सदाबहार रसदार अंगूर

Submitted by निनाद on 2 November, 2015 - 19:27

देवेन वर्मा आणि संजीव कुमार या जोडीचा अंगुर हा चित्रपट.
गुलजार यांचे सदाबहार आणि चुरचुरीत संवाद हे या चित्रपटाचे बलस्थान.
संवाद आणि घडामोडी यांचे पंचेस इतके सुरेख विणलेला हा चित्रपट आहे.

पण तेव्हढेच नाही तर त्या संवादास पूरक ठरतील अशी अगदी नेटकी बेतलेली पात्रे. त्या पात्रांचे नितांत सुंदर त्या त्या भूमीकेला न्याय देणे. या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ विनोदी अभिनेता म्हणून देवेन वर्मा यांना फिल्मफेयर मिळाले होते. पण माझ्या मते हे सर्व टीमला मिळाले असते तरी चालले असते इतका छान हा चित्रपट जमून आला होता.

या चित्रपटाच्या पंख्यांना चर्चा करायला, काय आवडले होते अशा आठवणी जागवायला हा धागा.

(हा लेख नाही, त्यामुळे मी सहेतुक जास्त लिखाण केले नाही, ते सर्वांच्या प्रतिसादांतून येईलच अशी आशा आहे.)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेकरीत तयार झालेल्या आठवणी तो धागा वाहता असल्याने येथे देतो आहे.
(आशा आहे सदस्यांना प्रत्यवाय नसावा)

मधुकर विनायक | 2 November, 2015 - 17:19
संजीवकुमार - देवेन वर्मा यांचा अंगूर पाहिला असेल तर त्यात इन्स्पेक्टर सिन्हाच्या भूमिकेत होते.

निनाद | 2 November, 2015 - 17:22
अंगूर मध्ये इन्स्पेक्टर सिन्हा - 'तुम मुझसे जो रिश्ता बनाना चाहती हो' च्या वेळी लै भारी काम करून गेलेत.
अशोकला जीप मध्ये घालून घरी घेउन जातात तेव्हा. Happy

मधुकर विनायक | 2 November, 2015 - 17:26
निनाद +१
मला तो सीन पण आठवतो ज्यात ते त्या गणेशीलाल (टी पी जैन) नामक हिरे व्यापार्‍याला खडसावतात.

"हिलना मत वर्ना टांगे तोड दुंगा!"

"अब आदमी जिंदा होगा तो हिलेगा भी नही क्या?" - इति गणेशीलाल

निनाद | 2 November, 2015 - 17:38
गणेशीलाल काय मस्त उभा केला होता...

'ग्यारह बजे या बारह बजे?'
'पेहेचान ते तो है... मगर नही पेहेचानते.'
'देखिए बारह बजनेमे सिर्फ दो मिनट बाकी है'

सगळे डायलॉग्ज एकदम चपखल!
छान आठवण करून दिलीत...

मधुकर विनायक | 2 November, 2015 - 17:40
अंगूर सगळाच खतरी सिनेमा होता.

संजीवकुमार, देवेन वर्मा, मौसमी, दिप्ती नवल, अरुणा इराणी, पद्मा चव्हाण हे तर होतेच पण अगदी सगळे सपोर्टींग अ‍ॅक्टर्सपण एकसे एक होते.

छेदीलाल - सी एस दुबेजी
मन्सूरमिया - युनुस परवेज
गणेशीलाल - टी पी जैन
टॅक्सीवाला - राम मोहन

आणि सगळ्यात ग्रेट सुरवातीचा उत्पल दत्त!

मधुकर विनायक | 2 November, 2015 - 17:41
आणि ऑफकोर्स -
इन्स्पे. सिन्हा - कर्नल त्रिलोक कपूर

निनाद | 2 November, 2015 - 17:45

सगळी नावे दिल्याबद्दल आभार मधुकर विनायक!
अंगुर या चित्रपटावर एक धागाच काढला पाहिजे...

काढतोच! Happy

मधुकर विनायक | 2 November, 2015 - 17:51

"घुटनोको उर्दुमें जानो कहते है!"

