होम लोन एका घराचे दुसर्‍या घरासाठी ट्रांसफर करता येते का ?

Submitted by प्राजक्ता_शिरीन on 25 November, 2015 - 00:03

नमस्कार,

आमचे HDFC चे होम लोन आहे. अजून पझेशन मिळालं नाहीये आणि आम्ही त्याचं स्कीममधे दुसरं घर घेण्याचा विचार करतोयं. तर जुनं लोन अकाऊंट बंद न करता - ते अ‍ॅग्रीमेंट कँसल करू आणि नवीन रजिस्ट्रेशन करू - नवीन घराची कागदपत्र दाखवून लोन ट्रांसफर करता येतं का ? का जुनं बंद करून पूर्णपणे नवीन लोन होतं ? कोणाला काही माहीती आहे का ?

बँकेचा माणूस म्हणतो ट्रांसफर होत नाही आणि बिल्डर म्हणतो ट्रांसफर होऊ शकतं. (अर्थात बँकवाला जास्त माहीतगार पण तरी इथे कोणाला अनुभव असेल तर प्लीज सांगा. )

- प्राजक्ता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही बँकेबरोबर जुन्या घराबद्दल मॉर्टगेज डीड केले आहे का? तसे असेल तर बॅंक लोन ट्रान्फर करु देणे अवघड आहे.

एच डी एफ सी वाले येडपट आहेत काहीही सांगतात. आम्ही मुलीना लोन देत नाहीत कारण त्या लग्न होऊन जातात असे एच डी एफ सी च्या मयूर कॉलनीच्या एका येड्याने मला सांगितले !

माझ्या अल्पमाहिती नुसार, लोन ट्रान्सफर होणे/करता येणे /न येणे वगैरे बाबी बोली भाषेपुरत्या ठीक आहेत.
वर स्वातींनी सांगितल्याप्रमाणे मॉर्टगे़ज डीड झालेले असेलच.
सबब नविन फ्लॅटकरता नविन मॉर्टगे़ज डीड करुन स्वतंत्र लोन दाखविणे हा बँकेच्या दृष्टीने सहज सोपा सरळ मार्ग.
पण ते करताना आधीच्या लोनमुळे रिपेईंग कॅपॅसिटी डाऊन झाल्याने कदाचित दुसरे लोन न होऊ शकणे ही शक्यताही असु शकते.
सबब आपण बोलि भाषेत दोनही लोन एकत्र करणे वा लोन ट्रान्स्फर करुयात वगैरे म्हणू शकतो.
यावर बँकेच्या दृष्टीने उपाय एकच्च म्हणजे परिस्थिती समजुन घेऊन, दोनही फ्लॅटकरता स्वतंत्र मॉर्टगेज डीड एकत्र करुन, त्यावर मिळू शकत असलेल्या लोन अमाऊंटमधुन जुन्या मॉर्टगेज डीड अगेन्स्टचे लोन फुल्ली रिकव्हर्ड दाखवुन दोनही फ्लॅट करता नविन एकच एक लोन करणे हा होय. पण बँकेला या झंझटित पडायचे वा नाही हे तुमच्या वाट्याला आलेल्या ऑफिसर वरुन ठरेल.
दुसरा उपाय म्हणजे दोनही लोन स्वतंत्रच ठेवायची, व दुसर्‍या फ्लॅटच्या लोनकरताही रिपेयिन्ग कॅपॅसिटी शाबुत असेल, तर पहिले लोन नवर्‍याच्या नावाने (जॉईन्टली वुईथ वाईफ) असेल, तर दुसरे लोन वाईफच्या नावाने (जॉईन्टली वुईथ हजबड) असे करता येऊ शकेल.
(जाणकार मार्गदर्शन करतीलच. तोवरचे हे दोन पैसे.)

जर तुम्ही एका प्रॉपर्टी साठी कर्ज काढले तर ते आधी फेडावे लागणार ना ? त्या शिवाय ते फ्लॅट ची कागदपत्रे परत देणार नाहीत.

बँकेच्या अंतर्गत प्रक्रियेमधे असे कसे करता येईल ?

बिल्डर कोण आहे? नवखे/अर्धवट माहिती असलेले बिल्डर काहीही सांगतात

धन्यवाद, स्वाती, रॉबिनहूड, लिंबूटिंबू.

मॉर्टगेज डीड झाले आहे.

