक गाडी थांबली त्यातील माणसाने बिसलेरीच्या सिल्ड बाटल्या देऊ केल्या. मग कोल्हापुरला कॉन्टॅक्ट करुन मदत मागवली. तेव्हढ्यात एक मोकळी जीप आली व त्याने मी कोल्हापुरपर्यंत बायकामुलांना नेतो सांगीतले. मी व मित्र तिथेच थांबलो. कोल्हापुरला बुकींग करुन ठेवले. गाडी दुरुस्त केली व रात्री २ च्या सुमारास कोल्हापुरात पोचलो. सकाळी उठुन देवीच्या दर्शनाला गेलो. आत शिरलो आणी मुली बायका असतानाही अचानक देवळाचा पुजारी के साडी घेऊन आला व मित्राच्या मुलाच्या (ज्याने गाडीतुन धुर येतोय सांगीतले तो) हातात त्याने साडी दिली. देवीच्या प्रसादाची साडी त्याला मिळायची होती बहूतेक.

बाप्पा माझाही अगदी प्राणप्रिय देव! खूप श्रद्धा आहे माझी.

असाच साधा अनुभव.
माझा ३ वर्षाचा मुलगा शाळेत अजिबात राहायचा नाही. प्रचंड रडारड. शेवटी इतकी वेळ आली की टिचरने सांगून टाकले हा अजून तयार नाही शाळेसाठी. नाव काढून टाकूया. पुढच्या वर्षी बघू. पण एक लास्ट ट्राय म्हणुन गुरूवारी शाळेत सोडून आले. त्या दिवशी गणेशचतुर्थी होती आणि या वर्षी मी पहिल्यांदाच बाप्पा बसवले आमच्या घरी. मनोभावे जमेल तेवढी पूजाअर्चा केली पण एकीकडे मनात तेच विचार चालू होते की गणराया मन फार कासावीस होतं चिमुकल्या जीवाचे हात गळ्यातून सोडवताना अजून किती दिवस हे असं चालणार? लक्ष लागत नाही असंच काही बाही Happy
आणि आश्चर्य म्हणजे मुलगा खरंच त्या दिवशीपासून रडायचा कमी झाला. दुसर्या दिवशी तर टाटा वगैरे केला. देवच पावला म्हणायचा. Happy

एक अनुभव....
१९६७-६८ पासून आईने गणपती बसवायला सुरुवात केली, तो गेल्या वर्षी लिंबीने बसवायचा थांबवला. कारण काय तर मुले (व मी देखिल) आरती वगैरेला उपस्थित नसतो, सगळे एकट्यानेच करावे लागते वगैरे. मी समजावयाचा प्रयत्न केला की त्या त्या वेळा असतात, व आपण जसे जितके होईल तितके करायचे असते, पण बसविणे बंद करणे योग्य नाही.

राजहट्ट, बालहट्ट अन स्त्रीहट्टापुढे कोणाचे काही चालले आहे काय? असो.
तर यंदा मात्र अनंत चतुर्दशीच्याच दिवशी सकाळीच मी अनंतव्रताची पूजा सांगत असताना मित्राचा फोन आला की एका यजमानांस एक तिन फुटी मूर्ति गचाळ गढूळ घाण नदीच्या वा हौदाच्या पाण्यात विसर्जन न करता दान द्यायची आहे, तुम्ही घेणार का! मी म्हणले घरी लिंबीला फोन करुन विचार, ती हो म्हणालि तर बिनधास्त आण.
लिंबी कशीकाय हो म्हणाली काय की....
पण चतुर्दशीला दुपारी ही सालंकृत मूर्ति घरी आली.
अन धाकटी म्हणाली देखिल लिम्बीला.... आईऽऽ, दहा दिवसाचा गणपती बसवायला नको म्हणत होतीस ना? घे आता.... वर्षाचे आत बाप्पा कायमचेच रहायला आलेत घरी...!

[ आता यावर योगायोग, स्टॅटिस्टिकल थेअरीद्वारे भरपुर प्रतिवाद होऊ शकतो. अन कुणाला करायचाच असेल तर हरकत नाही, फक्त इतकेच सांगा की "स्वतःचा देवावर काडीचाही विश्वास नसताना, श्रद्धा वगैरे थोतांडच मानणार्‍या, अन स्वतः देवाची मूर्ति दहाच काय, दीड दिवसही न बसविताना, कधी देवळातही न जाताना, तरीही, नदीमधे मूर्ति विसर्जन करुन प्रदुषण(?) वगैरे होऊ नये म्हणून (उंटावरुन शेळ्या हाकल्याप्रमाणे) वर तोंड करून लोकांनाच "मूर्ति दान करा" असे बोम्बलत सांगत फिरणार्‍या किती जणांनी " स्वतः मूर्ति दान घेतली" आहे? ]

सदरहू मूर्तिचा फोटो, जी मूर्ति (बाप्पा) आता माझ्या घरातीलच एक सदस्य/घटक बनली आहे.
(मूळ फोटोस माझा मित्र केतन केतकर याने त्याचे फोनवरिल अ‍ॅप्स वापरुन सुधारले आहे.)

