तुरीच्या दाण्याचे आळण (विदर्भातला लोकप्रिय प्रकार)

Submitted by सायु on 15 December, 2015 - 02:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तुरीच्या ताज्या शेंगांचे दाणे = दिड वाटी
छोटे टोमाटो= २ (गावराणी, नसतील तर मग १/२ चमचा आमकुट पावडर)
मध्यम आकाराचा कांदा = १
लसुण = १छोटा गट्टा (१३, १४ पाकळ्या)
हिरव्या मिर्च्या = २
बारिक चिरलेली कोथिंबीर
तेल = १/२ पळी
धणे पुड = दिड चमचा
गुळ = १/२ लिंबा एवढा
फोडणी साहित्य नेहमीचेच.

क्रमवार पाककृती: 

हिवाळा आला की, विदर्भात तुरीच्या शेंगांवर जोर असतो, मग त्याच्या दाण्याचा भात, मुगाची तुर दाणे घालुन फोडणीची खिचडी असो का तुर दाण्याची उसळ , आळण , आमटी ..काही नाही तर तुरीच्या उकडलेल्या शेंगा तरी होतातच... Happy असो, अशाच एका भन्नाट आणि इथे आवडणार्‍या पदार्थाची पा. कृ. आज देणार आहे..:)

तर मुळ कृती कडे...

सगळ्यात आधी तुरीचे दाणे धुवुन, एका गंजात दोन वाट्या पाणी आणि थोडे मिठ घालुन १० मि.उकडुन घ्यावे . शिजले की, निथळुन घ्यावे, आणि एका कढईत चांगले भाजुन घ्यावे..(नुसतेच ,तेल नको). भाजुन गार झाले की मिक्सर मधुन फिरवुन घ्यावे..

आता वाटण करायचे आहे, त्यासाठी मिरच्या, कांदे टोमाटो हे सुधा भाजुन वाटुन घ्यावे..
कढईत तेल तापले की, जिर मोहरी घाला आणी हे वाटण, + एक च. तिखट, हळद, धणे पुड घालुन ,कडेला तेल सुटे पर्यंत वाफेवर शिजु द्यावे, आता मिक्सर मधुन काढलेल्या दाणाचे वाटण घालवे..पुन्हा एक वाफ काढावी, दोन वाट्या पाणी (गरम असेल तर उत्तम) आणि मिठ + गुळ घालुन छान उकळी फुटु द्यावी.

बारिक कोथिंबीर घालुन सर्व्ह करा..

गरम भात, भाकरी, पोळी कशाबरोबरही छानच लागते.. नुसते सुप सारखे पण घेऊ शकता.

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

सग़ळे साहित्य भाजुन केलेले वाटण घातले की वेगळीच छान चव येते.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टीना धन्स..दाणे मी पण भाजते, पण आधी थोडे उकडुन घेते. लौकर शिजते आमटी..
वर्षु दी, तुझा प्रतिसाद मीस करत होते..:)

काल केलं होतं हे रात्री. कांदा टोमॅटो मिरची थेट गॅसवर भाजली. लसूण कच्चाच ठेवला. बरोबर आहे का? चव तर मस्तच आली होती. तुरीच्या दाण्यांचा कुठलाच प्रकार याआधी खाल्ला नव्हता. पण हा प्रकार फारच आवडला. धन्यवाद सायु Happy
मटार उसळ पण अशीच केली तर चांगली लागेल असं वाटतंय. दाणे न वाटता.

Pages