चालते व्हा ! १०,००० स्टेप्स अ डे चालण्याचे चॅलेंज ( डिसेंबर २०१५)

Submitted by rar on 1 October, 2015 - 00:53

ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात बर्‍याच मायबोलीकरांनी यशस्वीपणे १०,००० स्टेप्स अ डे चालण्याचा उपक्रम पूर्ण केला.
आता डिसेंबर महिन्यासाठी ज्यांना हे चॅलेंज घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी हा धागा Happy
----------------------------------------------------------------------
आपण मालमत्ता, सोनंनाणं, शेयर्स, जमीनी या सगळ्यात इनव्हेस्ट करतो. पण 'हेल्थ ' मधे इनव्हेस्ट करायची सतत टाळाटाळ करतो, किंवा त्यादृष्टीने फारसा विचारही करत नाही. 'चालणं' हा ह्या इनव्हेस्टमेंटसाठी अतिशय 'अंडररेटेड' पण एक सोपा आणि तरीही प्रभावी व्यायाम आहे. ह्यामधे केवळ शरीराला व्यायाम ह्या दृष्टीकोनातून न पाहता, चालण्याने विचारांना, मनाला मिळणारी चालना ह्या दृष्टीने पाहणंही खूप आवश्यक आहे. म्हणूनच 'चालते व्हा' हे आहे ऑक्टोबर महिन्यात रोज १०,००० स्टेप्स चालायचं चॅलेंज ! ह्या चॅलेंजची मजा अशी की हे स्वतःच स्वीकारायचं आणि स्वतःच करून दाखवायच... स्वतःसाठी !

सगळ्यांना १०,००० स्टेप्स दरदिवशी चालणं जमेलच असं नाही. पण काही हरकत नाही. अजिबात निराश होऊ नका, किंवा 'आता नाहीच जमणार ' असं सोडून देऊ नका.
आपण २ लेव्हलला चॅलेंजेस करू शकतो :

लेव्हल १ : १०,००० स्टेप्स/डे
लेव्हल २ : ७५०० स्टेप्स/डे

यापैकी कोणातीही लेव्हल ठरवा आणि महिनाभर रोज तितक्या ठरवलेल्या स्टेप्स 'चालायचं चॅलेंज' स्वीकारा.

१) आपण कोणतं चॅलेंज घेतलंत हे इथे लिहू आणि रोजच्या (किंवा आठव्ड्याच्या) स्टेप्स इथे लिहीत जाऊ.
२) फोनवर काही उपयुक्त अ‍ॅपस आहेत, ज्याने स्टेप्स मोजता येतात. पण अ‍ॅप नसेल तरी काही हरकत नाही.
१०,००० स्टेप्स = ५ माईल्स / ८ किमी.
७५०० स्टेप्स = ३. ७ माईल्स / ६ किमी

साधारण चालण्याच्या वेगानुसार १६ ते २० मिनीटात १ माईल अंतर होते. त्यानुसार साधारण मोजमाप असे -
१०,००० स्टेप्स - दीड तास
७५०० स्टेप्स = १ तास १० मिनीटे

३) एखादा दिवस जमलं नाही, तर आठवड्याच्या उरलेल्या दिवसात थोड थोडं जास्त चालुन 'आठवड्याचं टारगेट" पूर्ण करा.

सप्टेंबर महिन्यात आम्ही काही मायबोलीकरांनी हे चॅलेंज घेतलं होतं आणि आज ते पूर्ण झालं. हे केवळ शारीरीक व्यायामाचं चॅलेंज नसून, ह्यात मानसिक चॅलेंज, किंवा डीटरमिनेशन हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे . महिनाभर एकमेकांना मोटीव्हेट करत चॅलेंज पूर्ण करायला धमाल आली. आता ऑक्टोबर महिन्यासाठी बघूयात किती मायबोलीकर हे चॅलेंज घेताहेत आणि पूर्ण करताहेत ?
चला तर मग... तुम्हीही सहभागी व्हा, आणि इतरांनाही सहभागी करून घ्या... Ready for walk? Ready to take the challenge?
Good Luck and go for it ... Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑक्टोबर २२: १४९८५
ऑक्टोबर २३: ११९५९
ऑक्टोबर २४: ८८२७
ऑक्टोबर २५: १२,०७९
ऑक्टोबर २६: ११,६३३
ऑक्टोबर २७: १२०९५
ऑक्टोबर २८: १४,३६९
ऑक्टोबर २९: ११,६१२
ऑक्टोबर ३०: १२,७६९
ऑक्टोबर ३१: ५,५८३
(महिनाअखेर) एकुण:३,६९,८५२

26 Oct - 12782
27 Oct - 10183
28 Oct - 10932
29 Oct - 10149
30 Oct - 10102
31 Oct - 10967

२८ ऑक्टो : १३,०६२
२९ : १२,९४७
३० : १३,२९२
३१ : ११,७२६

ऑक्टोबर वॉकींग चॅलेंज पूर्ण केलेल्या सगळ्यांचे अभिनंदन Happy
मी महिनाभरात ४३१,५१० स्टेप्स चालले. दिवसाला अ‍ॅव्हरेज स्टेप्स = १३९००. मजा आली....फायदाही झालाच शरीराला, मनाला !
नोव्हेंबर मधे पण चालत राहिनच Happy
keep walking.. stay fit Happy

शेवटचा आठवडा;: ८४,९३४ पावले = ३७.९ मैल ... १२,१३३ पावले/दिवस

महिना: ३७८,३०५ पावले = १६८.४ मैल..१२२०३ पावले/दिवस.

