"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ५

Submitted by संयोजक on 23 August, 2009 - 09:53

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
"हा सागरी किनारा"

Zabbu_Photo_Samudra.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॅम काय आहे काय ते ?? बहुधा वावटळ असावे. पण मी असले वावटळ आधी नाही पाहिले कधी !
झकास फोटो....सगळ्यांचेच.
चालुद्या....मोरया !! Happy

हा हा.धन्यवाद. मधून मधून hibernate होत असते. परीक्षा जवळ आली की distraction जास्तच होते.:))

ते वावटळचं आहे... सोलापुरला उन्हाळ्यात धुळीची वावटळं उठतात तसं, पण हे त्यांच्यापेक्षा फार फार मोठ्ठ होतं... संध्याकाळच्या वेळी किनार्‍यावर बरीच लोकं होती, हे वावटळ बघितल्यावर सारा किनारा रिकामा झाला!

शीतल, समुद्रात जेवण! अलिकडेपण पाणी दिसतय!

हा पुन्हा जंजिरा,

आय अ‍ॅम सॅम, प्रकाश.. मोठा दगडच आहे तो.. त्यावर सीगल बसलाय ! Happy त्या सीगलचाच फोटो काढायचा होता मला..
सॅम.. ते जे काही आहे ते डेंजर आहे ! मी जर तिथे असते तर फोटो काढण्याइतकीसुद्धा हिंमत राहीली नसती! Happy

हा मालिबू ते आमचं गाव या रस्त्याला लागणारा समुद्र..

IMG_3762.JPG

हिंदी महासागरातले शेवटचे भूशीर.थोड्या पिवळ्या रंगाच्या फिल्टरने मजा आली.-श्रीलंका. गॉल.

DSC_4972-g.JPG

पुन्हा रत्नागिरी,

भाग्यश्री, त्या वावटळाच्या काही तास आधीचा समुद्र! ते वावटळ होतचं भयानक... पण त्या क्षणी मी तरी मला त्याची भिती न वाटता कुतुहल वाटत होतं!

IMG_1181.JPG

लाटेमागुनी लाट येते...किनार्‍याकडे

DSC00263(1).JPG

नकुल, ओरेगॉनचा किनारा भारीच. खूप मनात आहे ओरेगॉन कोस्ट आणि क्रेटर लेकला जायचं. जमवायला हवं.

हा पण पेन्साकोला, फ्लोरिडा इथला पियर आणि समुद्रकिनारा...

DSC00153.jpg

असंच ढगाळ हवामान होतं दोन दिवस त्यामुळे सगळ्या ट्रिपचा बट्याबोळ झाला Sad

Pages