IMG-20150928-WA0031.jpgIMG-20150928-WA0032-s.jpg

पुढील फोटो मुद्दामहून, मूर्तिचे एकंदर खोलीतील आकारमान लक्षात यावे म्हणून दिला आहे.
20150927_161805-s.jpg

लिंबूभाऊ, छान आहे मुर्ती. तो दत्तात्रेयांचा फोटो मोठ्ठा फोटो पाहून नकळत हात जोडले गेले आणि तोंडातून निघालं "अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त".

खरच आहे, हा धागा काढतांना मनात धाकधुक होती. पण आपल्या सारख्या सज्जनांची साथ मिळाली.
अन माझी श्रद्धा दुढ होत गेली.
नाम सर्व काही आहे. नाम घ्यावे, नाम बोलावे.
बाकी बाप्पा आहेच.
Happy

राजेश्वर काका, अतिशय उत्तम धागा आहे. उद्यापासून माझे अनुभव शेयर करायला सुरुवात करतो. अतिशय गूढ, गहन अनुभव आहेत. आजपर्यन्त कुठे शेयर केले नव्हते. पण इथे ज्या धाडसाने लोक अनुभव सांगत आहेत ते पाहून मी देखील मन मोकळे करण्याचा निर्णय घेतला.
अतिशय भन्नाट आहेत अनुभव. दर दोन तीन दिवसांनी त्याच प्रतिसादात भर टाकत जाईन. कारण खूप आहेत अनुभव. एकाच वेळेस सांगता येणार नाहीत.

तारखा आणि अन्य तपशील मुद्दामच सांगत नाही. मी तेव्हां रहायला कुडाळ (सिंधुदुर्ग) येथे होतो. मला नोकरीच्या काही कामानिमित्त सलग आठवडाभर कणकवलीस जावे लागणार होते. साधारण सव्वानऊ वाजेपर्यंत माझे सर्व आवरुन मी रोज एस.टी. साठी स्टॉपवर येत असे.
असे तीन दिवस गेले. चौथ्या दिवशी मी नेहेमीप्रमाणे आटपून सव्वानऊ वाजता कुडाळ येथे बसमध्ये चढलो. कंडक्टर आल्यावर पाकीट काढले आणि बघतो तर काय? आत फक्त ५० रु. ची नोट. मी पैसे घ्यायला विसरलेलो होतो. अरे देवा! तेव्हां कुडाळ ते कणकवली तिकिट साधारण २०/२२ रु. होते. म्हणजे येण्याजाण्याचा खर्च वजा जाता मला जेवण करायला पैसे शिल्लक राहत नव्हते. फारतर एखादा चहा आला असता. असो, आता बस बरीच पुढे निघून आलेली असल्यामुळे उतरणे शक्य नव्हते. मी तसाच उपाशी दिवस ढकलायचे ठरवले. (तेव्हां ए.टी.एम. प्रचारात नव्हते.)
नेहेमीप्रमाणे कामाच्या ठिकाणी हजर झालो. होती ती कामे भराभर आटोपल्यावर मग थोडा निवांत बसलो. तेव्हां तिथल्या एका कर्मचा-याने माझ्यासाठी चहाची ऑर्डर दिली आणि माझ्याशी गप्पा मारत बसला.
साधारण १२ वाजून गेले असतील. अचानक त्याला काहीतरी आठवल्यासारखे मला एकदम म्हणाला," काय हो तुम्ही भालचंद्र महाराज मठात गेला आहात का?'
मी म्हटलं "नाही"
मग तो बराच वेळ भालचंद्र महाराजांचे विषयी बोलत राहीला. मी आपला नुसता ऐकून घेत होतो. मला माझ्या सद्गुरुंचा लाभ झालेला असल्याने मला आता अन्य साधुसंतांविषयी विशेष आकर्षण नव्हते. सद्गुरुंनी दिलेला मंत्र सतत मनातल्या मनात जपत राहणे हीच माझी अध्यात्म साधना. त्यामुळे मी थोडेसे दुर्लक्षच करत होतो. आणि भालचंद्र महाराज हे नांव मी पहिल्याप्रथमच त्यांच्याकडून ऐकत असल्याने मला त्यात फारसे काही कळण्यासारखे पण नव्हते.
पण ते महाशय मात्र मला 'तुम्ही आत्ताच्या आत्ता मठात जाऊन या. फार सुंदर मूर्ती आहे हो. एकदा बघून तर या. तुम्ही आत्ताच्या आत्ता जाऊन या. आणि मग कसं वाटतंय ते मला सांगा.'
आता मात्र मी वैतागलो. एक तर खिशात पैसे नाहीत. भूक लागलेली प्रचंड. (तेव्हां लग्न झालेले नसल्याने नाश्ता घरून करुन येण्याचा प्रश्नच नव्हता.) बाहेर ऊन प्रचंड तावलेलं. रिक्षाला पैसे कुठनं देऊ? आता मला चालतच जावे लागणार.
असो, त्या इसमाचा आग्रह मोडवेना. मी तसाच भर उन्हाचा चालत निघालो. अंतर बरेच होते. खूप त्रास झाला. वाटेत सहज मनात विचार आला "आपल्याला मठात जेवण मिळालं तर काय बरं होईल."
आणि मग मी मनातल्या मनात हसतच सुटलो. काय पण आपण? काहीही अपेक्षा कसली ठेवायची? शेवटी एकदाचा घामाघूम अवस्थेत पोहोचलो मठात. अतिशय उत्तम मंदिर बांधलेलं. स्वच्छता-टापटीप एकदम नाव घेण्यासारखी. मूर्ती पण अतिशय सुंदर. प्रत्यक्ष महाराज समोर आहेत अशी. नमस्कार केला. प्रदक्षिणा घातल्या. तिथेच मंडपात जप करत बसलो.
अचानक कुणीतरी खांद्याला स्पर्श केला. मी मागे पाहिले. कुणीतरी सेवेकरी बाई होत्या. मला म्हणाल्या "आज गुरुवार आहे. इथे महाप्रसाद असतो. घेतल्याशिवाय जाऊ नका."
मी अक्षरशः चाटच पडलो.
नेमका आज गुरुवार हे माहीत नव्हते मला. सगळं अगदी योगायोगाने घडून आलेलं. मी महाराजांना नमस्कार केला व अगदी आनंदाने महाप्रसाद घेतला.
काय कारण मला माहीत नाही. पूर्वजन्मी मी थोडीतरी त्यांची सेवा केलेली असावी. कारण मी त्यानंतर आजपर्यंत एकूण ३ वेळा तिथे दर्शनाला गेलोय व प्रत्येकवेळीस भालचंद्र महाराजांनी अतिशय आश्चर्यकारक अनुभव मला दिलेले आहेत. सर्व काही एकच आहे ही शिकवण त्यांना मला द्यावयाची होती असे मला वाटते.
आपल्याला सद्गुरु मिळाले म्हणून इतरांना कमी लेखू नये अशीच त्यांनी मला शिकवण दिली असे मला तर वाटते. त्यासाठीच त्यांनी हे सर्व योजून आणले.
असो, पुढचे ३ भेटीतले पण अनुभव शेयर करेन. पण नंतर कधीतरी.

