आधीचे वळण

Submitted by जयदीप. on 27 December, 2015 - 12:03

आधीचे वळण घ्यायला हवे होते
एव्हाना घरी जायला हवे होते

चिडचिड बंद झाली तुझी तसे कळले
कोणाला तरी खायला हवे होते

तो पेटून मग या जगा पुढे गेला
माझेही हसे व्हायला हवे होते

दगडाला कधी देवपण दिले नसते
हात तुला तसे द्यायला हवे होते

त्या गर्दीत मी एकटा तरी नसतो
एकांता, तुला न्यायला हवे होते

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>तो पेटून मग या जगा पुढे गेला
माझेही हसे व्हायला हवे होते

त्या गर्दीत मी एकटा तरी नसतो
एकांता, तुला न्यायला हवे होत>>>बढिया!
गझल आवडलीच!

सुंदर