फूड प्रोसेसर / मिक्सर / ग्राइंडर / चॉपर कोणता घ्यावा

Submitted by शूम्पी on 29 May, 2012 - 10:20

HBFPGoodOld.jpg
मी गेले १० वर्ष हॅमिल्टन बीच चा वरच्या फोटोतल्यासारखा फूड प्रोसेसर वापरत होते. तो किती मस्त होता ते मला तो स्वर्गवासी झाल्यावर समजले. तो मी साधारण $३० च्या आसपास घेतला होता. आठवड्यातून ३-४ वेळा वापरत होते. कणिक भिजवणे , भाज्या चिरणे, दाण्याचे कूट करणे, लसणाची कोरडी चटणी फिरवणे, (आई आली की) पुरण फिरवणे अशा नाना प्रकारच्या कामांसाठी. वापरायला तो अत्यंत सोपा आणि कमी कटकटीचा आणि सुटसुटीत होता. एकच ८ कप आकाराचं भांडं, एकच झाकण, १ चॉपिंग ब्लेड(त्यानेच कणिक पण छान मळली जायची), आणि एकच स्लायसिंग/श्रेडिंग ब्लेड, सर्व गोष्टी डिश वॉशर मध्ये बिंधास्त टाकता यायच्या.
खरतर, तो फूड प्रोसेसर नीट चालू होता (म्हणजे बटण, मोटर वगैरे) फक्त त्याच्या ब्लेडला खाली असणारी प्लॅस्टिक ची चकती तुटली होती तर मी लगेच तो रिसायकल मध्ये टाकला. मी त्यांच्या वेबसाइट वरून नुस्तं ब्लेड मागवायला हवं होतं असो. आता अक्कल येवून काही फायदा नाही. घाईघाईने आधी काय ते उरकायचं आणि मग सवडीने पश्चात्ताप करायचा...
सध्या माझी फूड प्रोसेसर क्वेस्ट सुरू आहे.
आखुड शिंगी वगैरे वगैरे हवा आहे. वापरायला सोप्पा, कमी कटकटीचा
गेल्या ८ दिवसात २ वेगळे फु प्रो आणून एकदा वापरून परत केले आहेत.
त्यातला एक होता हॅमिल्टन चा नविन मॉडेल आणि दुसरा होता किचन एड चा ९ कपांचा मॉडेल. त्यांची कहाणी प्रतिसादात लिहिते.
.
.
.
शेवटी पहिल्या पानावर अगोने रेकमेंड केलेला हा फु प्रो मी घेतला आणि मी माझ्या खरेदीवर फार खुष आहे!
HBFoodPro500Wt.jpg

रोजची पोळ्याची कणिक ह्यातच मळते. डिशवॉशरला टॉप रॅकमध्ये धुवायला टाकते. नो कटकट फु प्रो आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा वरचा आहे तसाच, पण काचेचा जार नसलेला आणि तांदूळ बारीक होईल असा काही आहे का?
हा वरचा आहे तसाच ब्ल्याक एन डेकर चा होता, तो मी आणल्याच्या आठवड्यात पाडला आणि जार फुटला.

http://www.giftease.com/philips-food-processor-600w-hr7628?utm_source=go...

ह्यात सगळी कामं छान होतात. गेले वर्षभर मिक्सर नाहीये. त्याची उणीव भासत नाहीये. उगीचच मिक्सर नाही असं वाटू नाही म्हणून अध्ये-मध्ये ऑनलाईन मिक्सर डिल्स बघत बसते. ब्लेन्डिन्ग जार मधे डोसा - इडली पीठ, चटणी होतं. फूड प्रोसेसिंग जार मध्ये कणिक भिजवणे,दाणेकूट, सुक्या चटण्या, रताळी, गाजर इ. कीस, बटाटे वड्यांचा मसाला, गुजासाठे खवा तयार करणे. पुरण करणे इं कामं छन होतात. ताक करणे दोन्ही जार मध्ये होते. मोसंबी ज्यूस मोठ्या जार मध्ये होतो. चिप्स चकत्या पण करता येतात पण मी केलेल्या नाहीत. भाजी चिरायला मी फूड प्रो वापरत नाही.

