छचोर

Submitted by Chakrapani on 12 July, 2008 - 05:02

पाऊस इतका छचोर आहे साला!
ओल्याचिंब केसांमधून रुळतो तुझ्या मानेवर
टपटपतो लाजलाजून,जमून भिवयांच्या पागोळ्यांवर
पडतो आम्ही दोघेही -पडली मल्हाराची थाप ढगांवर की
फरक फक्त इतकाच -
तो कोसळतो,मी ढासळतो
दुसर्‍या कुणी तुला भिजवलं असं
की माझं पाणी पाणी होतं
आणि लाजून लाजून तुझंही
मग काय! - पावसाला आणखी पाणी मिळतं,भिजवायला!
पाऊस इतका छचोर आहे साला!

गुलमोहर: 

पडली मल्हाराची थाप ढगांवर >>>
खासच Happy

>>पावसाला आणखी पाणी मिळतं,भिजवायला!

लै भारी रे!

.