बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोथिंबीर वडी पण नाही टिकणार.

नारळाचे पदार्थ टिकण्याबद्दल मला पण शंका आहे. मी भारतातून आणते तेव्हा अगदी निघायच्या वेळी रेफ्रिजरेटरमधून काढून बॅगमध्ये ठेवते आणि इथे घरी पोचल्यावर लगेच फ्रिजमध्ये ठेवते.

पेढे, चिरोटे, पुपो, गुपो, चितळेंकडे मिळते तशी आंबाबर्फी आरामात टिकतील. तिमिपु मंद आचेवर तळून शंपासारख्या एकदम कुरकुरीत केल्या तर टिकतील असं वाटतं आहे.

आमच्याकडे आवडणारे म्हणजे घरचे बेसन लाडू, पुपो, भाजणीच्या चकल्या
हैदराबाद किंबा बंगळूरुच्या पुल्लारेड्डी मधे मिळणारे खोवा पुरी, खाजा , काजू अच्चू ( चिकीसारखा प्रकार)
इतर विकतचे - कचोरी, बाखरवडी, हॉट्चिप्स मधून बनाना वेफर्स, कार्ल्याचे वेफर्स

असले पार्सल आले की मावशी किंवा मामी कसे आपलेच लाड जास्त करतात याची चर्चा असते दोघांमधे

अनारसे
पुरणपोळी
गुळाची पोळी
आटवलेला आब्याचा गोळा
आबा पोळि
फणस पोळि
चितळे आबा बर्फी
मलई पेढे
पक्के पेढे
साखरी पेढे
काजुकतली
बेसन-लाडु
साटोर्‍या
खरवस वडि
डिन्काचे लाडू

काजूकंद
बेसनाचे लाडू
रवा / गुळपापडी / मुगाचे लाडू
म्हैसूरपाक
माहीमचा हलवा
उपासाचा साबुदाण्याचा गोडसर चिवडा / उपासाची भेळ
गजक
रेवड्या
खजूर अंजीर रोल / बर्फी
पुरणपोळ्या

यात मोतिचुराचे राघवदासी लाडू घालायचे राहिले.
गुलकंद व गुलकंद बर्फी / लाडू वगैरे.
मोरावळा
आवळा कँडी
अननसाचा साखरांबा
आंब्याची साटं / पोळी.

राघवदासी लाडू म्हणजे कसे? मी मागे एकदा रवा-खोबर्‍याचे ओलसर लाडू केले होते. माझ्या मावशीने खाल्ले. तिला जाम आवडले. ती म्हणाली "आम्ही याला राघवदासाचे लाडू म्ह्णायचो". पण म्हणजे तरी नक्की कसे हे मला (मीच केले असून राघवदासी म्हणजे काय वेगळं ते) नाही समजलं. त्या वेळी तिला ते विचारून घ्यावं हे मला सुचलं नाही.

प्रज्ञा९, माझी मावशी तिच्या माहितीतल्या एका आचाऱ्यांकडून मोतिचुराचे चवीला अतिशय सुंदर, साजूक तुपातले, बेदाणे काजू केशराने सजलेले आणि तोंडात विरघळणारे लाडू करून घेते त्याला राघवदासी लाडू म्हणते. तिच्याच तोंडून हा शब्द पहिल्यांदा ऐकला. बाजारात (चितळे व तत्सम दुकानांत मोतिचुराचे शुध्द, साजूक तुपातले, बेदाणे लावलेले, केशरीरंगाचे, चवीला सुंदर असे कागदी वेष्टनातले लाडू मिळतात. त्यांची चव बरीचशी या राघवदासी लाडवांसारखी वाटते मला.) आता मावशीला विचारते राघवदासी का म्हणतात या लाडवांना ते ! Happy

राघवदासी लाडू आमची आई दिवाळीला करते. हरभर्‍याच्या डाळीचा रवा, साधा रवा, खवा, नारळ असं सगळं असतं यात. आणि भरपूर साजुक तूप, केशर, बेदाणे, बदामाचे काप वगैरे. एकदम राजेशाही. पण आठवड्यापेक्षा जास्त टिकत नाहीत हे (उरतही नाहीत म्हणा! Happy )

चवीला अतिशय सुंदर, साजूक तुपातले, बेदाणे काजू केशराने सजलेले आणि तोंडात विरघळणारे लाडू >>>>>>
आणि
भरपूर साजुक तूप, केशर, बेदाणे, बदामाचे काप वगैरे. एकदम राजेशाही.>>>>>>

अगोऽऽबाई! म्हणजे असे सर्वगुणसंपन्न लाडू ते राघवदासी म्हणायचे होय! म्हणजे नकळत का असेना मला ते जमले म्हणयचे! Proud
कणकेचेपण होतात काय असे लाडू? कारण मी परवा केले त्यात तुपावर कणीक भाजून, थोडंसं बेसन भाजून, थोडीच मुगाची डाळ खरपूस भाजून मिक्सरवर दळून ते पीठ, तुपात तळून थोड्या मेथ्या, त्याच तुपावर भाजून बदाम, खारकेची पूड आणि सुक्या खोबर्‍याचा कीस (हे सगळं मुगाबरोबर दळून), उरलेलं चमचाभर नाचणीसत्त्व, , वेलची पूड घालून नीट मळून असे खंग्री लाडू केले. तूप अंमळ जास्त झालं तर बिचारे बसल्याजागी बसले! मग तसेच त्यांना आडवे घालून वड्या थापून टाकल्या. खाताक्षणी विरघळतायत. राघवदासी वड्या म्हणयच्या का आता त्या!! Wink

