"नाव विदेशी-चव देशी"- पाककला स्पर्धा नियम

Submitted by संयोजक on 14 August, 2009 - 16:26

मेरा जूता है जपानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रुसी, फिर भी दिल है हिंदुस्थानी |

हे दिल जसं हिंदुस्थानी आहे तशी आपल्या जीभेची चवही अस्सल हिंदुस्थानी नाही का ? पिझ्झा हट मधल्या तंदूरी पिझ्झ्यावर उगीच का उड्या पडतात?

ह्या अस्सल हिंदुस्थानी जीभेचे चोचले पुरवण्यासाठी तुम्हीही कधी घरातल्या घरात फ्युजन पाककृती निर्माण केल्या असतील. आपल्या मराठी पदार्थांखेरीज कध्धी काहीही न खाणार्‍या सासुबाईंकडून पसंतीची पावती मिळवली असेल.

पण फक्त चाटून पुसून स्वच्छ झालेल्या ताटाकडे बघून समाधान मानू नका तर आपल्या पाककृती मायबोलीच्या गणेशोत्सव पाककृती स्पर्धेत सादर करुन सर्वांचीच दाद मिळवा!!

"नाव विदेशी-चव देशी" - पाककला स्पर्धा

********************************************************

स्पर्धेचे नियम :

१. पाककृतीत वापरल्या जाणार्‍या साहित्यामधे महत्वाचा घटक हा विदेशी आणि बाकी भारतीय घटक असावेत. मुख्यतः भारतीय मसाले किंवा भारतीय भाज्या, डाळी, फळं (घटक) वापरून मूळ पाककृतीत केलेला बदल लिहिणे अपेक्षित आहे.

२. पाककृती मुद्देसूद व व्यवस्थित लिहीलेली असावी.

३. शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या पाककृती चालतील.

४. पाककृती सोबत छायाचित्र देणे बंधनकारक नाही पण असल्यास उत्तम. परिक्षकांनी दिलेल्या गुणांची बरोबरी झाल्यास छायाचित्र असलेल्या प्रवेशिकेला प्राधान्य देण्यात येइल.

५. पाककृती साधारणपणे २ ते ६ लोकांच्या वाढणीची असावी.

६. पाककृतीसाठी लागणारे जिन्नस भारतात आणि भारताबाहेर सहज उपलब्ध असावेत.

७. या स्पर्धेसाठी वेळमर्यादा नाही. पण तरीही ती वेळखाऊ नसावी. तयारीचा वेळ व पाककृती बनवताना लागणारा वेळ ह्या दोन्ही गोष्टी नमूद केलेल्या असाव्यात.

८. पाककृतीसाठी मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन वापरले तरी हरकत नाही. या उपकरणांना काही पर्याय असेल तर तो पाककृती मध्ये नमूद केलेला असावा.

९. पाककृती पारंपारिक (उदा. इटालियन पिझ्झा) असली तरी त्यात केलेले बदल, स्वतः केलेले असावेत. ते तसे पाककृतीत नमूद करावेत.

१०. प्रादेशिक अथवा स्थानिक घटक पदार्थांसाठी पर्यायी घटक पदार्थ देणे स्वागतार्ह आहे परंतु बंधनकारक नाही.

११. फुड नेटवर्क वरुन किंवा संजीव कपूर किंवा इतर कोणाची पाककृती जशीच्या तशी उचलून स्पर्धेत टाकलेली नसावी. पाककृतीच्या माहितीचा स्त्रोत लिहिणे बंधनकारक आहे.

१२. पाककृती ह्याआधी मायबोलीवर प्रसिद्ध झालेली नसावी. स्पर्धेच्या विषयाला धरुन मायबोलीवर प्रसिद्ध झालेल्या एखाद्या कृतीत बदल केले असल्यास चालेल.

१३. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

प्रवेशिका पाठवण्यासाठी आपल्याला या ग्रूपचे सभासद व्हावे लागेल आणि 'नविन पाककृती' वर टिचकी मारून आपली पाककृती लिहावी लागेल.

********************************************************
आलेल्या प्रवेशिका

लझाना http://www.maayboli.com/node/10295

मराठी पिझ्झा http://www.maayboli.com/node/10471

वरणातला पास्ता http://www.maayboli.com/node/10484

स्पॅगटी इन रेड सॉस - http://www.maayboli.com/node/10509

ओरिगामी सुशी विथ मिंट डिपींग सॉस - http://www.maayboli.com/node/10559

लेंटील पाय - http://www.maayboli.com/node/10581

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार मिती
तुम्ही मायबोली गणेशोत्सव २००९ या ग्रूपमध्ये सदस्यत्व घेवुन "सामील" झालात की आपोआप दिसतील सगळ्या प्रवेशिका.

तू इतर ठिकाणी फोटो टाकताना या चौकटीत जी लिन्क येते ना, ती कॉपी कर. म्हणजे पाककृतीचा फोटो दुसरीकडे कुठेतरी 'इमेज' लिन्क दिसते तिथे टाकायला जा, आणि ती लिन्क आली की ती पाककृतीत पेस्ट कर.

मी इथे टाकली आहे बघ तशी.
http://www.maayboli.com/node/6291

ओ के... म्हणजे तिकडुन उचलुन इकडे डकवायची... डायरेक्ट इथे डकवता येत नाही तर....

बघते प्रयत्न करुन...

लग्गेच उत्तर दिलस.. धन्स लालु... Happy
आणि भाग्यश्री तुला पण ठांकु गं... Happy

ओह.. मला माहित नव्हते हे Sad मी पण पाकृमध्ये फोटो टाकता येत नाही म्हणून लेखनाच्या धाग्यामध्ये लिहीले.