मुंबईत किंवा महाराष्ट्रातील ईतर प्रदूषणग्रस्त शहरात दिल्लीसारखा सम-विषम फॉर्म्युला राबवण्यात यावा का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 9 January, 2016 - 15:22

दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारचा समविषम फॉर्म्युला सोशलसाईटवरच्या विनोदांना पुरून उरत बरेपैकी यशस्वी होत आहे. नक्कीच काही अडचणी असतील पण त्या यथावकाश सुधारणा होत दूर होऊ शकतात आणि इथे जनतेचे सहकार्यही अपेक्षित आहेच.
पण महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या कारणासाठी हा फॉर्म्युला राबवला गेला होता त्या प्रदूषण नियंत्रणाबाबत सकारात्मक रिजल्ट मिळत आहेत.

आज महाराष्ट्र टाईम्समध्ये खालील बातमी वाचली. ६३ टक्के मुंबकरांना हा फॉर्म्युला मुंबईत देखील राबवावासा वाटतोय. काही मान्यवर याची मागणी करत आहेत आणि सरकार देखील विचार करत आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/odd-even-formu...

म्हणून एक पोल ईथेही काढावासा वाटतोय.

अर्थात यात ज्यांच्याकडे गाडी आहे, वा ज्यांची गैरसोय होणार आहे ते याला विरोध करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ज्यांच्याकडे गाडी नाही वा भविष्यातही घेण्याची शक्यता नसेल त्यांचे मत हो कडे झुकणारे असू शकते.

तसेच मूळ कल्पना केजरीवाल सरकारची असल्याने सम-विषमच्या पारड्यात मत टाकणे याचा अर्थ केजरीवाल सरकारचा विजय असा होत असल्याने हा फॅक्टर देखील या पोलच्या रिझल्टवर फरक पाडू शकेल.
त्यामुळे पोलमधील आकडे नेमके चित्र दर्शवणार नाही याची कल्पना आहे.

पण तरी त्या निमित्ताने आपल्याकडेही हा विचार पुढे येतोय, शासनही यावर विचार करतेय, तर त्या अनुषंगाने आपल्याकडील कुठल्या शहरांमध्ये याचा किती फायदा तोटा अडचणी येतील यावर चर्चा व्हावी असे वाटते.

मी काही यातला फार मोठा जाणकार नाही, पण मुंबईतल्या प्रदूषणात जगतोय, येथील परिस्थितीची कल्पना आहे. जसे पैश्याचे सोंग घेता येत नाही, तसे एमेनसीच्या एसी ऑफिसमध्ये बसून प्रदूषणमुक्त वातावरणात जगायचे ढोंग करता येत नाही. प्रदूषणाची गंभीर समस्या पाहता माझेही मत ‘हो’ आहे. किमान प्रायोगिक तत्वावर तरी हा फॉर्म्युला राबवायला हरकत नाही असे मला वाटतेय. आपल्याला काय वाटते?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो

लोकांना गाडी का विकत घ्याविशी वाटते ?

मुंबईतलं जाऊ द्या. पुण्यासारख्या शहरात गाडी ही चैन म्हणून घेतली जात नाही, तर गरज म्हणून घावी लागते. सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्याने लोकांना गाडी घ्यावी लागली असेल तर त्यावर बंदी घालणे अनैतिक आहे. ज्या प्रवासाला वीस मिनिटे लागायची त्या प्रवासाला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत किमान दीड तास आणि गर्दीच्या वेळी तीन तास लागत असतील तर कोण जाईल बसने ?

रिक्षा परवडत नाही, बसमधे बसायला जागा नाही. अधल्या मधल्या स्टॉपवर बसमधे चढता न येणे, बस न थांबणे असे अनुभव येतात. सार्वजनिक बसब्यबस्था सुधारू नये म्हणून एक उद्योजक प्रयत्न करायचे असे किस्से ऐकायला मिळायचे. त्यात कितपत तथ्य आहे हे माहीत नाही, पण गर्दीच्या वेळी एकामागोमाग बसेस न सोडण्याचे साधे साधे उपायही पीएमटीने कधीही अंमलात आणले नाहीत.