बिल्डर म्हणत होता कि जुनं रजिस्ट्रेशन कँसल केलेलं दाखवायचं आणि सेम लोन नवीन च्या अगेंस्ट सुरू राहीलं. अजून कुठे माहीती मिळू शकेल ?

बिल्डर म्हणत होता कि जुनं रजिस्ट्रेशन कँसल केलेलं दाखवायचं>>> हे शक्य नाही. तुम्ही ते डॉक्युमेंट रजिस्टर केले असेल ना?
बँक असं कँसलेशन नाही दाखवत. त्यांचे नॉर्म्स स्ट्रिक्ट असतात. जर डिसबर्समेंट घेतली नसेल तर तुम्ही ते मॉर्टगेज डीड कॅन्सल करा, व नवीन अप्रुवल घेऊन नव्या प्रॉपर्टीसाठी नवे मॉर्टगेज डीड करा. या प्रकारात तुमची लोन अप्रुवल फी जाईल. त्यात सुद्धा नवीन अप्रुवलच्या वेळेस बँक कन्शेशन देऊ शकते किंवा पुर्ण अप्रुवल फी waive off करु शकते.

जर डिसबर्समेंट घेतले असेल तर जास्त फी किंवा पेनल्टी बसेल. मग ते काय आणि कसे करायचे, ते तुम्ही बँकेला विचारुनच खात्री करा.

स्पष्ट सल्ला असा की बिल्डर जे सांगतोय त्यापेक्षा बँक काय सांगतीये ते नीट पडताळून पहा कारण एकदा तुम्ही नव्या फ्लॅट साठी बिल्डर बरोबर अअ‍ॅग्रिमेंट केले, स्टँप ड्युटी भरली आणि बँकेने लोन ट्रान्फर नाही केले तर प्रॉब्लेम होईल. ही बँक नाही तर दुसर्‍या बँकेकडे सुद्धा कारण आधीच्या लोन मुळे उत्पन्नावर कीती क्रेडीट फॅसिलीटी उपलब्ध आहे याचे गणित बदलेल. व जेवढी वरची लिमिट आहे तेवढेच लोन उपलब्ध होऊ शकेल.

प्राजक्ता, एकदा तुम्ही एसबीआयमध्येही चौकशी करावी असं वाटतंय. तिथले लोक्स जास्त अनुभवी, असं मला आपलं वाटतं. विचारून माहीती घ्यायला काय हरकत आहे?
मी कुणी तज्ञ मात्र नाही.

हे शक्य नाही. तुम्ही ते डॉक्युमेंट रजिस्टर केले असेल ना?
>> तेच म्हणते. शिवाय स्टँप ड्यूटी वगैरे भरलेली असेल त्याचे काय होईल अश्या परिस्थितीत. तुमचे नुकसान होउ शकते.

तेच म्हणते. शिवाय स्टँप ड्यूटी वगैरे भरलेली असेल त्याचे काय होईल अश्या परिस्थितीत. तुमचे नुकसान होउ शकते.>> अमा, मॉर्टगेज डीड वर खूप जास्त ड्युटी नाही बसत. मुख्य मुद्दा आहे की disbrusement घेतली असेल तर बँक cancellation deed करेल का? किंवा pre payment of that disbrused amount करु देईल का?

मी सहा वर्षे नॅशनलाईज्ड बँकेत काम केले आहे. बॅम्केत माणसाप्रमाणे इंतरप्रितेशन बदलतात , विशेषतः लोनबाबत. बॅम़्एतही इतर क्षेत्राप्रमाणे आपल्याच व्यवहाराबद्दल अज्ञानी लोक भरपूर आहेत. बँक ऑफ ईंडिया ह्या बँकेत मी होतो म्हणून प्रेमाने कर्वे रोडच्या शाखेत खाते उघडायला गेलो .तिथे नॉमिनीचा फॉर्म भरायला सांगितले. मग माला सांगण्यात आले की नॉमिनीची सही त्यावर आणा . वास्तविक त्याची काहीही आवश्यकता नसते. मे शांतपणे त्याना सांगितले माझा नॉमिनी पाकिस्तानात असतो त्यामुळे त्याची सही आनणे शक्य नाही. मग त्यानी मला म्याणेजरला भेटायला सांगितल म्याणेजर एक विदुषी होत्या त्यानी सुद्धा सांगितले हो हो सही लागेलच. मग नुम्हाला नियम कळत नाहीत आणि ही बाब मला ऑम्डसमन आणि हेड ऑफिईसला कळवावी लागेल असे सांगितल्यावर कुठे खाते ओपन झाले... तात्पर्य थोडे चकचकीत असले तरी बँका ह्या कोणत्याही सरकारी खात्यापेक्षा कमी नाहीत...