आपल्याला सद्गुरु मिळाले म्हणून इतरांना कमी लेखू नये अशीच त्यांनी मला शिकवण दिली असे मला तर वाटते. त्यासाठीच त्यांनी हे सर्व योजून आणले.

अगदी बरोबर

राजे, छान धागा काढलात!
सर्वांचे अनुभव छानच! Happy

गणपती बाप्पा मोरया! श्री गुरुदेव दत्त! श्री सद्गुरुनाथ महाराज की जय!

हे सगळे कमजोर मनांचे खेळ आहेत.
अस काही नसत. निव्वळ योगायोग असतात.
योगायोगालाच चमत्कार समजले जाते.

हे सगळे कमजोर मनांचे खेळ आहेत.
अस काही नसत. निव्वळ योगायोग असतात.
योगायोगालाच चमत्कार समजले जाते.>>>बर!

ईश्वर, अल्लाताला, प्रभु येशु आणी वाहे गुरु तुम्हाला मानव रुपात भेटु दे.:स्मित:

हे सगळे कमजोर मनांचे खेळ आहेत.
अस काही नसत. निव्वळ योगायोग असतात.
योगायोगालाच चमत्कार समजले जाते.

>>

तुमचा आय्डीच सगळे काही सांगून गेला. असो. इतक्या चांगल्या धाग्यावर गालबोट लागायला नको.

मित्रांनो, तुम्ही बिनडोकांना उत्तर द्यायची गरज नाही. ते त्यांचं पर्सनल मत् आहे. ते त्यांच्यापाशी असू देत आणि आपले अनुभव आपल्यापाशी असू द्या. उद्याला उठून कोणी या जगात देवच नाही असा आरडा ओरडा सुरू केला तरी आपल्याला काय फरक पडतो? आपला भगवंत आपल्यापाशी....
माझ्याकडे अनुभवांचे भांडार आहे पण जमल तर लिहिन.

Pages