काव्य-व्यक्तीचित्रण १

Submitted by बेफ़िकीर on 24 November, 2015 - 23:38

संयत सुंदर, मन स्थिरस्थावर
नेत्र मनोहर, स्मितही रुचकर
घर, व्यवसाय, कला, कविताही
अथांग तरि अवखळ सरिता ही
दु:ख तिचे लपवून वाहते
काठावर जलपर्ण साहते
इतरांचे दुष्कर्म पाहते
मात्र तळाशी शुद्ध राहते

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संक्षिप्त, तरीही छान चित्रण.

(कोणाचे हे मात्र समजले नाही ..... माझ्या आकलनशक्तीचा दोष :()

<<संक्षिप्त, तरीही छान चित्रण.>> +१००१

<<(कोणाचे हे मात्र समजले नाही ..... माझ्या आकलनशक्तीचा दोष )>> अशा गोष्टी कवीला विचारायच्या नसतात. Wink आणि कवीचा कुणा एका व्यक्तीवर नव्हे; तर सार्‍या जगावर हक्क असतो! Happy

उल्हासराव, शरद, तसे काही नाही. हा एक प्रयोग होता. परिचयामध्ये एक ज्योत्स्ना चांदगुडे म्हणून कवयित्री आहेत त्यांचे व्यक्तीमत्त्व कवितेत आणण्याचा प्रयत्न केला इतकेच.

आभारी आहे.

अरे वा!! ज्योत्स्नाताईशी माझा २० वर्षांपासून संबंध आहे. मानलेली बहिणच म्हणा! तिला पाठवली का? तिला खूप आवडेल.

आता माहितीतल्या व्यक्तीचे शब्दचित्र म्हटल्यावर परत वाचली. सही!! Happy

बे.फि. एक कल्पना मनात आली. अशी शब्दचित्रे पोस्ट करायची आणि वाचकांनी तीन दिवसांत ती व्यक्ती ओळखायची. कशी वाटली आयडिया?