आपल्या शिक्षणपद्धतीत शालेय जीवनात 'चित्रकला' या विषयाला जितकं महत्त्व दिलं जातं, दुर्दैवानं तितकीच चित्रकला मी शाळेत असताना शिकले. पण चित्र हे अभिव्यक्तीचं माध्यम आहे, ह्याची जाणीव मात्र त्या वयात देखील कळत-नकळत होत होती. कुठे उत्तम चित्र असे, कुठे उत्तम रंगसंगती जमली असेल, कुठे चांगला पॉलीटीकल ह्यूमर व्यंगचित्रातून व्यक्त झालेला असेल, कुठे मुक्त मॉडर्न अभिव्यक्ती असेल, कुठे नुसत्या रेषांतून व्यक्त होणं असेल - आई-बाबा त्यांच्या पाहण्यात आलेली चित्र आवर्जून आम्हाला दाखवत असत. त्यातल्या सगळ्या गोष्टी अर्थातच त्या वयात समजल्या असं अजिबातच नाही, पण कुठेतरी मनावर 'आर्ट' पाहण्याचे संस्कार झाले असावेत. पुढे वाचनातून, पाहण्यातून, विविध देशात हिंडण्यातून, विविध लोकांशी झालेल्या गप्पांमधून रंग, रेषा, निर्मीती, अभिव्यक्ती ह्याच्याशी जवळीक घडत गेली. गेल्या काही वर्षांत, आपल्या लहानपणी 'काय गिरगटलंय' असं ज्याला 'गिरगटणं' म्हणलं जायचं, त्या प्रचंड इफेक्टीव्ह, परीणामकारक 'टँगल आर्ट' ची ओळख झाली. आधी डूडल्स वर ओझरती नजर टाकली जायची. मग नकळत डूडल्स बारकाईनं बघायची सवय लागली, त्या रेषांतून अर्थ काढण्याचा, कलाकाराच्या भावना, त्याचं व्यक्त होणं समजून घेण्याचा खेळ मनात रंगायला लागला. गंमत म्हणजे' गेली अनेक वर्ष मी वेळोवेळी 'गिरगटण्यातून, रेषांमधून स्वतःला व्यक्त करायची धडपड करतीये' याची जाणीव मला गेल्या ३-४ वर्षात झाली. आजही अनेक वेळा डोक्यात विषय असतात, त्याचं इंटरप्रीटेशन , व्हिज्युअल, त्यातली प्रत्येक उभी आडवी रेष, रंग, टेक्चर असं समोर दिसतं, पण अनेकदा हातातून हवं तसं उतरत नाही. अशा वेळी लहानपणी 'शास्त्रोक्तरीत्या चित्रकला शिकली नाही' ह्याची खंत प्रचंड बोचते, जाणवते. दरवेळी मला शब्दातून व्यक्त व्हावसंच वाटत नाही. एखादं डूडल काढलं जातं. कधी जमतं- कधी जमत नाही. पण त्यातून व्यक्त झालं निदान स्वतःसाठी की मग दुसर्या अभिव्यक्तीची गरज नाही वाटत. स्वस्थ-शांत वाटतं. I am totally tangled in this tangle art ! अनेकदा स्वतःच्याच लिमीटेश्न्स जाणवतात, पण रेषा स्वस्थही बसू देत नाहीत. त्या उमटायच्या तश्या उमटतातच. या डुडल्सच्या, टँगल आर्ट च्या जगात मी नवखी असले तरी या व्यक्त होण्यातली धडपड, तडफड, नशा, मजा अनुभवण्यात एक गंमत आहे.
ही अशीच काही डुडल्स. २ मिनीटापासून २० मिनीटापर्यंतची मायक्रो-मिनी प्रोजेक्टस ....
हे काही बुकमार्क्स....
आणि ही काही आय-पॅडवर त्या त्या वेळच्या मूडप्रमाणे , विचारांप्रमाणे काढलेली डूडल्स
पतझड मे कुछ पत्तोंके गिरने की आहट...
The 'नूज ' is all over the 'न्यूज' ...
