ऑनलाईन दिवाळी अंक २०१५

Submitted by नंदिनी on 4 November, 2015 - 13:22

आली आली दिवाळी जवळ आली!! दिवाळी अंकांच्या जाहिराती पण आल्यातच, काही अंक बाजारात येऊन दाखलसुद्धा झालेत.

इथे वेगवेग्ळ्या दिवाळी अंकांची आणि त्यामधल्या साहित्यची चर्चा करता येईल.

काही ऑनलाईन दिवाळी अंक :

http://reshakshare.blogspot.in/
http://digitalkatta.com/
http://aisiakshare.com/diwali15

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेषे वर ची अक्षरे मधील स्केटिंग चा लेख एकदम सो सो क्यूट असा आहे. मिस्टर क्लॉज मिसेस क्लॉज व त्यांचे कन्यारत्न स्केटिंग शिकतात वगैरे असे वर्णन आहे. एक टाइपच्या वाचकांना नक्की जेल होईल व आवडेल.

डिज्जे, तेरे मुह मे घी शक्कर!
मी पण मिसिंग माबोचा दिवाळी अंक.
अगदी कारणं सांगुनही बंद केला गेला असता तरी मला रुख रुख लागुन राहीलीच असती.

रेषेवरील अक्षरे:

स्वाती यांचा संदुका बॅगा ट्रंका असा लेख आहे मस्त आहे. जरूर वाचा. शैली सुरेख जमली आहे. आणि एक प्रकारचा प्रामाणिक पणा आहे. मूक पणे सोसणार्‍या आईचे शब्दचित्र आपोआपच निर्माण होते.

जिम व कॅलरीज हा पण छान विनोदी लेख आहे. मेघना भुस्कुटेंचा.

लाइफ इज टू शॉर्ट फॉर हुर हुर / रुख रुख. जे समोर आहे ते वाचले. किस्सा खलास.

आयला! मस्तच की! इकडे नवीन आयडी काढता येईना, म्हणून इकडे 'रेषेवरची अक्षरे'बद्दलचा धागा काढायचं राहिलं आणि मग जी गडबड उडाली ती थेट आज सवड मिळाली. अंक वाचल्याबद्दल मनापासून आभार. हॅप्पी दिवाळी. Happy

मिसळ पाव.कॉमचा अंक प्रकाशित झाला आहे. गविंचे सेशेल्स वर्णन मस्त आहे वाचून लगेच अव्हेलेबल डेटस, तिकीटाची चौकशी चालू केली. अगदी रम्य जागा वाट्ते आहे.

कथा कविता लेख प्रवास वर्णने, रेसीपीज आहेत. विशाल कुलकर्णींचे संपादकीय आहे .

प्रभाकर पेठकरांचा लेख मस्त आहे. ह्या दोन आयडींचे इतर लेखन कींवा प्रतिसाद देखील चांगलेच असतात. वाचनीय. असे आपले मला वाट्ते.

गोव्याची दिवाळी हा पण छान लेख आहे. पोह्याच्या रेस्पी पन आहेत लेखात. बनवणे को सकता.

नी, मेघनाने तिच्या लेखात म्हटलंय की तब्बल ७० ऑनलाईन दिवाळी अंक प्रकाशित झालेत.. तिलाच विचार कुठले कुठले ते Wink

मंजूडी, अगं, पलीकडल्या वर्षी ते! यंदा मला हेच खणखणीत चार ठाऊक आहेत. मिपा नि रुची निरनिराळे धरले तर पाच.

अच्छा!! ते पलीकडल्या वर्षी ओव्हररीड झालं Wink

स्वप्नाली 'फ फोटोचा'साठी काम करते, त्याबद्दल तिला विचारायला हवं.

'स्वर्ग' नावाची विलास केळस्करांची कथा (?) वाचली. काही झेपली नाही. पण त्यात 'बाबा आमटे कुष्ठरोगाने गेले' असा उललेख आहे. हे खरे आहे का? एकूण डिजिटल कट्टा ठीक ठीक वाटला. शर्मिलाचा लेख वाचला नाही अजून.

तेच मलाही वाटले... डिजिटल कट्टा मधली ती स्वर्ग नावाची गोष्ट वाचलीय का कोणी? त्यात तस महटलय किंवा मला कॉन्टेस्ट समजला नाही बहुदा... प्लीज संदर्भ सांगा.

ऐसी अक्षरे मधला चाळीतील जीवनबद्दलचा लेख आणी कट्टा मधला संत साहित्या बद्दलचा लेख आवडले. नक्की शब्दात लिहिता येत नाहिय पण दोन्ही लेखात समान सूत्र जाणवते. एखाद्या जुन्या गोष्टीचे नको तितके रोमेंटिकिकरण असे काहिसे.. दोन्ही लेख म्हणजे राजाला कपडे नाहीएत असे सांगणार्‍या मुलासारखे आहेत.

मायबोलीच्या दिवाळी अंकाची या वर्षी उणीव भासतेय हे नक्की..दिवाळी अंक येणार नाही हे आधी कळाले असते तर बरे झाले असते..मायबोली आपली मानणाऱ्या लोकांना अचानक परकेपणा वाटू लागतो..

मायबोली दिवाळी अंक नाही आला म्हणून इथे खेद व्यक्त होतो आहे पण तो का आला नाही ह्याचा जर विचार केला तर त्याला रिडर्सच नव्हते. मायबोलीवर मागिल ५/६ वर्षांपासून दिवाळी अंक वाचणे खूप कमी झाले होते. प्रतिक्रिया देऊ असे लिहिणारे नंतर फिरकत नसत. बस अंक आला .. आभार आणि अभिनंदन लिहूण झाले की वाचक परत अंक वाचत नसत. वाचलाच तर कुणाला तरी लेख कुणीतरी रेफर केला म्हणून. ह्याकारणामुळे दिवाळी अंक बंद करण्यात आला आहे. अजून दुसरे कारण म्हणजे इथले लेखक इतर दिवाळी अंकासाठी लिहित आहे त्याची प्रशंसा इथल्या दिवा़ळीअंकापेक्षा जास्त आहे.

दिवाळी अंक बंद व्हायची कारणे यासंदर्भात वेमा वा अ‍ॅडमिन यांच्याकडून अधिकृतरित्या काही निवेदन जोवर जाहिर होत नाही तोवर हीच कारणे होती वगैरे म्हणण्यात काही अर्थ नाही.

बाकी नो कमेंटस...

इथे इतक्या लोकांनी त्यांना विचारुन झाले पण ते निरुत्तर राहिलेत. अकारात्मक गोष्टी सहसा प्रशासक लिहित नाही.

Pages