"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ९

Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 07:08

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
"खाद्ययात्रा"

झब्बू म्हणून कुठल्याही खाद्यपदार्थाचे छायाचित्र अपेक्षित आहे. कोलाज अपेक्षित नाही.

jhabbu_khadyapadarth.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॅम, मला चांदणी हवी!! :p

Picture 138.jpg

पुरणपोळी, घरच्या आळूची वडी, कटाची आमटी, वरणभात!

आईगं! काय एकसे एक फोटो आहेत.

वेगवेगळ्या आकारांच्या चकल्या मस्तच!

शेवभाजी, आप्पे, दहीवडे आणि पास्ता बघून पुन्हा भूक लागली. Sad प्रचंड टेम्प्टींग फोटो आहेत!

चाट पार्टी : सध्या पाणीपुर्‍या खा. भेळ, दही कचोरी वगैरे नंतर.

chaatparty-MB.JPG

आईऽऽऽ गं!!!
आज काही खरं नाही!!
चकल्या कसल्या भारी केल्या आहेत... मला फूल हवंय. Happy

>>मृ, सर्व्हिंग बोल्सचे आकार मस्त आहेत! तुझे आहेत का?
धन्यावाद! हो. माझेच आहेत. Happy

मला कुठल्याही आकारातली चकली चालेल. पण मोठ्ठ्या गोल चकलीवर माझा नंबर! Proud

आई शप्पथ काय जबरी फोटो आहेत एकेकाचे. पाणी सुटले तोंडाला. पीके, सॅम यांचे फोटो तर खतरा

bangdo1.jpg

हे घ्या ओरपून खा. चपातीची वाट पहायची गरज नाही. कालच बनवलेले मस्त बांगडो तळलेला, वांग कोलंबी तोंडाला,गरम भात व सार. Happy

shrikhand.JPG

वजन कमी करायचे मनावर घ्या, बाप्पा सारखे पोट करु नका. आता दिवाळी येइपर्यन्त ह्याच्यावर भागवा. Happy
phalohar.jpg

वॉव! ही सगळी फळं, आणि 'फ्रूट डिप' म्हणून ते पिस्ते लावलेलं श्रीखंड!! कशी आहे आयडीया? :p

kombdi-vade.jpg

kombadi-vade Happy

chicken.jpg

पोट नाहीच कमी करायचे आहे मनात तर बाप्पा बरोबर करा स्पर्धा, घ्या केळीच्या पानावर गरमागरम उकडलेले मोदक. पाहीजे तितके खा. शुद्ध तूप टाकलेय हो. Happy

modak 002.jpg

ही शुद्ध तूप काय भानगड आहे? अशुद्ध तूप पण असतं का?

हा माझा नारळी भात...

DSC00470.JPG

शुद्ध तूप घालून खायचा बरंका! Wink
हलकेच घे गं मनू :p

शुद्ध तूप नाही माहिती? कमाल आहे तुझी. Wink
अग तुझा तो पुपो,अळूवडी नी कटाची आमटी असा तिहेरी बेत बरेच दिवस जमून नाही आलाय इथे घरी. बघून हातात घेवून खावासा वाटतो.

खुशाल घ्या माझी चकली.. एक एकच घ्या आणि त्याबदल्यात तुमची डिश द्या... म्हणजे माझी चंगळ!
पुरणपोळी.. मोदक.. फळं आणि पाणिपुरी... आहाहा!!!

khadadi.jpg

IMG0061A.jpg
खाऊन खाऊन पोट भरले......... आता थोडे फिरून येऊ या....
पॉपकॉर्न खात खात विलिन्गेलि आयलॅन्ड ( मालदीव ) वरून फिरायचे... पॉपकॉर्न खाऊन सम्पले की बेट देखील सम्पते एवढे छोटे आहे ते..........

Pages