हे परवा थँक्सगिव्हींला केलेले डूडलींग. कॉफी शॉपमधे बसल्या बसल्या, गप्पा मारताना केलेले. अगदीच अनप्लॅन्ड.
Turkey Doodle
वा! खुप छान आहेत. दरवेळी मला
वा! खुप छान आहेत.
दरवेळी मला शब्दातून व्यक्त व्हावसंच वाटत नाही. एखादं डूडल काढलं जातं. कधी जमतं- कधी जमत नाही. पण त्यातून व्यक्त झालं निदान स्वतःसाठी की मग दुसर्या अभिव्यक्तीची गरज नाही वाटत. स्वस्थ-शांत वाटतं. I am totally tangled in this tangle art ! अनेकदा स्वतःच्याच लिमीटेश्न्स जाणवतात, पण रेषा स्वस्थही बसू देत नाहीत. त्या उमटायच्या तश्या उमटतातच. या डुडल्सच्या, टँगल आर्ट च्या जगात मी नवखी असले तरी या व्यक्त होण्यातली धडपड, तडफड, नशा, मजा अनुभवण्यात एक गंमत आहे.
ही स्वतःच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीची मीमांसा आवडली. प्रामाणिक आहे. आणि म्हणूनच चित्रेही जास्त छान आहेत.
वरच्या सर्व चित्रात नजाकत आहे, वेल दिलेला आहे.
पॅरिस मात्र तसे नाही...
फारच सुरेख अभिव्यक्ति .....
फारच सुरेख अभिव्यक्ति .....
सुंदर! मला अॅबस्ट्रॅक्ट्स
सुंदर!
मला अॅबस्ट्रॅक्ट्स आवडली आणि तो छोटा हत्ती पण मस्त
आरती, अतिशय सुरेख. सगळीच
आरती,
अतिशय सुरेख. सगळीच खुपच छान आहेत. तुझे मनोगत व्यक्त होण्याबाबतचे, अगदी अगदी अभिव्यक्त झाले आहे ह्या सर्व कलाकृतींतून.
Keep it up. पुढील प्रोजे़क्ट्स साठी शुभेच्छा!
प्रिया
सुरेख.
सुरेख.
सगळ्यांच्या प्रतिसादांबद्दल
सगळ्यांच्या प्रतिसादांबद्दल मनापासून धन्यवाद.
सायो, नाही गं. नाही जमत. मी फारशी मेहेंदी वगैरे कधी काढलीच नाहीये.
बी, होय. माधव आचवल वाचलेत. त्यांचं 'जास्वंद' माझ्या आवडत्या आणि संग्राह्य पुस्तकांपैकी एक आहे. माझं हे लिखाण वाचून माधव आचवल आठवले असतील कोणाला तर 'आय एम ऑनर्ड' इतकंच म्हणेन मी
चित्राला नाव असो वा नसो, ते रेखाटण्याच्या पद्धतीवर त्याला डूडल म्हणावं का नाही हे ठरतं. त्यामुळे सगळीच डूडल्स.
प्रत्येक वेळी रंगीत, शिस्तबद्दल चित्र तयार होईलच असं नाही. खरं तर यातल्या काही चित्रांच्या मागचे विचार लिहायला आवडलं असतं, पण त्याने पाहणार्याच्या दृष्टीकोन आधीच बायस होईल का? आणि तसा तो करण्यात अर्थ नाही कारण मग इंटरप्रीटेशन मधली मजा जाईल असा विचार करून नाही लिहिले.
उदा. दुसर्या चित्रातले जे झाड आहे, त्याची थॉट प्रोसेस फार इंटरेस्टींग होती. गेली अनेक वर्ष ' आळंदीचा अजानवृक्ष' मला विलक्षण आकर्षित करत आलाय, माझ्या विचारात खूपदा असतो तो. काही महिन्यांपूर्वी अचानक कोलटकरांची 'ज्ञानेश्वरसमाधिवर्णन' कविता वाचली. त्यातल्या शेवटच्या २ ओळी -
' स्थिरावला हार वाळली पाकळी
गुंतली फासळी निर्माल्यात'
मला विलक्षण आवडतात आणि अस्वस्थही करतात. ह्या सगळ्या विचारातून ते बरगड्या, सेल्स, वाळकी पानं असं डूडल, ते झाडं काढायचा प्रयत्न केला गेलाय.
