टवाळा आवडे विनोद

Submitted by निनाद on 7 December, 2015 - 07:08

सध्या काही यांच्यावर फार हे यांच्यावर येत आहेत.
यामुळे मी अगदी हा झालो आहे.

ते आपले
टवाळ प्रतिसाद काही धाग्यांवर येत आहेत.
त्यामुळे मी अगदी हसबुद्ध झालो आहे.

असे करू नका हो! यामुळे नवोदित
लेखकांचा बोरूमोड... आपला हिरेमोड होतो आहे.
त्यांना हे ते प्रश्न विचारणे अवघड होत आहे.
तसेच विविध प्रकारचे हे आणि ते काढायला भीती वाटते आहे.
बार आणि धागे काढायला भीती वाटते आहे हो.

का तुम्ही असे दुष्टपणे वागता?
ते आपलं हे दाखवा, जरा म्याचुरिटी दाखवा कि हो!

हसता काय... चित्र काय काढता...?
काय तुम्हाला आजकाल काही हे नाहीच हो.
ते आपला सुविचार नाही हो!

समाज समाज म्हणतात तो बदलणार कसा अशाने?
तेव्हा आज पासून हा घ्या,
आपला वसा घ्या.

आपल्या त्या ह्या आणि काढा यांच्या वर ते.

घ्या आपल्या पेंशिली आणि काढा कागदावर चित्र
आणि टाका इथे!

(टीपः माझी सर्व चित्र प्रताधिकार मुक्त आहेत. तुम्ही ती कोणत्याही धाग्यात अथवा इतरत्रही वापरू शकता. वापर केल्यास माझे नाव /नोंद मात्र द्या.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असेही एक चित्र येऊ द्या, त्रस्त वाचक माझ्या घरासमोर धरणे धरत आहेत, आणी मी बोलतोय... जाओ पहले उस आदमी की साईन लेके आओ फिदीफिदी >>> ऋन्मेष, हीच क्वालिटी आवडते तुझी मला.

असेही एक चित्र येऊ द्या, त्रस्त वाचक माझ्या घरासमोर धरणे धरत आहेत, आणी मी बोलतोय... जाओ पहले उस आदमी की साईन लेके आओ
>>

ऋन्मेऽऽशा,

कही वो पहला आदमी तुम तो नही?

ऋनम्या खरा टवाळ आहे.
टव्वाळ्ळा. (हे लब्बाड्डा सारखं वाच)

सकारात्मक कमेंट्स करणा-या सदस्यांसाठी निवेदन:

गेल्या काही दिवसांपासून माझ्या जवळजवळ प्रत्येक पोस्टवर मायबोलीच्या काही सदस्यांनी निव्वळ टवाळखोरी चालू केलेली आहे. एखाद्याने विषयाला सोडून कमेंट करणे व इतरांनी मग त्यावर पुढे तशाच कमेंट करणे असा प्रकार चालू आहे. येथे एखाद्याला ब्लॉक करणे अथवा विषयाला धरून नसलेल्या कमेंट्स काढून टाकण्याची सोय नसल्याचा गैरफायदा काही सदस्य घेत आहेत. काही जण मी लिहूच नये किंवा दुसरीकडे कोठे तरी लिहावे असा आग्रह अजुनही धरत आहेत. यातला विकृत आनंद व त्यातून मिळणारे समाधान त्यांना जरूर मिळू देत. काही सदस्य मात्र विषयाला धरून कमेंट करत असतात व मी काहीवेळा त्यांच्याशी त्यांच्या मतांबद्दल चर्चाही करतो. परंतु येथे टवाळखोरी इतकी वाढलेली आहे की मला अशा सकारात्मक कमेंट शोधणेच अवघड होऊन बसते आहे.

तेव्हा सकारात्मक कमेंट्स करू इच्छिणा-या सदस्यांना माझी विनंती आहे, की ऍडमिनने अशा टवाळखोरीच्या विकृतीचा बंदोबस्त करेपर्यंत माझ्या कोणत्याही पोस्टवर काही कमेंट करू नये. आपण माझ्या पोस्ट वाचण्यासाठी वेळ दिलात एवढेच माझ्यासाठी पुरेसे आहे व त्यासाठी मी आपला आभारी आहे. कमीत कमी मी तरी कोणत्याही कमेंटची नोंद घेऊ शकणार नाही.

मायबोली हे इतर काही संस्थळांप्रमाणे टवाळखोरांचा अड्डा नाही अशी माझी समजूत असल्यामुळे मी येथे लिहित राहिलो आहे. मी कोणाच्याही पोस्टवर जाऊन घाण करत नाही, इतरांकडूनही माझी तेवढीच माफक अपेक्षा आहे. परंतु गेल्या काही दिवसांच्या अनुभवावरून वस्तुस्थिती वेगळी असल्याचे लक्षात आले आहे. या बाबतीत मी व्यक्तीश: फार काही करू शकत नसल्यामुळे हे निवेदन करत आहे.

