आधुनिकता की उथळपणा ?

Submitted by वीणा सुरू on 15 December, 2014 - 10:16

१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.

सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).

आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.

जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.

आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?

हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.

थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .

या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पियू , तुम्ही मायबोलीवरचा सर्वात हीट रांगोळ्यांचा धागा पाहिलातच नाही का अजून?
तिथे सर्वात जास्त रांगोळ्या घालणारे रांगोळीतज्ज्ञ!
Happy

(आज मी पण एक रांगोळी घातल्येय तिथे!)

आता सुरू झालाच आहे तर आधुनिकता की उथळपणा वर चर्चा व्हावी.
पुर्नजन्म झालेले आयडी नव्या जन्मात काय नाव धारण करुन वावरत आहेत कळेल.

हा प्रतिसाद आधी लिंबुटिंबू यांच्या ब्रेनट्युमर आणि ज्योतिष या धाग्यावर दिला होता. पण ग्रुपात हा धागा दिसल्याने इथे जास्त योग्य वाटत अस्सल्याने इकडे हलवीत आहे.
संदर्भ - गुरुत्वलहरींचा शोध. ११ फेब्रुवारी २०१६

-------------------------------------------------------------------------

पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तोललेली आहे हे विज्ञान आहे. अध्यात्मिक विज्ञानाला नावं ठेवणारांची तोंडं आता गुरुत्वलहरींच्या शोधाने बंद झालेली आहेत. खरं तर शेषनाग ही उपमा आहे. या लहरी आणि अध्यात्मिक लहरी वेगळ्या नाहीत. कॉस्मिक लहरी किंवा हिलिंग हे खूळ आत्ता आत्ता आलेलं आहे. आमच्याकडे यावर लाखो वर्षांपूर्वी संशोधन झालेलं आहे. हे विश्व अध्यात्मिक लहरींनी बांधलं गेलेलं आहे. जो केंद्रस्थानी असतो त्याला गुरू असं म्हटलं जातं. केंद्रापासून लहरी निघत असतात. आज गुरुत्व लहरी मान्य झाल्या तरी गुरूत्व हे केव्हांच अध्यात्मात आहे. अध्यात्म समजण्यासाठी गुरू लागतो. इथेही गुरूचं महत्व आहे. जीवनात सर्वत्र गुरूचं महत्व आहे. गुरूपासून निघणा-या लहरींनी आपल्यावर प्रभाव पडतो. ज्याप्रमाणे ग्रहांचा गुरूत्वलहरींमुळे एकमेकांवर प्रभाव पडतो. आपलं ज्योतिषशास्त्र याच सिद्धांतावर आधारीत आहे. आता सायन्स ला कळेल की ग्रहांचा आपल्या आयुष्यावर कसा प्रभाव पडतो. आईनस्टाईनला गेल्या शतकात जे जाणवलं ते आमच्या खगोलशास्त्रात पूर्वीपासून आहे.
पौर्णिमेला समुद्राला भरती येते, अमावस्येला ओहोटी. यामागे चंद्राच्या लहरी आहेत. म्हणून आमचं कॅलेंडर ल्युनार कॅलेंडर आहे. तरी देखील आमच्या आणि त्यांच्या कालमापनामधे फारसा फरक नाही. आम्हाला चंद्रावरून हे गुपीत कळालं म्हणून आमचं कॅलेंडर चंद्राने सुरू होतं आणि दक्षिणायन, उत्तरायणाच्या सत्याशी आमचे सण निगडीत असतात. किती प्रगत होतो आम्ही. जर हे ज्ञान पुढे गेलं असतं तर गुरुत्वलहरींच्या शोधाचं श्रेय आमच्या ग्रंथांना मिळायला हवं होतं. पण मुघली सत्तेने आमचे ज्ञान आगी लावून नष्ट केलं. आमचे ग्रंथ आम्हाला वाचू दिले नाहीत. त्याच्यावर कर लावले.
पण गो-यांनी याचे अचूक अर्थ लावले. भारतावर स्वारी केल्यापासून त्यांना ज्ञानाचा खजिना खुला झाला. इथे बसून एकेक ग्रंथ वाचून त्यांनी एकेक शोध लावले आणि त्याचा फायदा उपटला. तेव्हां आता तरी जागे व्हा !

कपोचे , अगदी अगदी!
आणि तुम्हाला माहित्येय का, मध्ये काही संस्कृत वाचताना अडलं तर , म्हणून वरवर वैज्ञानिक भासणार्‍या भारतीय संस्कृत तज्ज्ञांना त्या लोकांनी आधीच हायर करून ठेवलंय.
म्हणजे लोकांना दाखवतात की हे खगोकशास्त्रात पीएच्डी केलेले कोणी थोर वैज्ञानिक आहेत, पण खरे तर ते भाषातज्ञ असतात.
तेच आपले ज्ञान सोप्या इंग्रजी शब्दांत 'त्या' लोकांना देतात. आणि इथे सांगतात 'आम्ही एका सिक्रेट मिशनवर आहोत!'