लाखो पुणेकरांनी स्वतःची वाहने रस्त्यावर आणल्याने अरुंद असलेल्या रस्त्यांवर समस्या निर्माण झाल्या. ज्या प्रवासाला वीस मिनिटे लागत त्या प्रवासाला आता एक तास लागतो. पण बसने अजूनही जास्तच वेळ लागतो.

सकाळने आयोजित केलेल्या बस डे मुळे पुण्यासारख्या शहरांचे नेमके दुखणे काय आहे हे स्पष्ट झाले. एव्हढ्या बसेस उपलब्ध झाल्या तर रस्त्यावर वाहने येणार नाहीत. मेट्रोचीही आवश्यकता राहणार नाही आणि बंदीचीही !

माह्याकडे सम विषम २ गाड्या हायेती. चालू द्या Wink

जोक्स अपार्ट, पुण्यात ते शक्य नाही. का ते वर कापोचेंनी सांगितलेच आहे. इथ झक मारून गाडी घ्यावी लागते. बसेस नाहीत, मेट्रो- देव जाणे कधी होईल.

तेव्हा कृपा करून पर्यायी व्यवस्था होई पर्यंत नको.

कंपन्या देतात सोयी पण त्यात पैसे (हो, कंपन्या पैसे घेऊन सोयी पुरवतात) आणि वेळ दोन्ही जाणार. मग काय अर्थ?

महाराष्ट्रा में ओड इवन फार्मूला कभी कामयाब क्यों नहीं होसकता? वजह ये है
1618639_1696763207213755_2834080738323995547_n[1].jpg12507521_1696763233880419_2317053617966658029_n[1].jpg

साभार फेबु.

वाहन विकत घेताना खासगी नोंदणी केल्यास एकरकमी १५ वर्षांचा कर भरावा लागतो (ओटीटी). यातले निम्मे दिवस वाहन रस्त्यावर आणू दिले जाणार नसेल तर वाहन मालकाला यातला निम्मा कर परत देण्याची शासनाची तयारी आहे काय?

मला वाटतंय ऑड इव्हन पेक्षा सिंगल ऑक्युपंसी वाहनास टॅक्स लावल्यास लोक कारपूल कड़े जास्त वळतील.
ऑफिसातून येताना प्रत्येक सिग्नल ला तीन ते पाच मिनिट थाम्बावं लागत असल्याने आता आठवड्याचे तीन दिवस बी आर टी ने जाते.गर्दी असते.३ स्टॉप नंतर बसायला जागा मिळते.पण मजा येते.ऑफिस बस ने गेले तर बसायला पण मिळेल पण बस ८.४० ला जाते तितक्या वेळेपर्यंत सकाळचे आवरत नाही.बी आर टी पंधरा मिनीटाने असतात तरी फूल होतात, यावरून लोकांचा बी आर टी ला पण पाठिंबा आहे.त्या दहा मिनीटाने सोडल्यास आणि बरे होईल.संध्याकाळी इनफ़ोसिस चौकात इनफ़ोसिस च्या २० बसेस रस्त्यावर उभ्या असतात तेव्हा गरुडाची दृष्टि ठेवून वाहत्या रस्त्यावर उभ्या असलेल्या पी एम् पी एम् एल बसेस रस्त्याच्या मध्ये जाउन पकडाव्या लागतात.