अरे वा राजसी. खूप दिवसांपासून हा फुप्रो मनात भरला होता. पण चटणी अ‍ॅटॅचमेंट नाही म्हणून विकत घेतला नाही. ब्लेंडिग जारमध्ये थोड्या प्रमाणात वाटण होत नसेल ना पण? दाण्याच्या कूटाला कोणते ब्लेड वापरता?

बटाटेवड्याचे वाटण फूड्प्रो जारमध्येच केले होते, एखाद किलो बटाट्यांसाठी. जरा भरड वाटले गेले पण खाताना काही जाणवले नाही. वाटण अगदी कमी प्रमाणांत असेल तर गंध होत नाही. ब्लेंडिग जारचे ब्लेड खोल बेचक्यात आहे त्यामुळे किमान १२५ मिली च्या पातळीपर्यंत वाट्ण यायला हवं . दाण्याच्या कूटाला एस ब्लेड -स्टिल वापरते. थोडेच कूट करायला घेतले तर भरड होते. भाज्या घालून करायच्या पराठ्याच्या पिठासाठी उपयुक्त वाटते. भाज्यांचे मोठे तुकडे आधी फिरवून मग कणिक, मसाला इ. त्यसाठी पण एस ब्लेड - स्टिल. . मी ओली चटणी जरा सरसरीत करते. अगदी बेताचे पाणी घालून चटणी ( डावी बाजू स्पेशल) होते का नाही ते करून पाहिले नाही.

ओके. सध्या कामवालीत्रस्त आणि पाहुणे ग्रस्त मोडात असल्याने फुप्रो घ्यावाच अशी इच्छा बळावते आहे. Happy
हा फुप्रो घेऊन एक ड्राय्/वेट ग्राइंडर घ्यावा असेही मनात आले होते.

फुप्रोला चटणी अटँचमेंट नाही म्हणूनच तर वेगळा मिक्सर मस्ट झाला. फुप्रो फक्त भाज्या चिरायला, किसायला आणि कणीक मळायला. डावीकडची दोन्ही भांडी तशीच पडून आहेत.

वेट गाइंडर एखाद्या दक्षिण भारतीय शेजारणीकडे जाऊन बघून मग निर्णय घेतल्यास बरे. सगळ्यात छोटा उचल-ठेव करता येतो. चार जणांच्या कुटुंबाला दोन वेळेस पुरेल इतका इडली-डोसा एका घाण्यांत वाटला जातो. बघावे लागत नाही. बहुतेक अर्धा तास वेळ लागतो छान पीठ तयार व्हायला. मी बघून आलेली आहे. पण इतका इडली-डोसा खप नाही. त्यामुळे विचाराधिन.

http://images.philips.com/is/image/PhilipsConsumer/HR7629_90-IMS-en_IN?w...$pnglarge$

माझ्याकडे हा आहे. मी वर चुकीची लिंक दिली. आत्ता बघितले. चकत्या आणि कीस एकच जाळी आहे. मी सायीच्या विरजणाचे ताक करत नाही अथवा बेकिंग करत नाही म्हणून व्हिपिंग ब्लेड वापरात नाही. बाकी गोष्टींचा भरपूर वापर होतो. भाज्या चिरायला न वापरता सुद्धा.ब्लेंडिंग जार मिक्सरऐवजी वापरते.

अटॅचमेंट चांगली वाटते आहे... पण खवणी यंत्राचा उपयोग नाही होणार.. सगळं खोबरं बाहेर पडणार... कव्हर्ड भांडं पाहिजे तरच किस बरोबर भांड्यात पडेल..

आमच्या मिक्सर ला थोडी अशीच आहे. चांगली आहे. पण खोबरे चांगले ओलेच लागते. आणि मिक्सर अगदी स्लो फिरवावा लागतो. थोडा फास्टात झाल्यास नारळ निसटून कुठेतरी पडतो. ३-४ नारळ खवायचे आहेत, विळी वापरता येत नाही नीट आणि हाताने करायच्या कोकोनट स्क्रेपर ने हात भरुन येतात अशा सिनारियो मधे चांगले आहे.

