आमची माती ..... आमची कलाकॄती

Submitted by विनार्च on 12 December, 2015 - 14:28

"हाती आलेल्या मातीचा पुरेपूर वापर करणे" हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आम्ही सहामाही परीक्षा...दिवाळी ..शाळा असल्या मोहमायेत न गुंतता बजावला याचाच पुरावा सादर करत आहोत Wink

बुद्ध ....
IMG_20151031_194012.jpg

आमचा ऑल टाइम फेव्हरेट .. डायनो
IMG_20151105_190756.jpg

टिकी हेड पेनस्डॅन्ड
IMG_20151212_174152-001.jpg

याच्या नशिबी रंग होते Wink
IMG_20151212_174248.jpg

हे गुग्गूम पेनस्डॅन्ड..... बंगालीमध्ये घुबडाला गुग्गूम म्हणतात असं कुठेसं वाचल होत , तेंव्हा पासून आम्ही गुग्गूमच म्हणतो Proud
IMG_20151111_164452.jpg

दिवाळीत गिफ्ट मिळालेल्या जिरो निमो च्या पुस्तकांचा राखणदार ...
IMG_20151111_164303.jpg

हा दिवसभर वापरलेली ज्वेलरी सांभाळणारा "डकी"
IMG_20151111_164410.jpg

हा आईसाठी केलेला ज्वेलरीबॉक्स ..
IMG_20151212_173903.jpgIMG_20151212_173802.jpg

आईला पक्के ओळखत असल्याने केलेली अरेंजमेंट..... अब वो कौन पूरा ढ्क्कन उठाये Wink
IMG_20151212_173710.jpg

खजिन्याचा संदूक
IMG_20151212_173349.jpgIMG_20151212_173503.jpg

आत सुवर्णमुद्राही आहेत हो..... मनात पाप असेल तर त्यांची माती होते Wink
IMG_20151212_173605.jpg

हे बाबाच बर्थडे गिफ्ट ...त्याचे छोटे छोटे इलेक्ट्रॉनीक कंपोनन्ट ठेवायला ..
IMG_20151212_174005.jpg

भातुकली खेळायला कधी मजा नाही आली पण बनवायला खूप मज्जा आली Happy
IMG_20151121_231811.jpgIMG_20151121_232005.jpg

दिवाळीच्या सुट्टीत, ह्या सगळ्यांच एक छोटूस प्रदर्शन भरवल होत ..माझ्या फेंड्ससाठी Happy
IMG_20151121_232230.jpg

त्या बुक्ससाठी स्टँडही आम्हीच बनवून रंगवलाय...तो बाहेर डोकावणारा ड्रॅगन आमचा बुकमार्क आहे..किती पुस्तक वाचून झाली ते दाखवतो तो . Happy
IMG_20151212_174028.jpg

तुम्हीही नक्की सांगा हा ...कश्या वाटल्या माझ्या कलाकॄती Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अग कराव तेवढ कौतुक कमी आहे तुझ्या लेकीच. कित्ती सुंदर कलाकृती आणि मनापासून केल्या आहेत.

तो राखणदार मस्त ऐटीत आहे.

भातुकली तर मला जुन्या दिवसांत घेऊन गेली. अशी भातुकलीची मातीची खेळणी मी पण करायचे. सगळीच भातूकली छान आहे.

बाकी सगळेही किती उपयोगी वस्तू बनविल्या आहेत.

खुप छान तुझ्या प्रोत्साहनाने अशीच तिची कला बहरूदे.

सुंदर केल्यात ग सगळ्या वस्तू. राखणदार सिंह एकदम ऐटबाज झाला आहे. अनन्या अतिशय प्रतिभावान आहे. कला अशीच बहरू दे अन माबोवर आम्हाला दाखवित जा. Happy

सर्व वस्तू अतिशय सुंदर बनवल्यात ...

अनन्या अतिशय प्रतिभावान आहे. >>>+११११११

खुप छान तुझ्या प्रोत्साहनाने अशीच तिची कला बहरूदे. >>>>+१११११

किती सुरेख बनवलंय सगळं!
अप्रतिम. भातुकली चा सेट खुप आवडला. मी पण बनवायचे Happy
राखणदार तर क्युट आहेत एकदम !

बाकी सगळं मस्त आहेच पण 'दिवाळीत गिफ्ट म्हणून मिळालेली पुस्तके' ही देखील या कलाकृतींइतकंच आवडलं Happy

छानच!

कौतुकाबद्दल खूप खूप धन्यवाद....___/\___ Happy

नीधप ,कोस्टर वीथ स्टॅन्ड ही आयडीया आवडली ...लवकरच यावर काम करण्यात येईल Happy

री ह्या दिवाळीत आम्हाला फटाके ..कपडे..खाऊ काहीही नको होत फक्त नी फक्त पुस्तक हवी होती... आता सान्ताची टर्न आहे Wink

बूक स्टॅन्डचे फोटो २ -४ दिवसात टाकते.

Pages