बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरत Proud
खरंतर साबुदाण्याची साग्रसंगीत खिचडी (बटाटे घालून, वरून ओलं खोबरं कोथिंबीर, लिंबाची फोड - सोबत काकडीची कोशिंबीर वगैरे) एकाच वाढपात पोटात दमदमीत बसते. (माझा अनुभव). अर्थात भुकेवर आहे.
मटारपोहे हाही छान ऑप्शन आहे. वरून मस्तपैकी डाळिंबाचे दाणे, शेव, कोथिंबीर वगैरे घातल्यावर तर एकदम राजेशाही वाटतील पोहे! पोहे म्हटलं की सोबत गरम गरम इम्रती / जिलबी किंवा गाजर हलवा! (डोळ्यांसमोर तो साजरा बेत आणून आनंदाने डोलणारी बाहुली Lol ) मसाला चहा.

हाताशी मदत असेल तर टिपिकल सौदिंडियन ब्रेकफास्ट स्प्रेडही सोयीचा पडू शकतो. इडली-वडा सांबार चटणी, बोंडा, मूग हलवा / मँगो शिरा / गोडाचा केशरी शिरा, कर्ड राईस, आंब्याचे लोणचे, पॉप्पडम्. बनाना चिप्स. काप्पी. (खूपच जंगी बेत झाला, नाही? Lol )

अकु, बरोबर, साबुदाणा खिचडीबद्दल. मी कधी कंटाळा आला तर जेवण म्हणून करते साखि आणि बरोबर दह्यातली काचीको.

हाताशी मदत असेल तर टिपिकल सौदिंडियन ब्रेकफास्ट स्प्रेडही सोयीचा पडू शकतो. इडली-वडा सांबार चटणी, बोंडा, मूग हलवा / मँगो शिरा / गोडाचा केशरी शिरा, कर्ड राईस, आंब्याचे लोणचे, पॉप्पडम्. बनाना चिप्स. काप्पी. (खूपच जंगी बेत झाला, नाही?>>>

क्या बात! क्या बात!

आम्ही अतिविचारांती पुरी भाजी आणि श्रीखंड असा बेत फायनल केला. एकतर अकरा साडे अकरा वाजता येणार होते. धड ब्रेकफास्टची वेळ नाही की जेवणाची. फारशी ओळख नसल्यामुळे "नाश्ता करून आलात का??" जेवून जाणार का? वगैरे (आगाऊपणे) विचारताही येत नव्हतं. म्हणून पुरीभाजी आणि मसालेभाताची तयारी असा ऑप्शन ठेवला. लगेच निघतो म्हणाले की पुर्‍या तळून लगेच वाढणार आणि निवांत जेवून जातो म्हणाले तर पुर्‍या तळतानाच मसालेभात फोडणीला टाकणार. कुर्माभाजी रेडी टू ईट ठेवली होती. पापड लोणचं दही वगैरे होतंच. गोडासाठी श्रीखंड आणि काजूकतली असे दोन ऑप्शन्स ठेवले. ते लगेच निघतो म्हणाले. पुरीभाजी आणि श्रीखंड वाढलं. नंतर शहाळ्याचे पाणी.

घरी काही मंडळी तीन-चार दिवस राहायला येत आहेत. काही जेवणं बाहेर वगैरे होतील पण निदान एक-दोन घरगुती पण व्हायला हवीत असं वाटतंय. मदत मिळेल पण तरी होस्टपणा आमच्याकडे असल्यामुळे निदान प्लानिंग नीट करायला हवं. त्यात दोघीजणी शाकाहारी आहेत. एकदा खिमा पॅटीस करायचा विचार आहे. सोबतीला एखादा पुलाव वगिअरे टाइप राइस केला तर पोटभरी व्हावी. तर खिमा पॅटीसच्या वेळी शाकाहारींना काय करू? मी पॅटिस एक्सपर्ट नाही पण करायला मदत मिळू शकेल. आधी करून ठेवायचं कुठचं सारण किंवा काही टिप्स/ट्र्स्टेड कृत्या दिल्या तरी चालेल.शिवाय आणखी एखाद्या जेवणाचे सोपे पर्याय दिलेत तर चालेल.
गोडासाठी आधी श्रीखंड/गुलाबजाम असं काही करावं की विकत काही आणावं त्याचाही विचार सुरु आहे. तेव्हा बचीभा पुरी वगैरे वेळ मारू टाइप काही करता येईल. (वेळ मिळाला तर आधीचे मेन्युज पण चाळणार आहे)

