तुष्टवावया इंद्रियांसी । तुवां जन्मावें म्लेंछवंशी ।

Submitted by moga on 24 December, 2015 - 06:51

१. माझ्या लग्नाला सुमारे आठ वर्षे होऊन गेली. मी मुंबईत नव्यानेच आलो होतो. नोकरी होती. बायकोही गावाकडचीच . सुमारे महिनाचभर सुखाचे दिवस पाहिले. तदनंतर तिला नोकरी लागली आणि सगळा बट्ट्याबोळ झाला. तिच्या बापाला असलेल्या अनेक मुलींपैकी एक रिकामट्व्कडी तिची बहीण व तिचा रिकामटेकडा नवरा याना सगळा पगार देणार , त्याग करणार या हट्टाने घरात भांडणे सुरु झाली... माहेरी पगार द्यायला माझा विरोध नव्हता. पण भविष्यात होणार्‍या आपल्या मुलाला चार पैसे तरी ठेवावेत हीच माझी इच्छा होती. उरलेली रक्कम सुमारे ७० % तिने रिकामटेकड्याना द्यावेत ही माझी अपेक्षा होती.

पण व्हायचं तेच झाले. रिकामट्व्कड्याना संपुर्ण पगाराचा सुटलेला मोह आणि त्यांच्यासाठी सर्व सुखाचा त्याग करणे हे कर्तव्य आहे या बायकोच्या आंधळ्या भीष्मभक्तीत माझा सगळा संसार नासून गेला.

पगाराला वारस नको म्हणुन त्यानी एक अ‍ॅबोरशनही केले. मी काहीही करु शकलो नाही.. दिवसा आठ ते रात्री आठ नोकरी करुन रिकामटेकड्यांचे पोट भरु शकत असताना रात्री आठनंतर माझी बायको , मुलाची आई , नराची मादी या भुमिका पार पडायला तिला कोणता भीष्म आणि कोणती मीराबाई अडवत होती हे ती आणि तिचा त्यागवादी हिंदू धर्मच जाणे !

त्यानंतर काही काळाने ती पुन्हा परतली . अशा बायका धड रहातही नाहीत आणि जातही नाहीत , हे मला ठाउक होते.

पुन्हा प्रेग्नन्सी , यावेळी मात्र श्रीकृष्णाची पुजा सुरु केली ! मुलगाच हवा !!!!!!!! आणि मग एक दिवशी ते भयाण विचार मी ऐकले ! ... मुलगा हवा ... कृष्णासारखा ! जन्माला माझ्या घरात येऊन नंतर तिच्या बापाकडे जायला हवा ! मुलगा मुलगा करत मुली काढत सासर्‍याचे स्पर्म संपले ! आता माझे स्पर्म ! वा रे धर्म !

मी तेंव्हा खुप चिडायचो. कुढायचो. रडायचो. आणि एक दिवस तो दिव्य प्रकाश माझ्या आयुष्यात आला. Proud माझ्या एका मित्राने मला दुसर्‍या एका कामासाठी भेटायला बोलावले. पत्ता होता. माउंटमेरी स्टेप. बांद्रा. मी चुकुन रिक्षावाल्याला माउंटमेरी इतकेच बोललो. त्याने डायरेक्ट चर्चजवळ नेले. सकाळी सकाळी घरी मुलगाच हवा यावरून भांडण झाले होते. मीही चर्चसमोर बोललो ... मला मुलगी हवी.. तीहीएकुलती एक ... !

पुढे डिलिवरीला आमचे पूज्य सासरेबुवा तिला घेऊन गेले ... त्यानंतर माझे फोन टाळणं , मला भेटू न देणं , हे सगळे प्रकार सुरु झाले. अर्थ अगदी उघड होता. बायकोला संसारातून उठवून तिला बाकींच्याचा भीष्माचार्य करणे आणि त्यानंतर पुढच्या पिढीत त्या पुढच्या मुलाला भीष्माचार्य करणे.

हिंदू धर्माबद्दल द्वेष निर्माण झाला तो त्याचमुळे ! सासर्‍याचा बाप वीस एकर शेताचा मालक होता . त्याने ढीगभर मुले काढून पुढची पिढी चार एकरवर आणली. सासर्‍यानेही तोच कित्ता गिरवून चार मुलीना एक एकरवर आणून बसवलं ! आणि यातून सुटकेचा मार्ग काय ? तर माझा आणि माझ्या संततीला भीष्माचार्याच्या गुवात ढकलून देणे !

पण ! मुलगी झाली हो ! Proud

माउंटमेरी पावली . मी तिला किमान बघायला तरी जाणारच होतो . आणि चारच दिवसात हिंदू कर्मविपाकाचे मांजर नशीबाच्या आडवे गेले. मला अपघात झाला. डाव्या पायाची तीन हाडे मोडली.

त्यानंतर बायको व माहेरच्याना नवीनच पंख फुटले ... आता बायको नोकरी करेल. मी जन्मभर लंगडा होऊन माझ्याच घरात बसेन. आणि माझी मुलगीही त्यांच्याकडेच.