Coconut scarping and juice extractor from fresh fruits etc for your daily kitchen use with unbreakable plastic container and German steel blades without giving extra load on the mixer motor
This attachment is used to reduce the speed of mixer by gear box (direct transmission drive ) which is latest technology and compare to earlier belt drive food processor which is very old and expensive to maintain

ते भांड बर्‍यापैकी रुंद आणि खोल दिसतंय. खोबरं पडेल त्याच्याच मुखी.

पण ते अ‍ॅटेचमेंट फक्त फिलिप्सच्याच काही मॉडेलच्याच डोक्यावर बसेल असं म्हटलंय.

माझा सिग्नोराचा आहे फु प्रो. ठाण्याला गोल्डनमधून घेतलाय. त्याला साधारण अशीच अटॅचमेंट आहे. खवणलंही जातं. पण शेवटी विळीवरच बरं वाटंतं. सवयीचा परिणाम.

फ़ुड प्रोसेसर मधे रिको आणि इनालसा हे दोन ब्रॅंड चांगले आहेत. नातेवाईक बहिणी, मैत्रिणी असा सगळ्यांचा एकत्रित अनुभव आहे.
त्यामधे रिको'ला नारळ खरवडायची चांगली सोय आहे. आणि इनालसा'च्या मोटरची क्वालिटी खुप चांगली आहे.

नारळ खरवडायला अंजली किंवा अजूनही काही कंपन्यांचे हाती फिरवायचे यंत्र येते. १५०-२०० रूपयात.
माझ्याकडे तेच आहे. मला तरी ते उत्तम वाटते. असो.

फू प्रो + मिक्सर - मोटर भुस्स्स झालेली आहे. पराठ्याचे पीठ भिजवताना पिठ ब्लेड आणि मधला दांडा यांच्यामधे शिरले आणि ब्लेड अडकायला लागले त्यात मोटर जळली.
आता मोटर बदलावी की थोडं थांबून पूर्ण यंत्रच बदलावं असा विचार चालू आहे.
केनस्टार-करिश्माचा आहे. मुळातच मोटरची कपॅसिटी जरा संशयास्पदच वाटत आलेली आहे.
दोन माणसांपुरते डोश्या-उत्तप्याचे वाटण करतानाही दुसर्‍या घाण्याला कुरकुर सुरू व्हायची आणि गंधासारखे वाटण व्हायचे नाहीच.

मोटर बदलू की यंत्र बदलू.. सल्ला द्या प्लीज.

अमेरिकेत फुप्रो कोणता घेता येईल ज्यात गाजर-रताळी किसली जातील? मी कणिक हातानेच भिजवते, त्यासाठी फुप्रो हवा असं नाहीये. बाकी कशासाठी फुप्रोला मिस करत नाही पण सारखा सारखा रताळ्याचा कीस किंवा मोठ्या प्रमाणात गाजर हलवा करायचा तर प्रॉब्लेम होतो.
एक जुना मॅजिक बुलेट सध्या वापरत आहे. फुप्रो वापरला तरी मॅजिक बुलेट लागेलच ना?

अगदी लिमीटेड गरजा असतील (गाजर किसणे) तर छोट्या कपॅसिटीचा आटोपशीर फूड प्रॉसेसर घ्यायचा सल्ला देईन मी.

मी फारच कौतुकाने १२ कप किंवा तत्सम साइझ चा घेतला आहे. (त्याला एक छोटा बोलही आहे पण तो नक्की कसा फिट करायचा ह्याचे झटपट इन्स्ट्रक्शन्स वाचून डोक्यात उजेड पडला नाही म्हणून अजून ही वापरलेला नाही.)

आणि मोठा वापरायचा तर डिशवॉशरचा वरचा पाऊण रॅक त्यानेच भरतो. जवळ जवळ असून अडचण प्रकार माझ्याकरता तरी.

गाजर आणि रताळी मी किसणीवरच किसते. तो फुप्रो काढा आणि चार जास्तीची भांडी डिशवॉशरला लावा ही नसती कटकट होते. माझा फुप्रो मोठ्या प्रमाणावर दुधी किसणे ह्या पलिकडे वापरला जात नाही.