निनाद, अगदी योग्य निरीक्षण आहे. पॅरीस काढताना पहिल्या क्षणात जे उतरलं ते तसंच ठेवलंय, त्यावर सफाईचा, करेक्शनचा हात फिरवला नाही मुद्दामच - क्षणिक घडणार्या आणि एकदा घडून गेलं की दुरुस्त न करता येणार्या घटनेचं प्रतिक म्हणून - जसा परवाचा पॅरीस मधला हल्ला. नंतर कोणाला कितीही वाटलं हे घडायला नको होतं तरी ते 'क्षणात ' घडुन गेलंय. तो क्षण परत येणे नाही.
शिवाय त्या हादर्याचं प्रतिक म्हणून तो विस्कळीत आयफेल टॉवर, सुबकतेचा हात न फिरवलेला.
बेसिकली हे असं काय काय विचारात चालू असतं. कधी जमतं- बहुतेक वेळा जमतही नाही. पण विचार आणि गिरगटणं दोन्ही थांबवता येत नाही.
प्रतिसाद मोठा झालाय. क्षमस्व
फारच छान रार. प्रतिसाद पण
फारच छान रार. प्रतिसाद पण छान.
खूपच सुंदर. कसा काय निसटला हा
खूपच सुंदर.
कसा काय निसटला हा बाफ ?
https://scontent.fbom1-1.fna.
https://scontent.fbom1-1.fna.fbcdn.net/hphotos-xaf1/v/t1.0-9/10417616_10...
Creative mother turns two-year-old daughter's doodles into delightful paintings
कापोचे, अशक्य भारी रुपांतर
कापोचे, अशक्य भारी रुपांतर आहे ते
एकुणएक उत्तम.. मला खुप आवडलं
एकुणएक उत्तम..
मला खुप आवडलं सर्वच डुडलींग..
मी पण करते डुडलींग पण तुझ्या प्रचिमधल्यासारखं मुर्त स्वरुप येत नै त्याला सहसा
बाकी वेगवेगळ्या फाँट मधे नाव लिहायला मात्र बरेचदा चालतं.. पुढे मागे सवडीने टाकेल..
kapoche, तुम्ही दाखवलेली
kapoche,
तुम्ही दाखवलेली चित्र अशक्य सुंदर आहेत..
रार,
तुमच्या डुडलींग स्टाईल ला कॉपी करुन बघायची जाम इच्छा होतेय..
हर्पेन आणि टीना डूडलचे
हर्पेन आणि टीना
डूडलचे रुपांतर या चित्रात होतानाचा व्हिडीओ सापडला तर देईन इथे. धन्यवाद.
खूप सुंदर!
खूप सुंदर!
कापोचे, मस्तच लिंक. कसली
कापोचे, मस्तच लिंक. कसली भारी क्रीएटीव्हीटी आहे.
टीना, जरूर ट्राय कर आणि मला नक्की दाखव. आवडेल मला पहायला.
हर्पेनला पण आता डूडल्समधे मजा वाटायला लागलीये. हर्पेन, तू केलेले बुकमार्क्स पण पोस्ट कर की इथे ...
थोडं अवांतर : 'बायोस्कोप' सिनेमाच्या सुरुवातीला गुलजारचं निवेदन, नॅरेशन चालू आहे, तेव्हा बॅकग्राऊंडला डूडल काढलंय... जबरदस्त आहे. जरूर पहा ... मला सॉलीड आवडलंय.
डुडल आणि चित्रं यात काय फरक
डुडल आणि चित्रं यात काय फरक असतो? मला डुडल विषयी फारशी माहिती नाही.
फक्त गुगल डुडल्स माहित आहेत. ते पाहुन असे वाटले होते कि एखादे नाव चित्रात येईल असे लिहिणे म्हणजे डुडलींग. (जे आपण एखाद्या स्पेशल दिवशी गुगलच्या होमपेजवर पाहातो).
पियू, डूड्ल म्हणजे गिरगिटणे.