कधी नव्हे ते पाहुणे यायच्या आधीचा विकेंड्/विकडेज सगळे फार बिजी आहेत. इं.ग्रो. पण या विकेंडला केली तर ठीक नाही तर ती मंडळी घरात असताना त्यासाठी लांब ये-जा आहे. असो. इथे मेन्यु हवाय तर माझं कोतबो सुरु होईल असं वाटतंय.

बटाटा, पुदीना असे पॅटीस; हेच सारण भरून पराठे पण होतील.
स्नॅक म्हणून सुंदल, आपल्या त्या ह्यांचे समोसे, सुरळीची वडी,ढोकळा, फ्रोजन इडली असेल तर फ्राईड इड्ली

बाकी मग नेहेमीचे यशस्वी कलाकार आहेतच. बटाटा भाजी, पुरी, आम्रखन्ड, खमंग काकडी, मसालेभात इ

Khichadi-tak-papad, pithala-bhat, kanda-batata rasa +bread,bhat, usal/misal- bread, dahi-bhat with Pattice and for veg pattice filling simple batata bhaji, if frozen poli etc. Available then rama or chhole (canned), making pizza with ready made dough and canned toppings.

वरणफळं? दलिया खिचडी?

वरणफळांच्या सोबत ताक, सॅलड, दहीभुत्ती (हवी असल्यास) ठेवता येईल. भाजलेले / तळलेले पापड. सांडगी मिरची तळून.

दलिया खिचडी भरपूर भाज्या घालून केली तर वन डिश मील होईल. सोबत टोमॅटो सूप / सार. पालक रायता. फ्रूट सॅलड.

थालिपीठं, लोणी, दही, ताक, मिक्स भाज्यांचं किंवा कैरीचं लोणचं, कार्ल्याचं पंचामृत किंवा काचर्‍या, दहीभात / मूडाखि.

नक्की किती मंडळी येणार आहेत? शाकाहारी असली तरी अभारतीय पदार्थ खातील का?
१. पास्ता, गार्लिक ब्रेड, ग्रिल्ड व्हेजीज, मॅश्ड पटेटोज हा मासेससाठी पटकन होणारा मेनु आहे
२. टाकोज, मेक्सिकन राइस, मेक्सिकन सॅलड, अ‍ॅझटेक किन्वा बोल सारखा प्रकार
३. बर्गर पॅटी आणि बन्स लोकल ग्रोसरीतून आणून ठेवलं तर एका मीलसाठी चिकन/व्हेजी बर्गर्स, चिकन नगेट्स, इ कॅरमलाइज्ड कांदे करून थोडं ग्लॅमर देउ शकतेस मेनुला Happy
४. खिचडी, पापड, लोणचं, कढी, केळ्याचे/वांग्याचे काप/एखादी परतून केलेली भाजी तोंडी लावायला
६. नाष्ट्यातः पोहे, सा खि, उपमा हे पण जास्त लोकांसाठी पटकन होणारे आहेत. पोहे, साबुदाणा, रवा आणायला वेळ नसल्यास किन्वा वापरून सा.खि. करू शकतेस
७. पॅन केक्स, वॉफल्स (आयर्न असल्यास), स्क्रॅम्बल्ड एग्स, इ अमेरिकन ब्रेफा
८. छोले-समोसा/आलुटिक्की चाट, पुलाव/मसालेभात, टोमॅटोचं सार/कढी, एखादं रायतं/कोशिंबीर

गोडासाठी पाय, ब्राउनी, क्रीम पफ्स, आइसक्रीमचे २-३ फ्लेवर्स आणून ठेव. शेवयांची, तांदळाची खीर (फिरनीचीच कृती पण सेट न करता), फ्रूट कस्टर्ड हे पटकन होणारे आयटम.

