दुबई सहल आणि शोप्पिंग

Submitted by सन्जना on 25 November, 2015 - 15:02

आम्ही डिसेंबर मध्ये नाताळचा सुटीत दुबईला जाण्याचा बेत करत आहोत . सहा रात्री मुक्काम असणार आहे . तिथे पाहण्यची ठिकाणे must see बद्दल माहिती द्यावी . तसेच थोडे शोप्पिंगही करायचे आहे .

१ सोने , दागिने खरेदी कुठे करावी ?
२ इलेक्ट्रोनिक गोष्टी -- मोबाईल फोन , laptop , tablets साठी काही इंटरनेट साईट आणि दुकाने सुचवा .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या बरेचशे लोक्स सहिष्णु-असहिष्णु खेळताहेत, काही पिंगा घालताहेत आणि उरलेले धाग्यांच्या जिलब्या पाडताहेत, सो तुम्हाला उत्तर मिळेल पण थोडी वाट बघावी लागणार असे दिसत आहे.
बाकी दुबै विमानतळावर इ-वस्तु पाहिल्या होत्या पण स्वस्त वगैरे काही वाटल्या नाहित, बहुतेक आवडलेल्या तर इथल्या अ‍ॅमेझोन पेक्षा महागच वाटल्या.

Must see>>>>>>>
डेसर्ट सफारी, बुर्ज खलिफा ऑबजर्वेशन डेक, आबू धाबी चा मॉस्क, दुबई मॉल मधील अ‍ॅक्व्यारियम.

वेळ वाया घालविणार्‍या गोष्टी म्हणजे दुबई सिटी टूर आणि क्रुज. वेळेचा अपव्यय.

थोडे नंतर गेलात तर जानेवारीत दुबई शॉपिन्ग फेस्टिवल चालू होईल. पॅकेज टूर्स अवेलेबल आहेत खास त्या साठी आणि खूप डिस्काउंट पण आहेत त्य काळात.

थॉमस कुक चे पॅकेज बघितले मी. हे पाहा.
http://www.visitdubaishoppingfestival.com/ इलेक्ट्रॉ निक वस्तूंची खरेदी जि थे आहात तिथे
केलेली बरी पडते का? सर्विस च्या अंगाने? ते बघा.

ईलेक्ट्रॉनिक वस्तू घेताना वॅरेंटी वर्ल्डवाईड आहे कि नाही बघा. काही काही कंपन्यांची/ वस्तूंची वॅरेंटी गल्फ मधेच मर्यादीत असते.

१) सोन्याच्या किमती आता जगभर त्याच असतात. त्यामुळे ते स्वस्त वगैरे मिळणार नाही. दागिन्यांची डीझाईन्स जशी निवडाल तशी घडणावळ पडेल. गोल्ड सूक आहे पण इतरत्रही बरीच दुकाने आहेत. दागिन्यांवर आता भारतात काही कष्टम्स ड्यूटी भरावी लागते का, त्याची चौकशी करून जा.

२) इलेक्ट्रॉनिक्स बाबतही आधी भारतातील किमती बघून जा.

३) कुठलिही खरेदी प्रत्यक्ष वस्तू बघूनच करा.

आणखी काही टीप्स....

१) म्यूझियम आणि त्याला लागून असलेला मीना बाजार अवश्य भटका. तिथे उत्तम हॉटेल्स आहेत. गोरधन थाल ( शाकाहारी गुजराथी जेवणासाठी ) अवश्य ट्राय करा. म्यूझियमला लागून जी गल्ली आहे तिथे एक कृष्णाचे देऊळ आहे. तिथेच जरा पुढे साईबाबाचे आणि शंकराचे देऊळ आहे. बाजूलाच गुरुद्वारा आहे. तिथला प्रसाद अवश्य घ्या.
तिथूनच क्रीक क्रॉस करायला लाँचेस असतात, तिथे जॉयराईड घेऊ शकता.
तिथल्या सूकमधे चांगल्या क्वालिटीच्या साड्या मिळतील. घासाघीस अवश्य करा.
तिथून पुढे, काही सुक्या मेव्याची मोठी दुकाने लागतील. त्यांच्याकडे उत्तम दर्ज्याचे आणि भरपूर प्रकारचे सुके मेवे, मसाले, चॉकलेट्स मिळतील. ही खरेदी एअरपोर्ट पेक्षा खुपच स्वस्त पडते. शिवाय प्रत्येक माल जोखता येतो.

