श्री लवथळेश्वर मंदीर ,जेजुरी

Submitted by मी दुर्गवीर on 29 December, 2015 - 01:16

श्री लवथळेश्वर मंदिर
श्री समर्थ रामदास स्वामींना या मंदिरामध्ये श्रीशंकराची 'लवथवती विक्राळा' आरती रचिली होती .
काही वर्षा पुर्वी या मंदिराविषयी माहिती वाचण्यात आली आहे . जेव्हा जेजुरी ला जाईन तेव्हा नक्की दर्शन घेऊन अस ठरवलेच होते , कुटुंबांसहित देवदर्शनास जाने झाले आणि या मंदिराच्या भेटीची ओढ लागली होती . "कुलस्वामी खंडोबा " दर्शन घेऊन पुढे निघलो , बहुतेक लोकांना इथे अश्या प्रकारचे मंदिर आहे का ? हेच माहित नाही , अनेक लोकांना विचारल्यावर काहींनी समोर कुठे तरी बोट दाखवून तिथे मंदिर आहे असे दाखवले , पण आपण मंदिराविषयी जो अंदाज बांधतो कि , २० एक फुट उंच कळस , फडकणारा भगवा वैगरे वगरे , त्याच ठिकाणावरून तीनवेळा जवळून गेलो परतू मदिर काही दिसे ना , इथे रत्याच्या कामकरणार्या कामगारांना विचारले तेव्हा त्यांनी रीतसर ठिकाण दाखवले .…

एका मोठ्या पडलेल्या वादाच्या झाडा जवळ हे मंदिर आहे , अर्थ वर्तुळ कमानीवर "श्री श्री लवथळेश्वर मंदिर " असलेले फलक आहे ,
12438697_1011753785532944_586151220_o.jpg

जमिनीशी समांतर असलेले हे मंदिर , प्रथमदर्शी मंदिराची कोणतीही खानाखुणा जाणवली नाही .
12436617_1011754312199558_745292244_o.jpg
जमिनीत कोरलेल्या पायर्या, आधी right मग Left मारत मंदिराच्या गाभार्यात प्रवेश करतो ,
मादिरचा कळस म्हणजे एक शिवपिंडच .
12449339_1011754628866193_565398932_o.jpg

भिंतीवर कृष्णूमूर्ती ,हनुमान शिल्प आणि इतर देविदेवता पाहता पाहता आत यावे .
12399268_1011755705532752_624399731_n_0.jpg12399410_1011756338866022_2145235080_n_0.jpg
आत प्रवेश केल्यावर रंग मारलेला मोठ्ठला नंदी दिसतो ,
12435823_1011135275594795_384765574_n.jpg
त्या मागेच गणेश मूर्ती आणि नागमूर्ती आहे .
12421644_1011762365532086_1608202890_n_0.jpg
नंदी समोर अडीच एक फुट गर्भगृहेत "गेट" च्या पलीकडे जमिनीत "शिवशंकराचे " दर्शन होते . मुळपिंड तसेच ठेऊन सर्वत्र " टाईल्स " बर्या पैकी लावले आहे ....

12443405_1011756772199312_1000536725_o.jpg

या मंदिराविषयी काही कथा सांगितल्या जातात .
लवथळेश्वर मंदिर म्हणजे महादेवाचे जागृत स्थान असे मानले जाते. या स्थानाविषयी मार्तंड विजय ग्रंथामध्ये महत्म्य सांगितले आहे, दुर्वास ऋषींचा लवा नामक शिष्य होता त्याला स्वतःला आपल्या तप साधनेमध्ये व्यत्यय येवू नये असे वाटत होते, ही बाब त्यांनी आपल्या गुरूच्या कानी घातल्यानंतर, दुर्वास ऋषींनी शिष्याच्या तपश्चर्येसाठी हा परिसर दानव-शाकिनी-डाकिनी-भूत-पिशाच्च यांच्या संचारापासून अभिमंत्रित करून मुक्त केला, तोच हा लवथळेश्वर परिसर. पुढे कृतयुगामध्ये मणीचूल पर्वतावरील सप्तऋषींना मणीमल्ल दैत्यांपासून आपली कुटुंबे सुरक्षित ठेवण्यासाठी नारद मुनींनी याच परिसरामध्ये धेवण्याचे सुचविले. समर्थ रामदास स्वामींना या मंदिरामध्ये श्रीशंकराची 'लवथवती विक्राळा' ही आरती स्फुरल्याचे सांगितले जाते.
माहिती साभार (jejuri.in )

फोटो इतके छान नाही आलेत , cameraची battery low झाली म्हणून सारे फोटो मोबाईलच्या कृपेने आले आहेत .

धन्यवाद __/\__

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती. या नावाचे स्थान असेल याची कल्पनाच नव्हती.

उशीरा प्रतिसाद देतोय कारण असे आवडते बीबी अकारण मागे ढकलले जातात.

ह्या क्षणी मी एक्झॅक्टली त्या मंदिराच्या डायगोनली अपोझिट असलेल्या हॉटेलमध्ये राहत आहे. निरेच्या प्लँटमध्ये काम करताना बारा वर्षे सातत्याने ह्या मंदिरासमोरून जात असे. कोणतेही सुशोभिकरण नसलेल्या ह्या मंदिराच्या जागेत वावरताना मस्त वाटते. माझ्याकडेही छायाचित्र आहे, शोधून देईन. बाकी खंडेराय शंकराचाच अवतार, पण हे मंदिर अगदीच एका कडेला!

लवथवती विक्राळा हे मात्र आज समजले. धन्यवाद.

आजच्या श्रावणी सोमवारी शंकराच्या आरतीची माहित नसणारी माहिती मिळाली. जय लवथळेश्वर. धन्यवाद दुर्गवीर. सामो तुम्हालाही धन्यवाद.

कदाचित ते लोक बाहेरची भाविक वगैरे असतील त्यामूळे माहित नसेल. त्या भागाला लवथळेश्वर असच नाव आहे, माझ्या एका मित्राचं घर आहे तिथेच.

वर बेफी म्हणतात ते बहुधा जानकी हॉटेल