मी कापोचे च्या पोस्टला अनुमोदन दिलय.
समविषम ही वरवरची मलमपट्टी आहे, समविषम तारखांना अमक्यातमक्या बाजुस पार्किंग करण्यासारखीच.
मूळात कापोचे म्हणतात त्याप्रमाणे सार्वजनिक व्यवस्थाच जर स्वस्त व पुरेशी असेल, तर कोण कशाला अर्धापाऊण ते एक लाखाच्या टूव्हिलर वा तिनचार लाखापुढे फोरव्हिलर घ्यायला जाईल? मी तरी नाही जाणार. मुळात मी देखिल टू व्हिलर घेत्लै ती सार्वजनिक व्यवस्थेतून (पिंची ते पुणे लोकल) प्रवास करणे अशक्य झाल्यावर. त्या आधी पुण्यात स्टेशनवर सायकल ठेवलेली असायची, लोकलने येऊन पुण्यातील बाकी कामे सायकलने येऊन जाउन करायचो. असो.

पुणे (पिंचीसह) हे तर सार्वजनिक बस /रिक्षा प्रवासाकरता "सर्वात महागडे" शहर आहे, सबब आधी इथली घाण निस्तरा समविषमच्या ऐवजीची. रस्ते सुधारा. बीआरटी नामक तमाशे बंद करा. जिथल्यातिथल्या योजनेतुन पैका खाणार्‍या प्रशासन/नगरसेवकांचे खायचे तोंडाला शिवुन टाका... मग गरज उरणार नाही समविषमची.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे हाच ह्यावरचा एकमेव उपाय आहे . बाकी सगळ्या मलमपटया
रोजच्या कामासाठीच्या प्रवासासाठी चागले वाहन मिळाले तर कल्च ब्रेक खेळत बसण्यात कोणाला इंटरेस्ट असेल.
मस्त पुस्तक वाचत, गाणी ऐकत शोफर ड्रीवन गाडीने जायला नक्कीच आवडेल .
कापोचे & बिपिन यांना अनुमोदन दिले आहे

१५ जानेवारीला सम- विषम चे फायदे तोटे कुणा अराजकीय संस्थेने अधोरेखीत करु द्या मग पुढे पाहु.

खरा मुद्दा चर्चेला येत नाही, सार्वजनिक वाहन व्यवस्था भारतात अपुरी का राहिली ? कोणाची लॉबी अशी गोष्ट घडवण्याला प्रोत्साहन देत होती ? एका सभेत राज ठाकरे यांनी कार जास्त विकल्या जाव्यात म्हणुन इंडस्ट्रीयलीस्ट सार्वजनीक वाहन व्यवस्था खिळखीळी व्हावी म्हणुन प्रयत्न्शील असतात असा आरोप केला होता.

खर मुळ तिथ आहे.

आपल्या पी १ पी २ सारखं, फक्त वाहन रस्त्यावर आणण्या बद्दल. सम तारखेला सम युनिट प्लेस नंबर आणि विषम तारखाना विषम युनिट प्लेस वाल्या गाड्या रस्त्यावर असल्या पाहिजेत.
महिला, टॅक्सीवाले, अ‍ॅम्ब्युलन्स याना नियमातून सूट.
तसेही दुचाकी चौचाकी धरुन बर्‍याच जणांकडे ऑड इव्हन गाड्या असू शकतील.कारपूल किंवा एक दिवस दोन एक दिवस चार चाके आणून काम भागेल.
मला चालेल पुण्यात ऑड इव्हन आलेले

दक्षिणा, सस्मित..
फार काही नाही,
एके दिवशी सम नंबराच्या गाड्या रस्त्यावर धावणार तर एके दिवशी विषम नंबराच्या गाड्या..
नंबर म्हणजे - नंबरप्लेटवरचा नंबर
त्यामुळे ढोबळमानाने ५० टक्केच खाजगी गाड्या दर दिवशी रस्त्यावर उतरणार..
आता यावर पर्याय म्हणून तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा, कार शेअर करा, किंवा दोन गाड्या घ्या.

जोपर्यत पुण्यात सक्षम सार्वजनिक वाहतुक व्यवस्था होणार नाही, तोपर्यत सम-विषम वाला नियम पुण्यात लागु करणे अव्यवहार्य होईल.

