विचित्र

Submitted by जयदीप. on 15 December, 2015 - 23:39

एवढा तो विचित्र आहे का
फक्त माझाच मित्र आहे का

बोलले मन मलीन जन्मांचे
या क्षणी ती पवित्र आहे का

एक फोटो जगास वाटू दे
ते तुझे एक चित्र आहे का

चित्रपट जो बघून आलो मी
तेच त्याचे चरित्र आहे का

फार ताजे अजून काही क्षण
आठवण ती सचित्र आहे का

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोलले मन मलीन जन्मांचे
या क्षणी ती पवित्र आहे का

चित्रपट जो बघून आलो मी
तेच त्याचे चरित्र आहे का

शेर आवडले.
शुभेच्छा.

बोलले मन मलीन जन्मांचे
या क्षणी ती पवित्र आहे का>>>व्वा,क्या बात!

चित्रपट जो बघून आलो मी
तेच त्याचे चरित्र आहे का>>>मस्त!

फार ताजे अजून काही क्षण
आठवण ती सचित्र आहे का>>>अप्रतिम!