धन्स सशल. लहानच घेणार आहे. टू मेनी ऑप्शन्स असं दिसतंय.
सायो, मला मोठया प्रमाणात रताळ्याचा कीस आणि गाजर हलवा करता येत नाही कारण खूप वेळ जातो किसणी वापरण्यात, म्हणून फुप्रो हवाय.

हा आहे का कोणाकडे?

https://www.amazon.com/BLACK-DECKER-FP1600B-8-Cup-Processor/dp/B0038KPRG6

Yes Sanav, I have it. Got it from walmart. Use a lot for kneading dough..it is good for shredding and slicing also. Sorry for english typing..

माझ्याकडे साधारण असला आहे
https://www.amazon.com/Cuisinart-DFP-14BCNY-Processor-Brushed-Stainless/...

काउंटरवर मांडून ठेवलेला आवडत नाही आणि कॅबिनेट मधे ठेवला तर काढा/ घालायला त्रास या कारणाने अगदी कमी वापर होतो. पण ५-१० पाउंड गाजरांचा कीस करायला एकदम मस्त आहे .
लहान मॉडेल घेतलेले चांगले. घेताना एकदा दोनदा खाली वर ठेऊन पहा किती वजन आहे ते Happy

रोजच्या चॉपिंग साठी, दाण्याचे कूट , पालक किंवा टॉमेटो प्युरे, चक्का - साखर एकत्र करणे, वाटली डाळ या साठी असले मशिन एकदम बेस्ट . हायेस्ट वॉटेज बघून घ्या
https://www.amazon.com/KitchenAid-KHB2561CU-5-Speed-Hand-Blender/dp/B005...

जायन्ट फुप्रो इबेवर विकून असं काही घ्या बरं Happy

https://www.amazon.com/Cuisinart-BFP-703CHFR-SmartPower-Certified-Refurb...

ब्लेन्डर आणि फुप्रो दोन्हीसाठी एकच कॉम्पॅक्ट बेस आहे. ब्लेन्डरमध्ये इडली-दोशाची पिठं, प्युर्‍या, मिल्क्शेक, ओली वाटणं-चटण्या होतात. फुप्रो मध्ये चकत्या आणि श्रेडिंगसाठी एक ब्लेड आणि एक एस आकाराचं ब्लेड एवढे(च) पर्याय आहेत जे पुरेसे होतात मला तरी. कॉम्पॅक्ट असल्यामुळे कपाटात ने-आण करायला पण सोपा आहे.

माझ्याकडे एक सॅलड शुटर आहे जवळ जवळ २० वर्षांपूर्वी, $२० ला घेतलेला. त्यात गाजर, बटाटा वगैरेचा किस आणि काप पटकन होतात. साठवणीचा बटाटा किस आणि मोठ्या प्रमाणात गाजर/दुधी हलवा, पॉटलक साठीचे बटाटावाले कॅसेरोल्स, सॅलड , आलेले चीजचे ठोकळे किसणे वगैरे साठी वर्षातुन ४-५ वेळा वापर होतो. डिश वॉशरमधे टाकता येतो.

प्रीती झोडियाकबद्दल कोणाला कल्पना आहे का? मी टिव्हीवर जाहीरात पाहीली.. ५ वर्ष मोटर गारन्टी आहे. क्रुपया सान्गा कोणता घ्यावा (बजाज) ?? कणिक मळणे, कान्दा चिरणे, सर्व भाज्या ज्या त्या पद्ध्तीने कापल्या जाव्यात, स्लाइस, खिसणे इ. अपेक्षा. तरी क्रुपया मदत करा. बजेट ५०००-७०००/-

philips चा food processor मी वापरते. सहज आणि सोप्पं
पण भांड्यांचा खूप पसारा वाटतो
पीठ मळणे टाळते. पुन्हा ते साफ करणे वैताग
साधारण ३ years पूर्वी घेतला तेव्हा ७००० price होती.
पण मस्त आहे
https://www.snapdeal.com/product/philips-food-processor-hl1659/130553?su...

Pages