एके दिवशी सम नंबराच्या गाड्या रस्त्यावर धावणार तर एके दिवशी विषम नंबराच्या गाड्या..
नंबर म्हणजे - नंबरप्लेटवरचा नंबर>>>>> ऋ, हे कसं शक्य होउ शकतं?

If last digit of your number plate is even then it will run on even day and if it is odd it will run on odd day... it is so simple.

ओके. मग माझ्या गाडीचा शेवटचा नंबर १ आहे. तर मी फक्त ऑड डे म्हणजे १ तारीख, ३ तारीख, ५ तारीख अशीच रस्त्ञावर चालवायची का?

गिरीकंद,
पुण्यात सार्वजनिक वाहतूक सुधारणे आणि प्रायव्हेट वाहने कमी होणे हे आधी कोंबडी की अंडे या प्रश्नासारखे आहे.
दोघेही स्वतःच्या तोट्यांबद्दल एकमेकांना ब्लेम करत असतात.'आधी हे करा मग आम्ही ते करु' यातलं 'आधी हे' सरकारकडून केलं जाणार नाही.सरकारची खैरात ही आंधळ्या देवाने मोत्यांच्या ओंजळी वाटण्यासारखी आहे. मोती कुठेतरीच पडतायत..वेचायला कष्ट लागतात, पण 'वॉव!! मोती दिले' असं म्हणावं अशी अपेक्षा असते.

mi_anu १००% मान्य आहे. पण म्हणुन कुणीतरी पुढाकार घेऊन ही कोंडी फोडायलाच हवी.

मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरांमध्ये "कंजेशन चार्जिंग" सारखी संकल्पना राबवली तर खुपच फरक पडेल.
लंडन सारख्या महानगरांमध्ये अशी संकल्पना राबवली आहे आणि उत्तम काम करतेय.
शासनाला महसूल तर मिळतोच पण ट्रॅफिक सुद्धा नियंत्रित होते.

सम विषमचा नियम वाहतूक कोंडी कमी करायला नसून प्रदुषण पातळी कमी करण्याकरिता आहे कारण हा नियम फक्त पेट्रोल / डिझेल वापरून प्रदुषणात भर घालणार्‍या वाहनांकरिताच लागू आहे. सीएनजी वाहन तुम्ही दिल्लीत प्रत्येक तारखेला चालवू शकता. तेव्हा पुण्यात जर असा नियम केला तर बहुतेक सर्वच पेट्रोल वाहन धारक सीएनजीत कन्व्हर्ट करून घेतील. डिझेल वाहनधारक दोन वाहने वापरतील अथवा ते विकून सीएनजी वाहन घेतील. पर्यायाने वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा नाहीच.

तसेही दिल्ली पॅटर्नमधे दुचाकी वाहनांना या नियमातून सूट आहे. हे पुण्यात केले तर तसाही फारसा उपयोग नाही कारण पुण्यात खरी गर्दी दुचाकीस्वारांचीच आहे. दुचाकीस्वारांनाही नियम लावले तर पुण्यातले रिक्षावाले अजुनच मुजोर होतील.

माझ्या टू व्हीलरला पुढे ३ अंकी आणि मागे ४ अंकी नंबर आहे ( पुढचा शेवटचा नंबर गळपटलाय) ...
म्हणून मी सम विषम दोन्ही तारखेस चालविणार ......... Happy

रोगापेक्षा औषध भयंकर +१

त्याऐवजी लोकांना सायकल वापरण्यास प्रोत्साहीत करणे चांगले, सायकल स्वस्तात उपलब्ध करुन देणे आणि चांगले सायकल ट्रॅक केले तरी निम्म पब्लीक सायकलवर येईल. बीआरटी सारखे चांगले प्रोजेक्ट इथे बोलघेवड्यांच्या चर्चेत वर्षानुवर्षे अडकतात ही खंत आहे. वाहतूकीचा प्रश्न सरकारच्या हाताबाहेर नाही पण राजकीय इच्छाशक्तीचा मोठा अभाव आहे.

