टवाळा आवडे विनोद

Submitted by निनाद on 7 December, 2015 - 07:08

सध्या काही यांच्यावर फार हे यांच्यावर येत आहेत.
यामुळे मी अगदी हा झालो आहे.

ते आपले
टवाळ प्रतिसाद काही धाग्यांवर येत आहेत.
त्यामुळे मी अगदी हसबुद्ध झालो आहे.

असे करू नका हो! यामुळे नवोदित
लेखकांचा बोरूमोड... आपला हिरेमोड होतो आहे.
त्यांना हे ते प्रश्न विचारणे अवघड होत आहे.
तसेच विविध प्रकारचे हे आणि ते काढायला भीती वाटते आहे.
बार आणि धागे काढायला भीती वाटते आहे हो.

का तुम्ही असे दुष्टपणे वागता?
ते आपलं हे दाखवा, जरा म्याचुरिटी दाखवा कि हो!

हसता काय... चित्र काय काढता...?
काय तुम्हाला आजकाल काही हे नाहीच हो.
ते आपला सुविचार नाही हो!

समाज समाज म्हणतात तो बदलणार कसा अशाने?
तेव्हा आज पासून हा घ्या,
आपला वसा घ्या.

आपल्या त्या ह्या आणि काढा यांच्या वर ते.

घ्या आपल्या पेंशिली आणि काढा कागदावर चित्र
आणि टाका इथे!

(टीपः माझी सर्व चित्र प्रताधिकार मुक्त आहेत. तुम्ही ती कोणत्याही धाग्यात अथवा इतरत्रही वापरू शकता. वापर केल्यास माझे नाव /नोंद मात्र द्या.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कॅप्शन द्यायची काही गरज आहे का ?>>>> हो. कारण मला नाही कळले. Happy

बी, तुम्ही स्वतः वेळ काढुन, तुम्हीच वर सुचवलेली चित्रं काढावीत. कारण स्वतःच्या डोक्यातुन आलेल्या कल्पनेला तुम्ही स्वतःच न्याय देउ शकाल. नाही का> Happy

आणखी एक चित्र आउटसोर्स करतो आहे:

एक वर्तुळ आहे. त्यात मधे अगदी भाषाप्रेमी दाखवायचे.

सगळ्या भाषाप्रेमींचे हात उंच करुन सांगत आहेत .. नाही नाही हा शब्द चुकीचा आहे. हे क्रियापद चुकीचे आहे. हे वाक्य चुकीचे आहे.

आणि वर्तुळाभोवती अनेक मराठी भाषेतून एकच वाक्य अनेक प्रकारे बोलल्या जात आहे. गालगुच्चे धरतात, ओढतात, घेतात सर्वकाही बोलीभाषेला चालत.

सर्वकाही बोलीभाषेला चालत.
>> पण ही बोलीभाषेची वेबसाईट आहे की लिखित मराठी भाषेची? जेव्हा मराठी असे म्हणतो तेव्हा लिहिताना प्रमाण भाषाच अपेक्षीत असते. बोलताना मग तुम्ही वापरा बोली भाषा.

सर्वकाही बोलीभाषेला चालत.
>> पण ही बोलीभाषेची वेबसाईट आहे की लिखित मराठी भाषेची? जेव्हा मराठी असे म्हणतो तेव्हा लिहिताना प्रमाण भाषाच अपेक्षीत असते. बोलताना मग तुम्ही वापरा बोली भाषा.

>> इथे प्रत्येक्षात येऊन बोलता येत नाही म्हणून आपण लिहितो. बरोबर? मग जसे बोलतो तसे लिहू शकतो. शिवाय साहित्य हे काही फक्त प्रमाण मराठीतच असत अस नाही.

मग जसे बोलतो तसे लिहू शकतो >> पण अशा साईटवर जिथे महाराष्ट्रातील इतर सांस्कॄतीक भागातुन लोक येतात आणि त्यांनी या आधी कधीही न एकलेले वाचले आणि त्यांना जर ते विनोदी / वेगळे वाटले तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुमचे बोलीभाषेत लिहिणे चालवुन घ्यायचे तर तुम्हीपण हे चालवुन घ्या ना?

