मायबोलीकर नंदिनी देसाई यांचा २२ तारखेच्या लोकसत्तामधील लेख

Submitted by संदिप एस on 23 November, 2015 - 05:52

http://www.loksatta.com/vishesh-news/heavy-rain-in-chennai-1162504/

मायबोलीकर नंदिनी देसाई यांचा २२ तारखेच्या लोकसत्तामधील लेख.. नंदिनी पत्रकारिते मध्ये कार्यरत आहेत हे माहिती आहेच पण तरीही आपल्या सगळ्यांच्या माहिती साठी हा धागा... अनावश्यक वाट्ल्यास उडवला तरी चालेल
काल हा लेख मी घरी आईला आणी सौ. ला दाखवला एक मायबोलीकर म्हणून छान वाटते वेगवेगळ्या क्षेत्रातील मायबोलीकरांबद्दल असे काही वाचले की.. अभिनंदन नंदिनी!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनी इमर्जन्सी मध्ये तू घेतलेले निर्णय , आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याची क्षमता कौतुकास्पद आहेत

नंदिनी, वाचून काटा आला अंगावर. तू खूप धीराने छोट्या मुलीला सांभाळत परीस्थितीला तोंड दिलेस. कौतुक वाटते!

खूप धिराची आहेस तू नंदिनी. तू आणि कुटुंब सुखरूप आहे वाचून माझाही जीव भांड्यात पडला!
तुझी मोलकरीण आणि तिच्या घरचे लोक वाचलेत ना? फक्त घर बुडाल्याचं तू लिहिलं आहेस Sad

बापरे, नंदिनी, इतक्या बिकट परिस्थितीत तू धीराने घेतलेले योग्य निर्णय वाचूबर्तुझं खूप कौतुक वाटलं..
फेल्ट सो प्राऊड ऑफ यू !!!

भयंकर अनुभव. Sad
तुमची निर्णयक्षमता, प्लॅनिंग आणि हिंमत खरोखर खूप कौतुकस्पद आहेत

बापरे, नंदिनी, इतक्या बिकट परिस्थितीत तू धीराने घेतलेले योग्य निर्णय वाचूबर्तुझं खूप कौतुक वाटलं..
फेल्ट सो प्राऊड ऑफ यू !!! >>>+१११११११११

नंदिनी, तुम्ही सुखरूप आहात हे वाचून बरं वाटलं.
कुणी काय काय गमावलं असेल त्याची कल्पनाही करता येत नाही.
डिझास्टर मॅनेजमेंट या विषयात आपल्याला लांबचा पल्ला गाठा यचा आहे हे पुन्हा जाणवलं.

तुमचा प्रतिसाद (जो लेख आहे खरं तर) तो मूळ लेखात टाकता येईल का - वाचायला जास्त सोपं जाईल ते.

बरं झालं पूर्ण लेख टाकलास ते नंदिनी.
लोकसत्तेने फक्त ह्युमन कन्टेन्ट ठेवला. बाकी सगळंच कापलंय कोणताही विचार न करता Angry
परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत होवो!

आता वाचायला नीट संदर्भ लागला, कसेही संपादित केले आहे लोकसत्तामधे.
परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत होवो! >> ++१११

नंदीनी,
इथला प्रतिसादातला लेख वाचला.
सगळे सुरळीत आहे हे माहीत असूनही जीव वर खाली झाला आणि शेवटी 'हुश्श्श' करून भांड्यात पडला.

नंदीनी वाचून काटा आला ग अंगावर.
ह्या परीस्थितीतही गंगामैय्या म्ह्टलयस. सलाम तुला.

नंदिनी, किती व्यवस्थितपणे तू प्रत्येक गोष्टीचा विचार करून कृती केलीस! कौतुक वाटलं. लहान मुलीची जबाबदारी असताना हे सगळं सुचणंच अवघड आहे. लेख वाचून हबकायला झालंय.

मूळ लेख पण वाचला.
त्यांनी जागा वाचवायला काही परिच्छेद रँडमली उडवल्यामुळे जरा त्रोटक झालाय लेख,
इथे प्रतीसादात डिटेल आहे तसाच्या तसा छापायला पाहिजे होता.

वाचला होता लोकसत्तेत रविवारच्या तेव्हाच वाटलं होत ही मोबो वरचीच नंदिनी असेल असं

तो तेव्हाच संपादित असल्यासारखा वाटला होता, तरीही नंदिनीच्या निर्णयक्षमतेचे , धैर्याचे कौतुक वाटले होते.

नंदिनी, तु खूप छान तर्‍हेने मॅनेज केलस आणि ईश्वरी कृपेने यातुन तुम्ही सगळे बचावलात !!

<<वाचला होता लोकसत्तेत रविवारच्या तेव्हाच वाटलं होत ही मोबो वरचीच नंदिनी असेल असं
तो तेव्हाच संपादित असल्यासारखा वाटला होता, तरीही नंदिनीच्या निर्णयक्षमतेचे , धैर्याचे कौतुक वाटले होते.>>+१००
नंदिनी,
खूप खूप धन्यवाद तुमचे हा अनएडीटेड संपूर्ण लेख सगळ्यांसाठी ईथे पोस्ट केल्याबद्दल!
खरच तुमच्या धैर्याचे कौतुक करावे तित्के कमीच!!

लोकसत्तामध्ये वाचला होता. काही संदर्भ लागले नव्हते ते संपूर्ण लेख वाचून लागले.
प्रचंड धीराची आहेस नंदिनी. खूप कौतुक वाटलं ! वरील बर्‍याच प्रतिसादांना + १००

नंदिनी,
तुम्ही सविस्तर लेखनात सगळी भयानक परिस्थिती अगदी डोळ्यासमोर उभी केली आहेत.

वर्तमानपत्रात दिलेल्या लेखांचा हा प्रॉब्लेम असतोच. अति संपादनामुळे चेंगरून जातात.

नंदिनी, केवढा भारी प्रसंग! तू प्रसंगावधान राखून योग्य निर्णय घेतलेसवातुझ्या लेखामुळे परीस्थिती किती गंभीर होती याची कल्पना येते.

बाप्रे! किती शांत डोक्याने विचार केलास नंदिनी! व्हॉट्सअ‍ॅपवर पाणी भरत असण्यासंबंधीचे तुझे मेसेज मिळत होतेच, खूप काळजी वाटत होती. इथे तपशीलात लेख वाचून पुन्हा एकदा धस्स! झालं. लोकसत्ताने अगदी त्रोटक छापलं आहे.

Pages