असो! अतिच अवांतराबद्दल क्षमस्व! Proud

माझ्या मुलांना कुणी इतका गोड मिट्ट खाऊ पाठवला की मला ऑनेस्टली फार वैताग येतो पण तरी काही विशिष्ट सणांना अशी पार्सल्स येतात तेव्हा त्यातल्या त्यात त्यांनी टिकाऊ पदार्थ पाठवले तर मग थोडी विन-विन सिच्युएशन म्हणता येते. तर त्यामुळे मी बरेचदा कडक बुंदीचे लाडू सांगते आणि गूळ पोळ्या. दोन्ही टिकतात. एक फ्रीजमध्ये आणि एक बाहेर आणि त्यामुळे मध्ये मध्ये आमिष म्हणून कुक्या बिक्या देण्यापेक्षा हं घे आज्जीने पाठवलंय असं मार्केटिंग कम आदर कम आभार वगैरे एक सांस्कृतिक/संस्कार वगैरे काय ती भंपक बोट असते (साभार टीप्पापीज :)) त्यात बसता येतं. Happy

प्लीज तुम्ही पाठवा. मी माझं फक्त #कोतबो करून घेतलंय. कृगैन Happy

संक्रांतीचा हळदी कुंकवाला साधारण ३० बायका येणारेत. सध्या इथे चांगलीच थंडी आहे. तर मला एकटीला, पोटभरीचा त्या दिवशी आधी करून ठेवता येईल असा मेनू सुचवा प्लीज.

कारण मी परवा केले त्यात तुपावर कणीक भाजून, थोडंसं बेसन भाजून, थोडीच मुगाची डाळ खरपूस भाजून मिक्सरवर दळून ते पीठ, तुपात तळून थोड्या मेथ्या, त्याच तुपावर भाजून बदाम, खारकेची पूड आणि सुक्या खोबर्‍याचा कीस (हे सगळं मुगाबरोबर दळून), उरलेलं चमचाभर नाचणीसत्त्व, , वेलची पूड घालून नीट मळून असे खंग्री लाडू केले. तूप अंमळ जास्त झालं तर बिचारे बसल्याजागी बसले! मग तसेच त्यांना आडवे घालून वड्या थापून टाकल्या. खाताक्षणी विरघळतायत. राघवदासी वड्या म्हणयच्या का आता त्या!! >>

चरण कुठे आहेत बाई तुझे???

हळदी कुंकवा साठी. :

सुरळी वडी, साबुदाणा खिचडी( अर्धवट परतून ठेवता येइल) आणि डी जे चा आंब्याचा शिरा.

बरोबर गरम फिल्टर कॉफी.

रावी, तयार लाडू किंवा वड्यांचे फोटो नाहीत. परातभर घटक पदार्थांचे आहेत. मग लेकीने कॅमेरा पळावला. तो मी हुशारीने तिच्याकडून काढून घेऊन आता कुठे ठेवला ते मला आठवत नाही. कॅमेरा घरातच आहे पण सापडत नाही. (अशा बर्याच वस्तू सध्या बेपत्ता झाल्ययत Wink ).
अमा, जरा सवडीने टाकते. तोवर कॅमेरा मिळाला तर वड्यांचेही टाकते. Happy

राघवदास लाडू = रवा + ओला नारळ लाडू>>
नाही चिनूक्स. ते रवा नारळ लाडू झाले. म्हणजे नेहेमीचेच. त्यात काही विशेष नाही.

राघवदास लाडवाला हरबर्‍याच्या डाळीचा रवा काढावा लागतो. डाळ धुवून, घरातच वाळवून रवा दळायचा असतो. हा रवा रवाळ असतो (:)) आणि किंचित ओलसरही. त्यामुळे त्यात नेहेमीच्या रवा लाडवापेक्षा जास्त तूप लागतं. 'मंद आचेवर' हा डाळीचा रवा आणि तूप गुलाबी रंगावर भाजावं लागतं. रवा भाजताना त्यावर दुधाचे हबके द्यायचे असतात ज्यामुळे रवा मऊ तरीही मोकळा होत जातो. या सगळ्याला खूप वेळ लागतो. नारळ, खवा वगैरे लाड जितके कराल तितके कमीच Happy पाक एकतारीपेक्षा जास्त, दोनतारीपेक्षा कमी (या स्टेपला चेकमेट होण्याची शक्यता सर्वाधिक! ;)) असतो. काही सुगरणी पाकात दूधही घालतात क्रीमी व्हावा म्हणून, काही पूर्ण दुधाचाच पाक करतात (त्यात तार कशी बघतात मला कल्पना नाही). स्किल प्लस पेशन्सचं काम आहे. एन्ड प्रॉडक्ट अर्थातच रवाळ, तूपामुळे न बसणारं, तरीही तोंडात विरघळणारं असणं अपेक्षित असल्यामुळे राघवदास लाडवाचे स्थान इतर लाडवांपेक्षा वरचे आहे Happy

हात्तेरी! पूनम, माझ्या राघवदासी वड्या पार झोपल्याच की म्हणजे! Proud
:धूम पळा आता अति झालं:

पळू नकोस ९. तुझ्या वड्याही मस्त आहेत की. पण ’राघवदास’ नाहीयेत, इतकंच Happy त्यांच्यासाठी तूच एक नाव शोध बरं ’प्रज्ञा वड्या’ किंवा ’९ (घटक असणार्‍या) वड्या’ वगैरे Light 1

ज्याने या लाडवाच्या कृतीचा शोध लावला त्या बल्लवाचे नाव असावे ’राघवदास’; त्याची ’दासी’ करू नका हो Proud

Pages