लोक माळवाडीहुन निगडीला सायकलने जाणार का? । कामाच्या वेळेस बसेस येत नाहीत. कामात व्यत्यय नको म्हणून गाडी घेतली. आता दर दिवसाआड उशीर झाला तर कसं व्हायचं?

hinjewadi hun interview deun yet astana bus ne ale.. tikde BRT cha track ahe...comparatively barich laukar ale.. palikade signal war andaje kilometerbhar line asel 4 wheeler chi.. sagle gadya band karun baslele:अओ:
pollution control aso nahitar gardi warcha control.. convenient public transport is the only option is what i honestly feel

मुंबईत केली तर मला वाटतं नक्की यशस्वी होईल.
पुण्यात अगदी उत्तम रस्ते, सार्वजनिक सेवा दिली तरी सार्वजनिक वाहनाने लागणारा वेळ हा स्वतःच्या वाहनाने लागणाऱ्या वेळेपेक्षा जास्त असणार. (बऱ्याच ठिकाणी, उदा. वाहन बदल करणे, जवळचे अंतर, ३० सेकंदाची वारंवारता नसणे आणि असल्या कारणांनी). तो पुणेकर सहन करणार नाहीत. गर्दी असणारच. यासर्वांमुळे (बरेच) पुणेकर स्वतःची वाहने रस्त्यावर आणणार, आणि नियम मोडणे म्हणजे असहकार असल्या खुळचट कल्पनांनी तो हाणून पाडणार. (अगदी सर्वसमावेशक जनरलायाझेशन झालंय, ५ वर्षांत गुण नाही पण.... )
भरत, चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. त्यात ५ मिनिटं गेल्याने मूळ प्रतिसादपण थोडा टोन डाऊन झाला Proud

कामाच्या ठिकाणी जायला तीन ठिकाणी बस बदलावी लागत असेल आणि प्रत्येक ठिकाणी किमान अर्धा तास थांबावे लागत असेल तर कुणीही अन्य पर्याय शोधेल. पुन्हा हे सर्वांच्या बाबतीत नसेल. पण कामाची ठिकाणे जवळ असणे ही चैन आता किती टक्क्यांसाठी आहे हे निश्चित सांगता येत नाही.

गर्दीच्या वेळी चार्जेस लावा, पण गाडी आणली नाही तर घरी पोहोचण्यासाठी किफायतशीर सोडून द्या, सेवा तरी उपलब्ध असेल ना ? स्वारगेटच्या बसस्टॅण्डला संध्याकाळी जाऊन पाहीले तर कल्पना येईल.

'३ वाहने बदलून प्रत्येक ठिकाणी सरासरी १० मिनिटं थांबून गर्दीतून जाणे' हे मुंबई आणि जगातील अनेक शहरांत लोकं करतात. याला मुख्य कारणे स्वतःच्या वाहनाने जाणे प्रचंड वेळ खाऊ (ट्राफिकमुळे), खर्चिक (टोल आणि प्रचंड महाग पार्किंग) असते. पार्क करायला पुरेशी जागा उपलब्ध नसते. असली तरी खूप लांब असते.
अनेकदा लोकं पार्क and राईड करतात, (जवळच्या स्टेशनवर स्वतःचे वाहन पार्क करून मग सार्वजनिक सेवा वापरणे) याने १-२ हॉप कमी होतात.
हे सगळं व्हायला एकतर सार्वजनिक वाहतुकीचे व्यवस्थित नियोजन सुरुवातीपासून असावे लागते, ज्याने ते रक्तात मुरते किंवा क्रिटीकल पोइंट यावा लागतो. पुण्यात अजून बरीच अंतरं अशी आहेत की स्वतःच्या वाहनाने जाणे सोयीस्कर पडेल, त्यामुळे सार्वजनिक सेवा वाढायला दिरंगाई - चाल ढकल चालू आहे. ट्राफिक भरपूर आहे पण इतका पण नाही की उलटा परिणाम व्हावा, आणि तो व्हायला सार्वजनिक सेवा पुरेशी सक्षम नाही.

