थाय ग्रीन करी.

Submitted by वर्षू. on 8 January, 2016 - 21:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ग्रीन मसाला पेस्ट करता साहित्य

१ टेबलस्पून मुळांसकट चिरलेली कोथिंबीर
१ टेबलस्पून धने
१/२ टेबलस्पून जिरे
१ १/२ टेबलस्पून चिरलेले गालांगल
१/४ कप लसणाच्या कळ्या
एक छोटा तुकडा आलं
थोडेसे काफिर लाईम zest.( मी काफिर लाईम ची १/४ टी स्पून पावडर वापरलीये)
३, ४ टेबलस्पून लेमनग्रास्,चिरून
१/२ टी स्पून काळे मिरे
मीठ- चवीनुसार
१/२ कप चिरलेले लहान कांदे ( शॅलट्स) इथे मिळाले नाही म्हणून नॉर्मल कांदेच घेतलेत - २ मीडियम आकाराचे
१०,१२ तिखट हिरव्या मिरच्या
मूठभर स्वीट किंवा थाय बेसिल लीव्ज
मूठभर काफिर लाईम ची पाने
१ कॅन कोकोनट मिल्क , ( मी ChaoKoh ब्रँड चा कॅन वापरलाय)

मांसाहारी ग्रीन करी करता, एक पाउंड बोनलेस चिकन घेऊन , ३,४ सें मी लांबीचे पातळ तुकडे चिरून घ्यावे.

शाकाहारी करी करता स्लाईस्ड पांढरे मशरूम्स्,स्नो पीज( धागे काढलेले), उभे दोन भागात चिरलेले बेबी कॉर्न्स, ब्रोकोली ( लहान फ्लोरेट्स मधे चिरुन) , सोलून उभे चार तुकड्यात चिरलेला एखादा बटाटा .

क्रमवार पाककृती: 

कृती
ग्रीन पेस्ट करता काळे मिरे,धने आणी जिरे भाजून घ्यावे. मग सगळे जिन्नस( काफिर लाईम ची पाने आणी बेसिल लीव्ज सोडून) एकत्र करून ग्राईंडर वर अतिशय बारीक वाटावे.
आता ज्या पातेल्यात किंवा कढई मधे करी करायची असेल ती गॅस वर ठेवून तीत एक टेबलस्पून तेल गरम करा.
मसाला पेस्ट टाकून परता. सुवास सुटला कि चिकन चे तुकडे किंवा सर्व भाज्या टाकून थोडा वेळ परता.
चिकन च्या तुकड्यांचा रंग पिवळसर झाला कि कोकोनट मिल्क चा कॅन आणी कॅन च्या दीडपट पाणी एकत्र करून घाला. उकळी आल्यावर काफिर लाईम लीव्ज आणी स्वीट बेसिल लीव्ज घाला.
गॅस मंद करा. कढई वर झाकण ठेवून चिकन / भाज्या शिजवा.
ही करी स्टीम्ड राईस बरोबर सर्व करा

तो आल्या सारखा दिसणारा लाल तुकडा गालंगल चा आहे, आणी ती लांब पानांची कोथिंबीर आहे. थायलँड मधे हीच कोथिंबीर वापरतात. पण भारतात बहुतेक आपलीच कोथिंबीर वापरावी लागेल.
आजकाल भारतात काफिर लाईम, काफिर लाईम ची पाने, गालंगल्,लेमन ग्रास इ. वस्तू , सहज मिळतात.

स्लाईस्ड लेमन ग्रास

करी मधली पानं बघून घरातले मेंब्रं काचकुच करत असल्याने सरळ काढून टाकली..
एंड प्रॉडक्ट.. चिकन आहे तळाशी.. Happy

अधिक टिपा: 

काफिर लाईम ऐवजी , भारतीय लिंबू अजिबात वापरू नये!!
फ्लेवरफुल करी करता कोथिंबीर तिच्या काड्या, रूट्स सकट वापरावी !!

माहितीचा स्रोत: 
थाय मैत्रीण आणी नेट
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!
>>
काफिर लाईम ऐवजी , भारतीय लिंबू अजिबात वापरू नये!!<<+१
आम्ही बापूडे रेडीमेड पेस्ट वापरतो, इतकी मगजमारी ना करसे.