इं ग्रो मध्ये न जाता सुद्धा हे पदार्थ होतील.

वरणफळांसारखे प्रकार वन डिश मील असले तरी खूप मंडळी असतील तर लाटा, कापा, शिजवा यात खूप वेळ जातो आणि क्वान्टिटी अतीजास्त असावीच लागते.

कां-ब-टो रस्सा / फ्लॉवर मटार बटाटा रस्सा (झणझणीत) आणि सोबत ब्रेड / पोळ्या / पराठे, भात हाही एक मस्त पर्याय होऊ शकतो. सोबत एखादे रायते / कोशिंबीर.

तसेच राजमा-चावल, पोळ्या / पराठे, कोशिंबीर. डावीकडची टिकाऊ तोंडीलावणी अगोदर करून ठेवता येतील.

वॉव बरेच पर्याय आणि मुद्देसूद (शिका सिंडरेला कडून - हे मी मलाच ;)) आलेले आहेत.

>>शाकाहारी पॅटीस मटार- बटाट्याचे सोपे आहेत.
यात काय मटारचा लगदा (?) बटाट्यात भरतात का? मी पॅटिस ऑप्शन विचारला का कारण खिमा पॅटिसला जे वलय आणि पोटभरेपणा आहे तो या पॅटीसला आहे का देव जाणे. इन जनरल कुठले ओव्हहाइप्ड पॅटिस शोधत होते मी शाकाहारासाठी. नाहीतर ते एकच घेतील आणि मग भात एके भात होईल. असो...सध्यातरी हाच पर्याय म्हणून ठेवते निदान खिमा वाल्यांची मज्जा Wink कदाचीत वरचा क्रं.३ पर्याय पण वापरता येईल. फक्त ही मंडळी या घरात पहिल्यांदा येत असल्याने होस्ट म्हणताहेत पोळ्या सोडून फार फ्रोजन गोष्टींचा घाट नको.असो. मला काहीच जमलं नाही तर मी माझा व्हेटो वापरेन.

क्र. ६ आणि ७ चं सगळं सामान आहे. एकंदरित सकाळची न्याहारी कव्हर्ड आहे.. कधीतरी दुपार किंवा रात्रीची दोन-तीन जेवणं होतील तेव्हासाठी वरती भरपुर पर्याय आहेत. शक्यतो वन डीश मिल करणार नाही चकोल्या,दलिया खिचडी वगैरे (आमचीच मेंबरं ते केलं तर मला खायला लावतात ही एक मोठी गोची आहे. इतर वेळी तिकडे पण मी व्हेटो वापरते किंवा त्यावर आमिश म्हणून शेव-बिव देते...पाहुण्यांसमोर ते मार्केटिंग नको :))

>>वरणफळांसारखे प्रकार वन डिश मील असले तरी खूप मंडळी असतील तर लाटा, कापा, शिजवा यात खूप वेळ जातो आणि क्वान्टिटी अतीजास्त असावीच लागते.
अतिशय चांगला मुद्दा आहे. Happy

एकुणात इं.ग्रो. झाली तर नेहमीचे यशस्ची पनीर, इडलीचं रेडीमेड बॅटर, त्या ह्यांचे समोसे आणि अळूवड्या दोन तीन चटण्या, चाट आयटेम्सची पाकिटं आणेन (हे एका उस्तवार पटाईत गुजराती मैत्रीणीने सांगितलंय. कदाचीत कुणाला उपयोगी पडेल) आणि माझ्याच छोट्या मेंबर्सनी माझं डोकं खाऊन मी काय करणार होते ते मला विसरू देऊ नये म्हणून ग्रिल्ड चीजचं सामान पण ठेवेन.