शिवाय साहित्य हे काही फक्त प्रमाण मराठीतच असत अस नाही.
>> आपण जेव्हा पैसे देऊन पुस्तक विकत घेतो किंवा / विशिष्ट बोलीभाषेत असलेला ओनलाईन लेख स्वत:च्या ईच्छेने वाचतो तेव्हा त्यातील भाषा आणि संदर्भ हे त्या विशिष्ट गावा / ठिकाणामधील असतील हे वाचकाने मान्य केलेले असते.
ईथे प्रमाण भाषेची अपेक्षा असतना हे मान्य केलेले नसते.

मला व्याकरण विषयावरुन वाद घालायचा नाही.
पण आत्ताच आमच्या गावाच्या धाग्यावर "जुना", "रहातो" वगैरे वाचले आणि इथेही तेच त्यामुळे मग लिहावेसे वाटले.

कधी कधी विनोद अश्या बोलीभाषेतून फुलतात. आता ते विनोद करताना प्रमाण मराठी वापरली तर कसे चालेल ?

बी, ची बोली भाषेची आयड्या झकास आहे.
बोली भाषेतला गोडवा आणि आपलेपणा प्रमाण मराठीत कुठे येणार.

मग जसे बोलतो तसे लिहू शकतो >> पण अशा साईटवर जिथे महाराष्ट्रातील इतर सांस्कॄतीक भागातुन लोक येतात आणि त्यांनी या आधी कधीही न एकलेले वाचले आणि त्यांना जर ते विनोदी / वेगळे वाटले तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुमचे बोलीभाषेत लिहिणे चालवुन घ्यायचे तर तुम्हीपण हे चालवुन घ्या ना?

>> मला प्रॉब्लेम नाही म्हणूनच मी कधी कुणाची भाषा चुक वा बरोबर असे लिहिले नाही. आणि आमच्या बोलीभाषेत आम्ही तोंड चालवतो लिहिणे चालवत नाही.

ओये मराठीच्या शिकवण्या नको इथे. चित्र काढा.
ह्या वर ही चित्र होईल की. मराठीची शिकवणी घेणार्‍या बाई किंवा बाप्ये. Happy

मला प्रॉब्लेम नाही म्हणूनच मी कधी कुणाची भाषा चुक वा बरोबर असे लिहिले नाही. आणि आमच्या बोलीभाषेत आम्ही तोंड चालवतो लिहिणे चालवत नाही.>>> तरीही दुसर्‍याचा आहार, भाषा, कपडे, बोली, वस्तू कशा चुकीच्या आहेत यावर आम्ही बीबी काढतो कारण आमच्या प्रादेशिक अस्मिता!!

निनादभौ, व्यंगचित्रे मस्त. अजून येऊन द्यात.

धन्यवाद लोकहो!

निनाद, मी 'त्यांना' सोडले नाहीये.
कंप्युटरच्या स्क्रीनवर काय लिहिलंय वाचलंत का?
Happy

तरीही दुसर्‍याचा आहार, भाषा, कपडे, बोली, वस्तू कशा चुकीच्या आहेत यावर आम्ही बीबी काढतो कारण आमच्या प्रादेशिक अस्मिता!!>> असे धागे स्वप्नात दिसले का तुला नंदिनी? बरी आहेस ना?

एक चित्र नंदिनीवर काढायला आहे. एक स्त्रि वाट्टेल ते बकणारी.

अहो बी, शांत व्हा!
तुम्ही जितके चिडाल तितके लोक तुम्हाला चिडवतील.
त्यापेक्षा २-३ दिवस या धाग्यावर येऊ नका.
तुम्हाला विसरून जातील लोक.
या धाग्याचे मुख्य नायक कुणी वेगळेच आहेत.
तुम्ही कशाला फोकस स्वतःवर ओढवून घेताय?

ओ बी, तुम्हाला चित्र काढायचे तर काढा आणि इथे पोस्ट करा.
उगाच वादविवाद कशाला? तुम्हाला तुमच्यावर चित्र काढलेली आवडत नसतील तर तसं सांगा.

Pages