रॉबीनहूड , वरच्या सगळ्या गोष्टी दिपक पारेख बरोबर जॅक नाहीये या assumption वर लिहिल्या आहेत. चु.भु.दे.घे. Wink

काpre payment of that disbrused amount करु देईल का?>>>>>>>

एचडीएफसी मधे प्री पेमेंट करता येते. दंड बसत नाही

स्वाती, अमा, अगदी बरोबर.
बँक तएस करायला परवानगी देईल/राजी होईलही, पण ते करताना आर्थिक नुकसान कुठे कुठे कसे कसे होऊ शकते याचाही विचार व्हावा.
स्टॅम्प ड्यूटी, बॅन्क प्रोसेसिंग चार्जेस, आधीच्या लोनचे अर्लि क्लोजर/रिपेमेंट फाईन, (त्यातही रुल असतो की किमान अमुक इतके महिने ६/१२ च्या आत अर्लि क्लोज होत नाही) इत्यादी.
तरीही, एक नक्की, की बिल्डर जे सांगतोय, त्यातही तथ्य आहेच. तसे होऊ शकते, डिपेण्ड्स अपॉन बँक ऑफिसर, शिवाय वरील डिस्बर्स्मेंटचा मुद्दा लागु आहेच.
स्ट्रीक्टली लिगली बघायचे तर मूळच्या मॉर्टगेजला पुरवणी म्हणुन दुसर्‍या फ्लॅटचे लावता येईल का हे देखिल तपासले पाहिजे. तार्किक दृष्ट्या तरी ते शक्य वाटले तरी बँका कितपत राजी होतात ते हुडाने म्हणल्याप्रमाणे तेथिल व्यक्तिंवरच अवलम्बुन आहे की ते क्लॉजेसचा काय अर्थ लावताहेत.

शिवाय स्टँप ड्यूटी वगैरे भरलेली असेल त्याचे काय होईल >>>>>
विषय अ‍ॅग्रीमेंटवरच्या स्टँप ड्यूटी चा असेल तर अ‍ॅग्रीमेंट रद्द केल्यावर ती परत मिळू शकेल. १००% मिळत नाही.

!हो पण ते पुर्ण disbrusement नंतर आणि ओसी मिळाल्या नंतर.>>>>>

कळले नाही. जरा विस्तारुन सांगता का?
ओसी म्हणजे ?

ओसी म्हणजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट बहुतेक.

मी रिटायर्मेंट प्लानिन्ग मोड मध्ये असते आजकाल. आजच वाचवलेला एक एक रुपया म्हणजे दहा वर्शानंतर आप्ल्याला थोडीसी राहत देवु शकेल. आपंले क ष्टाचेच पैसे असतात. थोडे तरी वाया का घालवावे.

म्हणजे मी जर ४० लाखा च्या लोनचे अ‍ॅप्रुव्हल घेतले पण जर काही कारणामूळे त्यातले ३०च लाख वापरले तर मी ते ३० ला ख + त्याचे व्याज +प्रोसेसिंग फी परत करुन बँकेकडून लोनची फाईल बंद करु शकत नाही का ?

लोन ची फाईल बंद करायची असल्यास मला पुर्ण ४० लाख घेउन, ओसी घेउन च करावी लागते ?

स्वाती यांच्या विधानाचा अर्थ असा आहे का ?

@ स्वाती, आम्ही १/३ disbursement घेतलं आहे , आमचा अंदाज होता की तेवढे भरून लोन क्लोज होईल. प्रीपेमेंट चार्जेस तर नाही पडत असं कळलं होतं.

ब्यान्केचे व्याज बुडते म्हणुन ब्यान्का शॉर्टकट मार्ग सांगत नाहीत.

...

मला काल आयडी बी आय वाले बोल्ले की पर्सनल लोन टोपप करुन लवकर बंद करता येत नाही.

मोग्या, त्यांच्या काय बाचंजातंय. रिपे झालेले पैसे दुसर्‍याला लोन म्हणून देता येतातच की. व्याज मिळत राहतेच ना?