अष्टविनायक दर्शन : श्री चिंतामणी

Submitted by पल्ली on 28 August, 2009 - 00:09

theur_0.jpgश्री चिंतामणी- थेऊर, जि. पुणे

मार्ग- पुणे-सोलापूर मार्गावर पुण्यापासुन २२ कि.मी. अंतरावर. लोणी स्थानकापासून ५ कि.मी.

यात्रा- भाद्रपद शु. चतुर्थी. रमा-माधव पुण्यतिथी. कार्तिक कृष्ण अष्टमी.

मूर्ती- स्वयंभू. उजव्या सोंडेची.

मंदिर- महाद्वार उत्तराभिमुख पण मूर्ती पूर्वाभिमुख. प्रशस्त आवार. विस्तृत सभामंडप. तिन्ही बाजूंनी मुळा-मुठेचा वेढा. या मंदिराची व्यवस्था चिंचवड देवस्थानाकडे आहे.

इतिहास- मोरया गोसावी यांनी इथेही तप केले. इथेच त्यांना सिद्धी मिळाली. त्यामुळे चिंचवड व थेऊर यांचा परस्पर संबंध आहे. मोरया गोसाव्यांचे पुत्र चिंतामणी देव यांनी इथले मंदिर बांधले. सभामंडप श्रीमंत माधवराव पेशवे यांनी बांधला. त्यांचे आणि त्यांच्या पत्नी रमाबाई ह्यांचे हे आवडते स्थान होते. श्रीमंत माधवराव पेशव्यांचा मृत्यूही याच क्षेत्रात झाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पल्ली, नेहमीप्रमाणेच मस्त!
शेडींग इतकं जबरदस्त आहे की मुर्ती त्रिमितीत असल्यासारखी वाटते.