आमिरखानचे विधान - होत्याचे तर काही झालेच नाही - भलते मात्र केले

Submitted by Rajesh Kulkarni on 24 November, 2015 - 12:56

आमिरखानचे विधान - होत्याचे तर काही झालेच नाही - भलते मात्र केले
.
.
आमिरखान स्वत: देश सोडून जातो असे म्हणालाच नाही. तरी त्याच्यावर तसा आरोप झाला.

आमिरखान देशद्रोही आहे, त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या महिला प्रवक्त्यांनी केली - बुद्धी घोट्यात याचा पुरावा. आमीरखानच्या विधानात देशद्रोह कोठे दिसतो?

आमिरखानने असे बोलणे म्हणजे आम्ही इतकी वर्षे सापाला दूध पाजले - रामदास कदम. हे महाशय शिवसेनेचे व आपल्या राज्याचे मंत्री आहे. यांचीही समज घोट्यात. आमिरखान साप कसा? त्याचे दूध तो पिला. तुम्ही त्याला काय दिले? तो यशस्वी झाला तो तुमच्यामुळे? तो झाला नसता, तर दुसरा कोणी असता, हेदेखील यांना कळत नाही.

आमिरखानला देश सोडून कोठे जायचे आहे ते सांगा. त्याला वन वे तिकिट काढून देऊ. - आदित्यनाथ व प्राची. या दोन व्यक्ती देशात नसत्या तर देशाचे किती भले झाले असते. आदित्यनाथ आणखी म्हणाले की आमिरखान देश सोडून गेला तर देशाची लोकसंख्या तेवढीच कमी होईल. आदित्यनाथांना सांगायला हवे, आमीरखानला येथेच राहू दे. त्याच्याऐवजी तुम्ही जा. तो तुमच्यापेक्षा फार कमी वेळा वादग्रस्त बोलतो. धार्मिक तेढ वाढेल असे तर तो बोलतच नाही. तेव्हा त्याला येथे राहू दे. तुम्हीच जा.

आयबीएन-लोकमतवरची चर्चा तर आज देशात मुस्लिम स्वत:ला असुरक्षित समजतात का या विषयावर झाली. आमिरखानच्या विधानात मुस्लिम धर्माचा कोठे प्रश्न आला?

राहूल गांधी - आमीरखानवर टीका करण्यापेक्षा त्याने काय म्हटले याकडे लक्ष द्या. आमीरखानने कोणत्याही सरकारबद्दल कमेंट केलेली नाही. अर्थात हे कळण्याची क्षमता पप्पूकडे नाही.

अनेक माध्यमे तो व त्याची पत्नी देश सोडून जायचे आहे असे म्हणाल्याचे दाखवत आहेत.

सगळ्यात शहाणे ठरले मुख्यमंत्री फडणवीस. त्यांना प्रतिक्रिया विचारली तेव्हा ते म्हणाले की मी काही तरी बोलणार आणि तुम्ही ते दिवसभर दाखवत बसणार. राज्यापुढे त्यापेक्षा इतर अनेक मोठे प्रश्न आहेत.

तो बोलला काय, बाकीच्यांनी दाखवले काय आणि वादाला भलतेच वळण मिळाले काय? एखाद्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादाला कसे भलतेच वळण लागते याचे हे उत्तम उदाहरण आहे. याला म्हणतात होत्याचे भलते करणे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>एखाद्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादाला कसे भलतेच वळण लागते याचे हे उत्तम उदाहरण आहे. याला म्हणतात होत्याचे भलते करणे.<<

सहमत. आमीर खानची "ती" सो काॅल्ड मुलाखत पाहिली. बोलण्याच्या ओघात काहितरी सनसनाटी वाक्य पेरलं गेलं अशी शक्यता वाटतेय. अर्थात त्या वाक्याचा पुढे परिणाम (इंटरप्रिटेशन) काय होउ शकतो याचा सारासार विचार त्याने केलेला नव्हता हे नंतर एका पत्रकाराच्या फाॅलोअप प्रश्नावर त्याने दिलेल्या उत्तराने स्पष्ट झालं...

थोडक्यात आमीरची "खायापिया कुछ नहि और ग्लास तोडा बारा आना" अशी अवस्था झालेली आहे... Happy

��"वन्देमातरम्" ��
सरकार को दिल्ली से लाहौर तक
"असहिष्णु एक्सप्रेस" चलानी चाहिए
जिनको ये देश असहिष्णु नजर आ रहा है
वे बिना टिकट निकल ले !
��������

छान आवडले. पण दंगल चित्रपटासाठी हा ध्यानाकर्षक फंडा आहे असे माझे वैय्यक्तिक मत. देश सोडून जाण्याच्या बाता आशा भोसलेनीही केल्या होत्या. ज्याचा त्याचा व्यक्तिगत स्वार्थ. आमीरखानला हवा तसाच गोंधळ उडाला आहे. एव्हरीबडी इज प्लेईंग आमीर्स गेम. सगळे त्याच्या तालावर नाचत आहेत...

कांगावा हा धागा ही याच विषयावर आहे ना ? Uhoh मग परत त्याच त्याच विषयावर अनेक धागे काढण्याचे प्रयोजन काय ?

सगळ्यात शहाणे ठरले मुख्यमंत्री फडणवीस. त्यांना प्रतिक्रिया विचारली तेव्हा ते म्हणाले की मी काही तरी बोलणार आणि तुम्ही ते दिवसभर दाखवत बसणार. राज्यापुढे त्यापेक्षा इतर अनेक मोठे प्रश्न आहेत.

मस्त...... आता बाकीच्या मंडळींनी हा आदर्श ठेवावा म्हणजे झाले.

सगळ्यात शहाणे ठरले मुख्यमंत्री फडणवीस. त्यांना प्रतिक्रिया विचारली तेव्हा ते म्हणाले की मी काही तरी बोलणार आणि तुम्ही ते दिवसभर दाखवत बसणार. राज्यापुढे त्यापेक्षा इतर अनेक मोठे प्रश्न आहेत.

मस्त...... आता बाकीच्या मंडळींनी हा आदर्श ठेवावा म्हणजे झाले.>>>> +१२३४५६७८९

खरय! आज जाणिव झाली की खूप कामे आहेत, तरी आपण सगळे सगळ्या बाफावर वाद घालत आहोत.:अरेरे:

पण फडणवीसान्चा टोमणा मिडीयावाल्यानी सिरीयसली घेतला तर बरे. नाहीतर आज ते तेच दळण सकाळपासुन दळतायत.

सहिष्णुतेच्या नानाची टांग : आमिरचं स्वत:ची बाजु मांडणारं स्टेटमेंट आलं, अपेक्शेप्रमाणे देश सोडुन जाणार नाहि हा खुलासा त्याने केला. गंमत अशी कि गेले दोन दिवस त्याला झोडपणारे (उजवे, किंचीत उजवे, लिबरल उजवे) हळुहळु शांत होतायत तोवर आमिरची तळी उचलणारे (डावे, किंचीत डावे, समाजवादि) अचानक सगळीकडे स्कोर सेटल करण्यात सक्रिय झालेत... Happy

काल एक विनोद ऐकला..
मोदी आमिरला म्हणतात.. तुला कुठल्या देशात जायचेय सांग "जाता जाता" ड्रॉप करतो Happy

रॉहु च्या म्हणण्यात तथ्य वाटते. आमिरने अतिशय तोलुन मापुन हे विधान केले आहे. आणि यात स्मार्टनेस हा कि काही झाले तर "मी कुठे म्हणालो? हे तर बायको म्हणाली" असे म्हणायला मोकळा.