रेडीमेड पेस्ट मधे फिश सॉस/ श्रिम्प पेस्ट ( थाय नाव ,'नाम प्ला') असते ना.. मला नाही आवडत ती फ्लेवर म्हणून हा खटाटोप Happy

शिवाय थायलँड मधील लाँग स्टे मधे जॉईन केलेल्या कुकरी क्लासेस मधे सर्व इन्ग्रेडिएंट्स खास थाय मॉर्टर मधे वाटायला लावायचे .. म्हणून अ‍ॅज सच हा खटाटोप ही वाटत नाही.. Happy Happy

रेड करी,यलो करी खाल्लिय , ग्रिन ट्राय नाही केलिये, थाई कोथिबिरिचे इन्गजि नाव काय आहे?

यप.. दिनेश तुला नक्की आवडेल. तुला मिळत असतील ना सगळे इन्ग्रेडिएंट्स .. अ‍ॅक्चुली वेजिटेरिअन व्हर्जन जास्त आवडतं मला.. Happy फॉर अ चेंज Wink

" मस्त.. आणि शाकाहारी व्हर्जनही दिले आहे... म्हणून आणखीनच मस्त !!" ....सहमत.

यातल्या अर्ध्या गोष्टी एलियन आहेत माझ्यासाठी Wink
मस्त दिसतय एकंदर प्रकरण.. सगळ साहित्य हाताशी आल्यावर करुन पाहण्यात येईल Happy

भारी आहे. Happy
करून पाहिन.
रच्याकने व्हेज व्हर्जन आधीच देउन तू चार सहा पोस्टी कमी केल्यास बघ Wink

एंड प्रॉडक्ट.. चिकन आहे तळाशी.. >>> त्याची तंगडी पकडून थोडे वर काढता आले असते तर माझ्यासारख्यांसाठी बघायची रंगत वाढली असती Wink
मस्त रेसिपी

Sahee recipe. Malahee readymade paste madhala to vishishta vas avadat nahee.

छानच!

लसणाच्या कळ्या हा शब्दप्रयोग फार आवडला. आपण सहसा लसणाच्या पाकळ्या म्हणतो. पण अपेक्षित आहे लसणाच्या पाकळ्या आणि कळ्या एकून एकच.

इन्ना!! Lol

ऋन्मेष.. बोनलेस ची तंगडी कशी काय रे काढणार बाहेर... तू आपला इमॅजिन कर्बरं!!! Happy

बी, तुला सर्व इन्ग्रेडिएंट्स मिळतील, नक्कीच.. ते ही ताजे.. तुला इंडोनेशिअन करीज आवडल्या असतील तर ही नक्की आवडेल

मानु..अगा.. वरती ये>>वड्या भाज्यांची नावं दिलीत ना शाकाहारी व्हर्जन करता... Happy

दिनेश.. फ्रेश असलं लेमन ग्रास तर कच कच लागत नाही. नीट ग्राइंड करता येतं.पण जर वाळकं असेल तर ओवर नाईट पाण्यात भिजवून
ते पाणी करी मधे वापरता येईल. किंवा करीबरोबर एखाद्या पुरचुंडीत बांधून उकळता येईल. खाण्यापूर्वी काढून टाक. फिर नो कचकच. मी पण वाळवलेलेच आणलेत चिंग माय हून..
वरच्या फोटोत पाण्यात भिजवलेले आहे रात्रभर.
माझं गालंगल ही वाळवलेलंच आहे.इथे नाही मिळत हे जिन्नस.
गालांगल चा तुकडा ही रात्रभर भिजत घातला होता पाण्यात. वाटताना त्या पाण्यासकट ग्राईंड केला. छान स्मूथ
झाला.

मी ही रेडिमेड पेस्ट्/सॉस वापरूनच केलं आहे. इन्ग्रेडियंट्समध्ये फीश पेस्ट वगैरे नाही याची खात्री करूनच. बरोबर गरम गरम जास्मिन राईस मस्ट आहे.

यस्स्स जास्मिन राईस इज मस्ट.. Happy
सायो कोणत्या ब्रँड ची पेस्ट आहे ??तशी मिळाली तर मग अजून ऑफन करता येईल ही कृती
वरून स्वीट बेसिल ची फ्रेश पाने हल्की क्रश करून टाकली कि एकदम ऑथेंटिक ग्रीन करी तयार होईल

हो स्वस्ति.. अगदी सर्रास वापरतात.. आपल्या डिश ची ऑर्डर करताना खूप वेळा रिमाइंड करायला लागते. तसंही ते मोस्टली वरून अ‍ॅड केलं जातं त्यामुळे ते सहज टाळण्यासारखंही असतं..
तोच प्रकार इंडोनेशिअन फूड्स मधे ही वापरला जातो, वेगळ्या नावाने.. तिथेही बजावून सांगावं लागतं.

Pages