Oct-2015.jpg

मी कंटीन्यू करणार आहे. आता कुठे लेवल २ पूर्ण होऊ लागली आहे. शक्य तितके जास्त चालण्याचा प्रयत्न करतेय. शरीराला फायदा होतोच आहे पण मनाला होणारा फायदा जास्त मॅटर करतो असे वाटते. थँक्स रार. Happy

आरएमडी, गोगा >> मस्तच!
(तुमच्या स्टेप्सचे आकडे वाचून जास्त एन्करेज व्हायला झाले. )

नोव्हेंबर मध्ये अजून जास्त चालणार
आठवड्याचे काही दिवस खूपच कमी आणि काही दिवस खूप जास्त अस झालाय ते सातत्य राखायचा प्रयत्न करणार
गोगा आणि रमद मस्तच इन्स्पिरिंग आहेत आकडे तुमचे

नोव्हेंबर मधे चॅलेंज घेऊन चालणार्‍यांसाठी हाच धागा वापरायचा आहे की नवीन काढावा?
अ‍ॅडमीन, प्लीज मदत करा.

जुने मेंबर्स, चालत रहा.
नवीन मेंबर्स , वेलकम टू द क्लब Happy

ऑक्टोबरसाठी लेव्हल २ - ७५०० स्टेप्स = ६ किमी हे उद्दिष्ट ठेवले.. महिनाभरात सरासरी रोज ४.५ किमी चाललो.. आता नोव्हेंबरसाठी लेव्हल १ - १०,००० स्टेप्स = ८ किमी हे चॅलेंज घेतलेय..
१ नोव्हें. - ५.५ किमी
२ नोव्हें. - ७.५ किमी
३ नोव्हें. - ७.५ किमी (सकाळी ०९:०० पर्यंत)
आज संध्याकाळी ३ किमी चालुन १०.५ किमी पुर्ण करणार.

रार.. मला वाटतं की शीर्षक फक्त बदल.. बाकी इथे यापुढे नोव्हेंबरचे आकडे टाकू.
आपल्या बरोबर इतरही चालतात हे ऐकूनही उत्साह वाढतो.. Wink
मी हा उपक्रम जीवनपध्दतीत बदल (Lifestyle change) म्हणून स्वीकारलाय, तेव्हा चालतच राहीन म्हणतो...

नोव्हेम्बर पहिला आठवडा...
८०,३०६ पावले = ३५.२ मैल ..... ११४७२ पावले/दिवस..
.
चालण्याचा कार्यक्रम चालू...

गोगा, धन्यबाद.

तुम्ही डायट बदललात का? कारण कुठेतरी लिहिलेत की वजनच कमी होत नाही. आणि ज्युसचा डायट करत होतात.
हे सर्व "चलते व्हा" करायच्या आधी का?

का डायट तोच ठेवला?

गेला आठवडा
८२५१२ पावले = ३७.१ मैल सरासरी: ११७८७ पावले/दिवस..
.
ओक्टोबर आणि बहुतेकांचा उत्साह एकत्रच गेले की काय? इथे लिहिणारे सगळे गायब झाले म्हणून विचारतोय. Sad

आठवडा थंडीमुळे थोडा थंडावला..
७५,३८० पावले = ३३.१ मैल ..... १०,७६८ पावले/दिवस..
चलते रहो... Happy

नोव्हेंबरसाठी लेव्हल १ - १०,००० स्टेप्स = ८ किमी हे चॅलेंज ठेवले होते.. महीना अखेरीस एकुण १८७ किमी चाललो..
म्हणजेच दिवसाला ६.२३ किमी = ८००० स्टेप्स.. यात कमीत कमी ५ मिनिटे किंवा १/२ किमी पेक्षा जास्त चालणे गृहीत धरलेले आहे.. बाकी काही नाही पण चालण्याचा वेग सुधारलाय.. आता १ किमी अंतर १० मिनिटांत चालतो..
धन्यावाद rar आणि हेमा..

डिसेम्बर आकडे...
गेला आठवडा...

७३,०६१ पावले = ३२.५ मैल... १०४३७ पावले /दिवस...

थंडी पावसामुळे जरा पावले कमी होतात. पण अजून हिवाळा काढायचा आहे.. Happy

Pages