अमित मुद्दा पटला.
मला बीआर टी ने लागणारा आणि दुचाकीने लागणारा वेळः
-------------------------------------------------------------
बी आर टी:
सकाळी ९.१० ला घरातून निघते. १० मिनीटात स्टॉप वर(यात रस्ता क्रॉस करण्याचा वेळ पण जास्त आहे.)
९.१५ ची बस मिळते. बस ला गर्दी असते, १० ला कंपनीच्या दारात स्टॉप वर सोडते.
वाटेत ३ स्टॉप नंतर जागा मिळाल्यावर मनसोक्त फोन्/व्हॉटसॅप्/झोप पूर्ण करता येते.
५० मिनीट टोटल

संध्याकाळी चालत इन्फी फेज १ स्टॉप वर-१० मिनीट
बसः ३५ मिनीट(यातली १० मिनीट हिंजवडी चौकापर्यंत पोहचायलाच लागतात.)
चालत घरी: १० मिनीट(रस्ता क्रॉस करायला ३ मिनीट)
५५ मिनीट-१ तास टोटल
-------------------------------------------------------------
दुचाकी
९.१० ला घरातून- ९.५५ ला कंपनीत.(हे ९.१० ला निघालं तरच, ९.३० नंतर वेळ वाढत जातो.)
३५ मिनीट

संध्याकाळी
७.१५ ला कंपनीतून- ८ ला घरी.
४५ मिनीट (जर ७.३०/७/६.३० या मोठ्या कंपन्यांच्या बस निघायच्या वेळेत निघालं तर यात ५-१० मिनीट अधिक होतात.)
-------------------------------------------------------------

मी_अनु, खरंय. पाच सहा वर्षांपूर्वी वाकडेवाडी ते कोथरूड बाईकने १५ मिनिटे आणि बसने १ बस बदलून ४५ ते ६० मिनिटे लागायची. बसची वारंवारता कधी उत्तम तर कधी बस वेळेत न सोडल्याने, थांब्यावर न थांबल्याने पथेटिक होती. एकूण १०-१५ मिनिटे चालायला लागायचं, वेळी अवेळी थांबायला लागलं तर रामभरोसे. त्यामुळे कायम दुचाकीवरूनच गेलो.
हेच मुंबईमध्ये ठाण्याहून सीप्झ/ अंधेरी किंवा अगदी कांजूर/ विक्रोळी ला जरी ऑफिस असतं तरी स्वतःची गाडी तर नाहीच पण बेस्ट पेक्षाही कदाचित ट्रेन प्रिफर केली असती. फारतर घाटकोपरहून बेस्ट किंवा शेअर रिक्षा.

>>>> लोक माळवाडीहुन निगडीला सायकलने जाणार का? <<<
आमच्या काळी म्हणजे पंचवीस वर्षांपूर्वीची पाचपन्नास वर्शांदरम्यान लोक पुण्याहुन सायकलने निघुन दापोडी, खडकी अ‍ॅम्युनिशन, देहु दारुगोळा कारखाना, व पिंचीमधिल तत्कालिन कारखान्यात जायचीयायची. त्यांचेकरताच त्या काळी वाकडेवाडीचा रेल्वेरुळांखालचा अंडरग्राऊंड मार्ग बांधला गेला.
आता पंचवीस वर्षातच असे काय नि कसे घडले काय की.....
एक नक्की, की पुण्यात सार्वजनिक वाहतुक व्यवस्था स्वस्त व कार्यक्षम असली असती, तर रस्त्यांवर खाजगी गाड्यांचीच काय, सायकलिचीही गर्दी दिसली नसति. पुण्याची रेल्वे व बस सेवा कमसर ठेवण्यामागे किती व कोणकोणत्या शक्ति पडद्या आडुन कार्यरत होत्या ते उघड गुपित आहे.