२) नवीन केलेले फुलांचे गार्डन अवश्य बघा.

३) हॉटेल मधे वादी बॅशिंगची टूअर असेल तर अवश्य घ्या. नितळ निळ्या पाण्यात डुंबता येईल. डे़झर्ट सफारी आणि बेली डान्स आवडत असेल तरच घ्या.

४) अटलांटिस पर्यंत मोनो रेलने जाऊन या. आता बहुतेक अटलांटिसच्या आत पर्यटकांना जाता येत नाही.

५) दुबई मॉल आणि मॉल ऑफ एमिरेटस मधली फुड कोर्ट्स सोडली तर सर्वच खुप महाग आहे.

६) अबु धाबीच्या मशिदीत किंवा इतरत्रही फिरताना शक्यतो पायघोळ कपडे घाला. आम्ही गेलो होतो तेव्हा सक्ती नव्हती पण माझी बहीण नंतर गेली होती, त्यावेळी तिला बुरखा घ्यावा लागला होता. तरीही अवश्य जा.

७) फेरारी वर्ड च्या राईड्स महाग आहेत, त्या घ्यायच्या नसतील तर तिथे जाण्यात अर्थ नाही.

८) फोटो मात्र भरपूर काढा.

मी गेल्या वर्षी दुबई अबु धाबी चे बरेच फोटो टाकलेत. अवश्य बघा.

माझे २ पैसे
१. सोने - रेट मुळे फरक पडू शकतो. पण फारसा नाही . पण वेगळी design मिळू शकतात. भारतात ज्यांच्या branch आहेत त्यांच्या कडून घेतले तर making चार्जेस वाया न जाता design बदलून मिळू शकते ( दुबई ला जावून त्याच दुकानात खरेदी करण्यात काय अर्थ . पण शोरूम wise design वेगळी असतात )
२. कपडे - प्रचंड variety मिळते.सगळे lables मिळतात.Winter ware तर खूप मस्त मिळतील आता. पण तुम्ही तसे कपडे इथे वापरणार असाल तर घेण्यात अर्थ आहे.
३.Eye ware, handbangs , shoes , make up , Accesories - मस्त .
४. इलेक्ट्रॉनिक्स बाबत आधी भारतातील किमती बघून जा. आजकाल सगळ मिळत इथे. ज्या मिळत नाहीत त्या इथे आणल्या तर काही gaurantee मिळत नाही.
Enjoy

हो, सोन्याच्या रेटमुळे नक्कीच फरक पडतो. पण इथल्या डिझाईन्सवर दाक्षिणात्य पद्धतीचा पगडा आहे असं मला वाटतं. बटबटीत वाटतात. अर्थात काय घेणार यावरही अवलंबून आहे. भारतात इथून नेताना किती सोनं नेणं अलाऊड आहे त्याची आधी माहिती काढा.

दिनेशदा, अबु-धाबीच्या मॉस्कमध्ये बायकांना बुरख्याची सक्ती आहेच.

आणि हो त्या गोल्ड सुक मध्ये गेल कि अगदी गरीब गरीब असल्याच फिलिंग येत . आपले हिशेब तोळ्याचे त्यांचे हार किलोचे .

आणि हो त्या गोल्ड सुक मध्ये गेल कि अगदी गरीब गरीब असल्याच फिलिंग येत . आपले हिशेब तोळ्याचे त्यांचे हार किलोचे . >>>> +१ Happy

भारतामधे ५०००० रु चे सोने आणता येते. जाताना तूमच्याकडे असलेले सोडून.

हा बोर्ड अजून आहे ना ?

इथे डोक्यावर पदर हवा असे दिसतेय पण चेहरा उघडा ठेवून चालत होता. मलेशियन बायका अश्याच वेशात होत्या पण युरोपियन बायकांनी असे पदर घेतलेले नव्हते,

माझ्या एका मित्रा च्या टी शर्ट वर मुलींचे चित्र (चेहर्याचे स्केच) होते. त्याला सिक्यूरिटीवाल्यांनी टी शर्ट उलटा करुन घालायला लावला. Happy मॉस्क मधले त्याचे सगळे फोटो उलट्या टी शर्ट मधे Biggrin

चेहरा उघडा चालतो पण बुरखा घालावा लागतो आणि केसही झाकावे लागतात. अर्थात तिथेच बुरख्याची सोय होते, काम झालं की परत द्यायचा.