Happy

कॉपरमाईन | 2 November, 2015 - 18:15

जो आदमी घुटनोको जानो कह सकता है वो अशोक कुमार को किशोर कुमार नहीं कह सकता?

निनाद | 2 November, 2015 - 18:58

सही सही! सगळे संवाद आठवताहेत... जाम हसायला येते आहे.
'आदमी मरते वक्त अठन्नी बचाके क्या करेगा'
'ले चने खा'
'प्रीतम आन मिलोs'

"अंगुर" आवडलेल्यांनी "दो दुनी चार" आवर्जुन पहावा; किशोर कुमार आणि असित सेनचा. माझ्यामते विनोदाच्या बाबतीत काकणभर सरस, अंगुरपेक्शा...

अंगूर अफलातून खतरी विनोदी सिनेमा आहे!

गंभीर भूमिकांमध्ये माहीर असलेल्या संजीवकुमारला विनोदाची किती उत्तम जाण होती याचं उदाहरण म्हणजे हा सिनेमा! जोडीला देवेन वर्मासारखा विनोदवीर असल्यावर तर आणखीन काय पाहिजे?

"अगर मेरा नाम चिरकुटकुमार होता तो...."

"ये लडका बड होकर.. जोकर आ गया.."

"मै अपने जेब में दस रुपये से ज्यादा पैसे रखता ही नहीं.."

"अबे सुन यार, तू बाप कैसे बननेवाला है?"

"तुम लोगोंका गँग है गँग!"

एकसे एक अफलातून संवाद आहेत

आणि सर्वात खतरनाक,

"तुम्हे कहते हुए मुझे काहेकी शरम? जैसे मैने तुम्हे कभी देखा ही नही?"
"मुझे नंगा देखा है आपने?"
"छी! नंगा नही कहते! बिना कपडों के कहो ना!"
"हां! वस्त्रहीन! है ना?"

संजीव कुमार, दुबेजी आणि युनुस परवेज यांचं अफलातून टायमिंग असलेला हा एक सीन -

छेदीलालजी आप सिर्फ चाबूक दिखा रहे है, घोडा कहां है?

चाबूक नही हुजूर, तांगा! सिर्फ सवारी की देरी है!

लेकीन सवारी है कहां?

सज रही है सरकार! हिरे पन्ने लग जाए तो देखिएगा, खुद अपनी बेगम न पहचानी नही जाएगी! ऐसा लगेगा किसी और की उडाके लाए है!

आज फिर तुम्हारी बातोंने हमें जीत लिया भाई! खैर ठीक है, मै शाम को नौ बजे आऊंगा! डोली लेने!

शहनाई मंगा लूंगा हुजूर!

मैने तुझे कोई पैसे दिये ही नही?

एक बार दस रुपए दिये थे! सात साल हो गए हिसाब मांगते मांगते!

..............

मेरे खयाल में ये किसी गँगसे मिला हुवा है!

एक बार दस रुपए दिये थे! सात साल हो गए हिसाब मांगते मांगते! आणि या वेळेचा अगदी निष्पाप चेहरा! Happy

काय धमाल आली असेल ना या सगळ्या चित्रिकरणाला!

मेरे दस, पाच पंद्राह, चार सत्राह...

पंद्राह और चार सत्राह नहीं उन्नीस होता है!

.....................

जी, मुझे ये जीप चलानी नही आती

जीप मै चलाऊंगा, तुम बैठो अंदर!

.....................

आजके बाद मै कभी कुछ नहीं मांगूगी, कुछ नही बोलूंगी, हार लाए?

......................

बहादूर कैसे बाप बन सकता है?

क्यूं नहीं बन सकता? वो क्या वो है?

मैं अपनी जेबमे दस रूपयेसे ज्यादा पैसे रखताही नही |
बडा अच्छा करते हैं हुजूर, घरमे रखो तो खतरा, बँकमे रखो तो खतरा,
घर मे क्यों खतरा ? चोर देख लेती हैं
और बँकमे ? गव्हर्नमेन्ट देख लेती हैं
हाँ दोनो ही तो - - -

आजकल जमाना बडा खराब हैं, पता नही शहरमे कैसे कैसे गुंडे काम करते हैं, कही किसी ने धर लिया तो ?
मैं नही डरता, एक बार ऐसेही जा रहा था, आठ दस गुंडोंने घेर लिया,
दिखने मे मैं यूँही हूँ, लेकीन एक उल्टे हाथ का पड गया ना तो पता चलेगा, क्याSSS पताSSS चलेगाSSS
किधरSSS ? इधरSSS ?