पण नाही ! Proud जगात अजुन एक धर्म आणि देव बाकी होता .

दशरथापासून ते पेशव्यापर्यंत हिंदूंचे संसार ही फाटक्या संसाराची व गृहकलहाची कथा आहे.

अपत्यशोकातला दशरथ.
संसारसुख सोडलेला राम
बायको नसलेला लक्ष्मण.
पोरं नदीत फेकुन नवराही सोडून गेलेली नदीमैय्या
राधा व मीरा असल्या वार्‍यावर उधळलेल्या बायकांचे नवरे.
मग्रुरपणे पुरुरव्याला सोडलेली उर्वशी
ऋषीबरोबर अर्धवट संसार करुन मुलीसह पळ काढलेली ती कुणी अप्सरा.
पैसा वारस यातून साक्षात नवर्‍याला विष घातलेली ती कुणी बाई
बायकोच्या माहेरच्यांच्या कारस्थानाला बळी पडलेला तो कुणी धर्मवीर.
धृवबाळ व त्याचा बाप.
सुखाची वाटणी न देता नुसत्या युद्धात मरायला ठेवलेला भीष्म , घटोत्कच आणि तो मस्तानीपुत्र

..

संसार म्हणजे हिंदू कहाण्यांचा उकिरडा होऊन गेला होता.

...

ही संधी साधुन समस्त हिंदु धार्मिक साहित्य माझ्यासमोर येऊन पडले होते. पण माझ्यावर उपचार करायला त कुचकामी होते. कधीतरी कुणी तरी बोलले म्हणून गुरुचरित्र १४ वा अध्याय वाचायचो. पण त्यातही तीच रडकथा .... मुसलमान सुलतान व दरिद्री ब्राह्मण कथा.

पावणे दोन वर्षे झाली . पायात फारशी प्रगती नव्हती. काठी , वॉकर , भिंत धरुन चालणे. एकदा मुलीला अट्टाहासाने भेटुन आलो. पण तेही वारंवार जमणार नव्हतं.

१४ वा अध्याय सुरुच होता.

आणि एक दिवस गुरुचरित्र ९ व्या अध्यायात गेलो. अगदी सहज , नकळत...................

२. नववा अध्याय आहे एका धोब्याचा. गंगा नदीच्या काठी धुणी धुणारा धोबी एक दिवस नदीत नावेत बसून मजा करत असलेल्या एका राजाला पहातो आणि त्याला प्रश्न पडतो...

धन्य राजयाचे जिणें । ऐसे सौख्य भोगणे ।
स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे । कैसा हा भक्त ईश्र्वराचा ॥ २१ ॥
कैसें याचे आर्जव-फळ । कवण देव आराधिला ।
कैसा गुरु असें भेटला । मग पावला हें पद ॥ २२ ॥ 

याने कोणता देव पूजला अन हा राजा झाला ?

तिथे दत्तगुरु येउन उत्तर देतात ...

तुष्टवावया इंद्रियासी / तुवा जन्मावे म्लेंछवंशी //

तो राजा मुसलमान आहे. तूही मुसलमान हो व ते सुख मिळव !

मला उत्तर मिळाले. Proud

घर में जिहाद का ऐलान किया ! मैं मुसलमान ! मेरा अल्ला मेहेरबान !

३. त्यानंतर माझा पाय एक महिन्यात बरा झाला. परत मुंबई गाठली. एक नोकरी मिळाली. संसार नव्हताच म्हणून दुसरे हस्पिटल सहज चौकशी करायला गेलो तर तिथेही नाइट जॉब मिळाला.

मला दोन नोकर्‍या. रोज हट्टाने मुलीसाठी सासुरवाडीला फोन करायचो. अखेर एकटं रहाणं हे परवडणार नाही हे उमगून आमची स्मिता पाटील परत आली. उंबरठा सिनेमात नवर्‍याचे सदन वार्‍यावर सोडून इतर बायकांचा उद्धार करत गगन सदन तेजोमय करत बोंबलत फिरत असते. अखेर ती संसारात परत येते.

आमची स्मिता पाटील प्रेमाने बोलली... कुलदेवतेला जाऊन येऊ मग सुरु करु... मी म्हटलं .. बाई , तू स्वतःच एक मोठा नरसोबा आहेस. त्याग व भोग यांच्या उंबर्‍यावर बसलेला ! घरात जायचं की बाहेर जायचं हा गोंधळ सात वर्षात तुला सोडवता आला नाही ! आता दुसरा नरसोबा कशाला ?

फिर भी वो नरसोबा को सलाम वालेकुम बोलके आया .

Proud

बायको व मुलगीच्परत आल्यावर आधी चर्च गाठले. मुलीला माउंटमेरी व चर्च दोन्ही आवडले.

सध्या अकबर जोधा व प्रिन्सेस मजेत आहेत. आणखी एक गुड न्युज आली. मला डिप्लोमा एच आय व्ही स्पॉन्सरशिप मिळाली. आता रोज बापलेक अभ्यासाला बसतो.

Group content visibility: 
Use group defaults