मायबोलीवर पण आहेत असले एक दोन!
.
.

.

Happy

अगस्ती ऋषीन्ना या तरन्ग लहरी बद्दल माहिती होती... त्यान्चा शोध घेताना सागराचा अडथळा येत होता म्हणुन त्यान्नी सम्पुर्ण सागराला एका आचमनातच गिळन्कृत केले जेणे करुन तरन्ग लहरी त्यान्च्या दिव्य दृष्टीला दिसतील.

साती, उदय, Lol

प्रत्येक गोष्टीत भारतिय शहाणे असं कुठे लिहुन ठेवलय का?
कपोचे, एक भारतिय म्हणुन मला काही गोष्टींचा अभिमान जरुर आहे. पण क्रुपया शाब्दिक खेळ करुन ओढुन ताणुन संबंध जोडु नका.

अध्यात्मिक विज्ञानाला नावं ठेवणारांची तोंडं आता गुरुत्वलहरींच्या शोधाने बंद झालेली आहेत. खरं तर शेषनाग ही उपमा आहे. या लहरी आणि अध्यात्मिक लहरी वेगळ्या नाहीत. कॉस्मिक लहरी किंवा हिलिंग हे खूळ आत्ता आत्ता आलेलं आहे. आमच्याकडे यावर लाखो वर्षांपूर्वी संशोधन झालेलं आहे. हे विश्व अध्यात्मिक लहरींनी बांधलं गेलेलं आहे. जो केंद्रस्थानी असतो त्याला गुरू असं म्हटलं जातं. केंद्रापासून लहरी निघत असतात. आज गुरुत्व लहरी मान्य झाल्या तरी गुरूत्व हे केव्हांच अध्यात्मात आहे. अध्यात्म समजण्यासाठी गुरू लागतो. इथेही गुरूचं महत्व आहे. जीवनात सर्वत्र गुरूचं महत्व आहे. गुरूपासून निघणा-या लहरींनी आपल्यावर प्रभाव पडतो. ज्याप्रमाणे ग्रहांचा गुरूत्वलहरींमुळे एकमेकांवर प्रभाव पडतो.

>>शाब्दिक खेळ

नागराज (पक्षी: राज कॉमिक्सफेम) मध्ये असलेल्या हजारो नागांप्रमाणे ह्या लहरीदेखील शेषनागाच्या डोक्यावरील केसांप्रमाणे आहेत. त्यामुळे आता केस सापडले तर नंतर नागही सापडेल.

आधुनिकतेची प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे. मुंबईला चाळीत राहणाऱ्या मुली अमेरिकेत आल्या कि खाणे पिणे आणि छोटे कपडे घालून धन्य होतात. भारतातल्या सगळ्या गोष्टी त्यांना जुनाट वाटतात. मोठयांना वाकून नमस्कार करणे म्हणजे माझी मुले अमेरिकेत राहूनही फार मागासलेली आहेत असा ह्यांचा समाज असतो. आता बोला. मराठी बोलणारी नवीन पिढी सुद्धा मागास. काय बोलणार अश्या लोकांपुढे.

पण मुघली सत्तेने आमचे ज्ञान आगी लावून नष्ट केलं. आमचे ग्रंथ आम्हाला........ गो-यांनी याचे अचूक अर्थ लावले. भारतावर स्वारी केल्यापासून त्यांना ज्ञानाचा खजिना खुला झाला.

याबद्दल सहमत. पण बाकी सगळे ओढून ताणून उगीचच लिहीले. पाश्चात्यांनी भारतीय ग्रंथ वाचून शोध लावले हे पटण्यासारखे नाही. जरा इतर पुस्तके वाचा.

मानसकन्या - Happy Happy

आधूनीकता म्हणजे आपली मते अत्यंत वेगळ्या पद्धतीने मांडणे, अगदी आमच्या पुणेकरांसारखे. आणी उथळपणा म्हणजे बदा बदा पडणार्‍या पावसाप्रमाणे दररोज बदा बदा नवीन प्रश्नांना टाहो फोडुन नवीन धागे काढणे.:दिवा:

उथळपणा म्हणजे बदा बदा पडणार्‍या पावसाप्रमाणे दररोज बदा बदा नवीन प्रश्नांना टाहो फोडुन नवीन धागे काढणे
>>
ओ रश्मी ताई, तुम्ही हे आमच्या ऋ दादाला उद्देशून म्हणताय का? Uhoh

Pages