वास्तविक या टवाळखोरांपैकी एकहीजण माझ्या पोस्टकडे फिरकला नाही तरी मला काडीचाही फरक पडत नाही. परंतु येथे त्यांच्यावर कोणतेही निर्बंध नसल्यामुळे त्यांना त्यांचे उपद्रवमूल्य दाखवून द्यायचे आहे. या प्रकारातून मायबोलीची प्रतिष्ठा वाढणार असेल तर त्यांनी तसे जरूर करत रहावे. माझी हरकत नाही. तेव्हा टवाळखोरांनो, वर म्हटल्याप्रमाणे तुमची विकृती येथे जरूर दाखवा. तुम्हाला कसलेही भय नाही. तुम्हाला कसलीही लाजलज्जा असेल याची मला अपेक्षाही नाही. तेव्हा तुमचे चालू द्या. उलट हे निवेदन पाहिल्यावर तुम्ही आणखीच चेकाळाल याची मला खात्री आहे.

यापुढे येथील माझ्या प्रत्येक पोस्टमध्ये मी हे निवेदन टाकत जाणार आहे.

धन्यवाद.

मस्त धागा आणि व्यंगचित्रे.

माबो वर बर्याच दिवसांनी जरा हलके फुलके, नर्म विनोदी काहीतरी आले.

I personally miss HH. कुजबुज अंक. कसले मस्त लिहायच्या.

अवांतर-
येथे एखाद्याला ब्लॉक करणे अथवा विषयाला धरून नसलेल्या कमेंट्स काढून टाकण्याची सोय नसल्याचा गैरफायदा काही सदस्य घेत आहेत. >>>>>>>
अशी सोय प्रशासकांनी केल्यास, एखाद्या आयडी चे लेख आम्हाला आमच्या नवीन लेखन मधे दिसु नये अशी पण सोय असावी.

असेही एक चित्र येऊ द्या, त्रस्त वाचक माझ्या घरासमोर धरणे धरत आहेत, आणी मी बोलतोय... जाओ पहले उस आदमी की साईन लेके आओ फिदीफिदी >>> ऋन्मेष, हीच क्वालिटी आवडते तुझी मला. + १००

पण ॠनम्या ह्यातला 'उस आदमी'च तू आहेस त्यामुळे तुझं घर नाही चालणार धरणं धरायला

बाप्रे! १ दिवस यायला जमले नाही तर थेट शंभरी गाठली Biggrin

धागा एक होणे Proud
कापोचे, तुमचं अक्षर सुंदर आहे. आणि चित्रातले हावभावपण मस्त.
तुम्ही अजून चित्रे काढली पाहिजेत.

होय Nidhii सई चा ठसा हवा होता खरा... पण पुढील चित्रांना पण काही विषय हवेत ना..:डोमा:

जयंत १ कुऋ चे डोके भारी आहे. पुढचे फोनवर बोलणेही मस्त आहे.

अग्निपंख पो - इतका हसलो! Biggrin

टवाळखोरांनो लगे रहो हम तुम्हारे साथ हे..
गर्व से कहो हम टवाळ है!

एका शेअरचे १०० रुपये लागतील Biggrin

हां, हम टवाळ है! Proud

साती मायबोली मंथन भारी. लोक विचार करतात आणि डाकू धागे लुटतात असेच ना? Proud
तुमची पण चित्रकला छान आहे. अजून चित्रे यायला हवीत.

टवाळक्या करने हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. Proud
अग्निपंख सर्क्यास्टिक आणि एन्जोय धागा हे दोन्ही दाढीच्या हातावर अगदी सिद्ध झाले आहे Proud

जबरी आहे सगळे... और भी आने दो!

खरं का सायो? Uhoh

पण माझी चित्रे आक्षेपार्ह असतील तर तसे कळवावे आणि मी तंबी मागितली आहे ना उडवण्याआधी?
(यावेळी तंबीच मागितली आहे हे चाणाक्ष वाचकांनी ध्यानात घेतले असेलच! Wink )

असेही, माझे विनोद अगदीच निरुपद्रवी आहेत असे वाटते. त्यातले दोन तर माझ्यावरच आहेत.

हो आणि त्या निमित्ताने इंग्रजीचा सराव पण होईल माझा... Happy
ते काय संकटाच्या ढगाला चंदेरी किनार की काय म्हणतात ते तसे. Proud

मला वाटते की व्यंगचित्र येतात तेव्हा त्या लेखकाला एक प्रकारे लोकप्रियतेची पावती दिली गेलेली असते.
मतांतरे असली तरी त्या मतांची पोच घेतली जाते आहे हे त्याचे द्योतक असते.
हे डाकूंच्या चित्रांना ज्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला त्यात दिसून येते. अर्थात ही प्रसिद्धीची लाट (आणि लाथ!) एंजॉयही करता यायला हावी. आणि ते ऋन्मेषने खरोखर छान केले. त्याच्या खिलाडूपणा बद्दल मी त्याला दाद देतो.
बी राव रागावू नका. एका व्यंगचित्राला त्या क्षणा नंतर काही किंमत नसते. तुमच्यावर मी चित्र काढणारही नव्हतो. पण तुम्ही आपणहून 'आ बैल मार मुझे; केलेत. Happy आता प्लिज दोन घटका तुम्ही हसून घ्या!

राहता राहिले तर दुखावलेले, अहो दुखावू नका!
हजारो आयडी येथे असताना तुमच्यावर लोक चित्र काढत असतील तर तुम्ही आनंदी व्हायला हवे.
तेव्हा पाहणार्‍यांनो आनंदाने पाहा.

आणि कागद कुंचला वाल्या टवाळ्खोरांनो...
सोडू नका यांना Biggrin

Pages