आभार्स. आणखी चर्चा झाली तर वाचेनच.. तूर्तास टेकिंग ऑफ फॉर टाइम बिइंग Happy

तू पॅटिस कशाचे करणार आहेस? हे असे असतील तर शाकाहारी मंडळींसाठी बटाट्याचं सारण करू शकतेस असं तो सांगतोय बहुतेक.

image.jpg

नाही मी त्या लेयर्सची नुसती खारी पण जाळलीत उप्स Wink

बटाट्याच्या पारीत भरून वाले हेवी आणि शाही अंड्यात घोळवून बिळवून Happy

शुम्पी आमची लोकं बो टाय घातला तर नाकं मुरडतात आणि कर्ली पास्ता घातला तर अंग वेडवाकडं करून दाखवतात. आहे हे गिळा हा एकच ऑप्शन. म्हणून पण यु हॅव अ पॉइण्ट Happy

लिंकवरचे फोटो अ‍ॅपिटायझिंग आहेत .. टोफू वापरून करून बघायला हवं (म्हणजे ते सोया चंक्स् शिजवा, दुध-पाण्याचं मिश्रण फेकून द्या, ते मिक्सर मध्ये वाटा असे सगळे कष्ट वाचतील ..;)

यात काय मटारचा लगदा (?) बटाट्यात भरतात का? मी पॅटिस ऑप्शन विचारला का कारण खिमा पॅटिसला जे वलय आणि पोटभरेपणा आहे तो या पॅटीसला आहे का देव जाणे.>>>> अयायायायायाया!!! ये तो मटार पॅटिस नही जानती Uhoh

आम्ही अडीच माणसं रविवारी पिकनीकला जाणार आहोत. नवर्‍याच्या कॉलनीची पिकनीक आहे. दुपारी जेवणासाठी काय नेता येईल?? साधं, सुटसुटीत आणि कमी वेळात बनवता येईल असं काहीतरी हवंय. सकाळी ८ ला निघायचंय सो तोवर लेकीचं आवरुन, पदार्थ बनवुन तयार व्हायला हवाय. सोबत लेक (अडीच वर्षं)आहे, म्हणजे तिच्यासाठी काहीतरी वेगळा ऑप्शन लागेलच. लास्ट ऑप्शन आहे एक, पण तो फारच नाहीच जमलं काही तर ठेवलाय.

इडली- चटणी, उपमा असे २ ऑप्शन्स मला सुचलेत.

आपापल्यापुरताच डबा न्यायचाय का?

पराठे-चटणी/ सॉस
सॅन्डविच
भोपळ्याच्या पुर्‍या (घारगे)
तिखटमीठाच्या पुर्‍या- पालक, मेथी वगैरे घालून
ललीने लिहिलेला इडली रव्याचा उपमा पण बघ
याबरोबर भात हवा असेल तर- दहीबुत्ती. विरजण घरातून निघताना लावायचं.

डबा किती जणांसाठी न्यायचाय ते सांग की... त्यावर मेनू अवलंबून!
पन्नास माणसं असतील तर तू काय पन्नास जणांसाठी इडल्या उकडत बसणार आहेस का पहाटे पहाटे?

लेकीसाठी पोळीचा रोल आणि तुमच्यासाठी सा.खि.+अमूल दह्याचा डबा नेता येईल. बाकी तुला सुचलेले आणि पूनमने सुचवलेले पर्याय आहेतच.
अजून झटपट हवं असेल तर प्रेशर पॅनमध्ये भाज्या/ कडधान्य घालून आवडीप्रमाणे गरम मसाला/ बिर्याणी मसाला/ खडा मसाला वगैरे घालून खिचडी/ पुलाव करता येईल. तुमचं आवरेपर्यंत पॅनचं प्रेशर पडेल, आणि लेकीचं आवरून होईपर्यंत भात थंड होऊन डब्यात भरता येईल. सोबत द्ह्याचा पॅक, खारी बुंदी वगैरे घेता येतील.
लेकीसाठी फळं, सुका खाऊ वगैरे जवळ ठेवशीलच.

खिचडी/पुलाव पण बेश्ट आहे.. २ डबे काढले पुलावचे तरी काम होऊन जाईल. लेकीसाठी सुका खाऊ ठेवणार आहे नक्की. smiley-happy093.gif झालं माझं काम हलकं....

Pages