ये रहा बसस्टॉप, अब मैं चलता हूँ
अरे ऐसे थोडेही जाने दूँगा तुम्हे, बस को तो आने दो,
आजा भाई, बडे आरामसे आ रही हैं, काफी फुटेज खा रही हैं
अरे ये क्या ? स्टॉप आते ही स्पीड बढा दिया !

निखळ आनंदाचे नाव म्हणजे कुणी विचारले तर त्या व्यक्तीला "अंगूर" सिनेमा दाखवावा. असेल शेक्सपीअरच्या नाटकावरून बेतलेला पण त्या टीमने रसायन असे काही फ़क्कड बनविले आणि सादर केले आहे की एकही प्रसंग मनातून आजही पुसला गेलेला नाही. वरील संवाद वाचताना ती संबंधित पात्रे जशीच्या तशी समोर आली आहेत.

दीप्ती नवल....जिजाजीची लाडकी मेहुणी....आहे स्कॉलर आणि आपल्या भोळ्या स्वभावाच्या बहिणीच्या संसाराकडे काटेकोरपणे लक्ष देणारी पोरगी....

दीप्ती, मौशुमी आणि संजीव पत्ते खेळत आहेत....आणि हा नखरेल नवरा टेबलखालून बायकोच्या टाचांना आपल्या पायाने रोमँटिक मूडमध्ये हळूच धक्के देत आहे....प्रत्यक्षात पाय आहेत त्या मेहुणीचे.....ती म्हणते,

"जिजाजी, ये पैर मेरे है ! दिदी के नही..."
यावर ओशाळवाणे वगैरे अजिबात न होता संजीव उद्गारतो, "तुम्हारे ? फ़िर तुम्हारे दिदी के पैर कहां है ?" दोघांचा संवाद ऐकणारी मौशुमी मात्र पत्त्यात मश्गुल.

केव्हाही कुठूनही पाहण्यास सुरवात केली तरी कधीही कंटाळा येत नाही असे जे काही धमाल सिनेमे आहेत त्यात अंगूरचा क्रमांक फार वरचा लागेल!

मस्त बाफ. मी पण फॅन आहे.
१) अगदी सुरुवातीला ते तिघे रमी खे ळत असतात तेव्हा. अगदी साधा सीन आहे, मौशुमी पत्ते वाटत असते. बोलता बोलता ती कोणाला किती वाटले हे विसरते , गोंधळते व परत वाटायला सुरू करते. जबरी आहएत एक्स्प्रेशन्स

२) साब पागल हो गये है. वाला सीन दीप्ती विचारते खाने पे आयेंगे क्या? तर देवेन म्हणतो किसे?
हा फार अफलातून जोक आहे.

३) बस आरही है बस आ रही है. तो सीनच.

४) संजीव कुमार हपिसात बसलेला असतो व फोन काढून ठेवलेला अस्तो. एक एम्प्लॉ यी येऊन
फोन बोलत बोलत जाग्यावर ठेवायला बघतो तो सीन. तुमने शादी की है? कभी मत करना.

५) तुम लोगोंका गँग है गँग.

जीजाजी बाजारमे क्या कर रहे थे ?
लगता हैं, मेरा ही इंतजार कर रहे थे, के मैं आऊ और मुझे धर ले
अब खाने को आयेंगे के नही ?
किसे ?

अंगूर चा एक एक सीन आणी संवाद लक्षात आहे. वर बर्‍याच जणांनी बरंच काही कव्हर केल्याने पुनरावृत्ती करत नाही.
"इंपीरियल हॉटेल.हम वहां ठहरे नही है, उतरकर कही और चले जायेंगे."
शेवटी पोलीसांच्या गोंधळात अगदी अस्वस्थ असतो तेव्हा पण संजीव कुमार टॅक्सीला 'इंपीरियल हॉटेल, मै वहं ठहरा नही हूं' सांगायला विसरत नाही Happy

सच सच बता बहादूर आज तुने कितनी भांग पी है !
इतनीसी (अ‍ॅक्शन), ह्म्म्म मग बरोबर आहे (अ‍ॅक्शन)
लेकिन इतनेसे कुछ नही होता.
जो होता हैं ना बहादूर, वो तुझे नही, दुसरोंको होता हैं.