पियू, डूड्ल म्हणजे गिरगिटणे. आपण लेक्चर, सेमिनार वगैरे सुरू असताना नोटपॅडवर काहिही डिझाईन काढ्तो तीच
थोड्क्यात डूड्ल हे रॉ स्केच तर चित्र हे फिनिश्ड प्रॉडक्ट आहे. वर kapoche च्या लिंक मधलं मुलीचं डूड्ल आहे आणि आईने त्याचं चित्रं केलंय..
खूप छान. पॅरिस अगदी चटका
खूप छान. पॅरिस अगदी चटका लावणारं.
मी केलेले डूडल्स अत्यंत
मी केलेले डूडल्स अत्यंत बालीश-हौशी आहेत.
मला अशी चित्रं काढायला मजा येतेय पण अजून इथे झब्बू देण्याइतके सफाईदार नाहीयेत खरंतर
पण हे पाहून आणखी कोणी प्रेरित होणार असेल तर चांगलेच असे म्हणून देतो झालं
सुलेखनाचा आणि शुद्धलेखनाचा
सुलेखनाचा आणि शुद्धलेखनाचा खूण झाला असेल तर माफ करावं
रार मला माफ करा, या धाग्याचा
रार
मला माफ करा, या धाग्याचा वापर करण्यासाठी. पण आज एक अद्भूत कलाप्रकार पाहिला. त्याविषयी इथे माहीती काही मिळू शकेल या हेतूने हा व्हिडीओ शेअर करतोय. या कलेविषयी याआधी काही ऐकलेले नाही.
https://www.facebook.com/TheOfficialGeet/videos/438403399683090/
कापोचे, भारी आहे हा व्हीडीयो.
कापोचे, भारी आहे हा व्हीडीयो. शेयर केल्याबद्दल धन्यवाद.
हे परवा थँक्सगिव्हींला केलेले
हे परवा थँक्सगिव्हींला केलेले डूडलींग. कॉफी शॉपमधे बसल्या बसल्या, गप्पा मारताना केलेले. अगदीच अनप्लॅन्ड.
Turkey Doodle
सुंदरच
सुंदरच
माझे काही डूडल्स.. पर्सनली
माझे काही डूडल्स..
पर्सनली मला नाही माहिती कि तुमच्या मनातले विचार डूडल मधे उतरतात कि नाही ते, पण तुमचं गढूळ झालेलं मन शांत करायला मात्र हि गिचिडमिचिड नक्की मदत करते..
याला डूडल म्हणावं का? कंटाळा आला आणि समोर कोरी भिंत दिसली म्हणुन जागा दिसेल तिथे ब्रश मारायला सुरुवात केली
नारुटो कार्टून मधला हाताके काकाशी .. माझ आवडतं कॅरेक्टर..
एक अॅनिमी मुव्ही बघत असताना अशीच कल्पना आली डोक्यात ती उतरवली एका नेकलेसच्या मागे असलेल्या पुठ्ठ्यावर .. आता त्याचा बुकमार्क म्हणुन वापर करतेय
सद्ध्या ब्लीच नावाची अॅनिमी सिरिज बघतेय.. त्यातलं लिड कॅरेक्टर.. कुरोसाकी इचिगोचा हॉलो फॉर्म..
एका फॅन आर्ट वरुन इन्स्पायर होउन काढलयं..
बूक्मार्क्स खुपच नजर खिळवून
बूक्मार्क्स खुपच नजर खिळवून ठेवणारे आहेत!
टीना, खूप सुंदर झालीत सगळीच
टीना, खूप सुंदर झालीत सगळीच डुडल्स!
शेवटचं तर mind blowing
वॉव खूपच छान. मस्तच आहेत
वॉव खूपच छान. मस्तच आहेत सर्वच. मला बुक मार्क्स खूपच आवडले.
विद्या.
टीना .. सगळेच डुडल्स मस्तच!!
टीना .. सगळेच डुडल्स मस्तच!!
टीना, खूप सुंदर झालीत सगळीच
टीना, खूप सुंदर झालीत सगळीच डुडल्स!
पण तुला इकडे झब्बू द्यायला परवानगी नाही. तुझ्याकडून वेगळ्या धाग्याची अपेक्षा आहे.
Pages