आज बाजार में तूने जो हरकत की है मै उसे जिन्दगीभर नहीं भूल सकता! भांग के नशेनें सांड की तरह टहल रहा था! मूलीयां खरिदने!

(नेमका त्याचवेळी वेटर दार वाजवतो)
कम इन!

ये क्या है!

सर, मूली के पराठे!

-------------------------------

संजीवकुमार, देवेन वर्मा आणि तो वेटर्, तिघांचही टायमिंग अफलातून!

दिदी, सारा दिन तो रोती रहती हो! आंखे तो वैसेभी साफ हो जाती है! देखो ना, कप में दवा कम और आंसू ज्यादा है!

-------------------------

हा थोडासा चावट डायलॉग -

अब तू निकालेगा कैसे?

क्या ब्लाऊज?

अबे ब्लाऊज नहीं, चाबी!

----------------------------

आणि क्लायमॅक्सचा कहर

मौसमी - इस घरमें दो-दो बहादूर, दो-दो ये, अब आगे चलकर देखो, कहीं दो-दो मां ना निकल आए!

एक से एक देताय! जाम मजा येते... हसतोय!
या चित्रपटाचे मेकींग ऑफ असते तर काय धमाल आली असती ना पाहायला...

बहादूर तू बाप बन गया? हे दर वेळी प्रश्नांकित चेहर्‍याने.

मौशुमी पहिल्या गाण्यअत काय गोड अन खट्याळ दिसते. परफेक्ट कपल. त्याला घोळात घेउण मग हार हार करून मारले असणार. मग सकाळी ते भांडण. सो क्यूट.

सुरवातीचाच ट्रेनमधला तो अफाट सीन!

मै अबतक पचासो नॉवेल पढ चुका हूं.. मेरा मतलब पचासो गोलियां खा चुका हू!

आज सुबह विटॅमिनकी गोली खाई थी क्या?

अरे मेजर कसे विसरलात?

प्रीतम आन मिलो आणि उल्टा वर जाणारा बॉल? बेडूक आणि गार हवा ?

पैसे मैने कपाट मे रखे है.
अगर बॅग चला भि गया तो पैसे है नही.

ओमतलब आप सोये जमीन पर और मछर दान लगाये ताकि मच्छर को लगे के आप मच्छरदानीमे है
तो वो उधर चला जायेगा. लिहिताना काय झाले असेल नाही का?

तुम जिजाजी नही हो?

तनू, मै अलका हूं अलका!

तुम जिजाजी नहीं हो? तो फिर तुमने कल रात मुझे किस क्यों किया?

---------------------

भांग मिसळलेले पकोडे खातानाचा सीन तर निव्वळ अशक्यं आहे!

रोज मै मना करती हूं और तुम मानते नही हो!

रोज! किस रोज की बात कर रही है आप?

------------------------

नीचे कौन है?

प्रेमा!

मगर उसे तो बच्चा होने वाला है! और मैने सुना तू उस बच्चे का बाप है!

--------------------------

लूटनेवाले साडेतीन मिनीटमें पुरा बॅंक लूटकर ले जाते है! दिखाऊं कैसे?

यहां नही, किसी बँकमें जाकर दिखाना!

--------------------------

मैने तुझे बताया नहीं, उन्हे कभीकभी दौरा पडता था!

गणेशीलाल (टी पी जैन) - ब्यापार में क्या है छेदीलालजी, हम जानते सबको है, पर किसीको नहीं जानते! पहचानते सबको है, पर किसीको नहीं पहचानते!

----------------------------

शहर छोडकर भाग रहे हो?

हां! और डब्ल्यू टी नही जा रहे है हम! बहादूर टिकटे दिखाओ!

Pages